Anne Frank Information In Marathi 2022 | जगात दुसऱ्या क्रमांकाचे विकल्या जाणारे पुस्तक

Anne Frank Information In Marathi 2022 | जगात दुसऱ्या क्रमांकाचे विकल्या जाणारे पुस्तक

anne-frank-information-in-marathi-2022
source : flickr.com

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लाखो यहुदी लोकावर अत्याचार झाले आहेत. त्यातीलच ही फक्त तेरा वर्षाची मुलगी म्हणजे ॲन फ्रँक( anne-frank-information-in-marathi-2022) .तिने लिहिलेली डायरी म्हणजे जगात दुसऱ्या क्रमांकावर विकल्या गेलेले पुस्तक .ॲन फ्रँक आणि तिचे कुटुंब तब्बल दोन वर्ष तिच्या वडीलांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यार लपून राहिले आणि तिथेच तिने वयाच्या तेराव्या वर्षी डायरी लिहायला सुरवात केली. ॲन फ्रँकचा मृत्यू  एका यातना देणाऱ्या शिबिर मध्ये झाला ,त्यावेळेला ती फक्त 15 वर्षाची होती .चला तर मग आज आपण अतिशय संवेदनशील असे ॲन फ्रँकची संपूर्ण जीवनचरित्र पाहूया.

ॲन फ्रँकचा जन्म :

ॲन फ्रँकचा जन्म 12 जून १९२९ ला जर्मनी मधील फ़्रांकफुर्ट शहरात झाला होता. ती एक यहुदी होती. जेव्हा ती फक्त 4 वर्षाची होती जर्मनीवर हिटलरची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्याचमुळे तिच्या परिवाराने त्यांच्या जीवनातला बराच काळ नेदरलंड येथील अ‍ॅम्स्टरडॅम आणि त्याच्या जवळपास घालविला.

ॲन फ्रँकने  डायरी लिहायला सुरवात केव्हा आणि कशी केली ? :The Diary of a Young Girl

ॲन फ्रँकला ही डायरी तिच्या 13 व्या वाढदिवसाला भेट म्हणून तिच्या वडिलांनी दिली होती.तिला मिळालेली ही भेट तिला खूप आवडली होती . कारण ज्या परिस्थितीत ती होती तिथे जास्त लोक नव्हते. मित्र तर अजिबात नव्हते. त्यामुळेच तिने या डायरीला आपली मैत्रीण बनविले. ती तिला किटी म्हणत असे. तिने त्या डायरीमध्ये तिच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाबद्दल लिहिले.

See also  राजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Woman Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur

अगदीच कोणालाही न दिसता खाली काम करीत असलेल्या कामगारांना थोडासाही सुगावा लागू न देता एकाच जागी  दोन वर्ष घालविताना कसा अनुभव आला किंवा तिने काय भोगले या बद्दल सर्व माहिती तिने या डायरीत लिहिले.

तिला एक उत्तम लेखिका आणि पत्रकार व्हायचे होते. पण तिचे हे स्वप्न जिवंतपणी पूर्ण झाले नाही. मात्र ती या जगातून निघून गेल्यानंतर तिच्या वडिलांनी ती डायरी पुस्तकरूपात प्रकाशित केली. आणि तिची डायरी जगातील नंबर 2 वर विकल्या जाणारे पुस्तक बनले .असंख्य तरुण मुलांमुलींनी हे पुस्तक वाचले. भारतामध्येही या पुस्तकाला बरीच प्रसिद्धी मिळाली.या पुस्तकाला खूप पुरस्कार पण मिळाले.

ते ज्या घरात लपून होते त्या घराला तेथील सरकारने museum बनविले. असंख्य लोक त्या ठिकाणी भेट द्यायला जातात.The Diary of a Young Girl या नावाने तिने लिहिलेले पुस्तक छापल्या गेले. ही डायरी डच भाषेत लिहिलेली आहे.

हे ही वाचा : नगरवधू आम्रपाली 

ॲन फ्रँक व तिचे कुटुंब कसे पकडल्या गेले ? : anne-frank-information-in-marathi-2022

ॲन फ्रँकचे वडील ओटो फ्रँक एक जर्मन व्यवसायी होते. नाजी सैनिकांच्या अत्याचारापासून स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ॲन फ्रँकच्या  वडिलांनी त्यांना 6 जुलै १९४२ ला अ‍ॅम्स्टरडॅममध्ये लपविण्याचा निर्णय घेतला, आणि ते सर्व एका बिल्डींगमधील सिक्रेट खोलीमध्ये लपले.

anne-frank-information-in-marathi-2022
source : publicdomainpictures.net

2 वर्ष ३५ दिवस ॲन फ्रँक आणि तिच्या कुटुंबाने त्या खोल्यांमध्ये काढले, आणि त्याच दरम्यान ॲन फ्रँकने तिची डायरी लिहिली.  जिथे हे कुटुंब लपले होते त्या जागेला नंतर सिक्रेट्स अनेक्स हे नाव देण्यात आले.तिथे आणखी 4 जन पण लपले होते.  अतिशय लपून हे तिथे राहत होते. खाली असलेल्या दुकानातील कर्मचारी येण्याच्या आधी ते सर्व आपले काम करून घेत असत. कारण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही एवढाही सुगावा लागला तर नाजींचे सैनिक आपलयाला गोळ्या घालतील हे निश्चित होते. याची पूर्ण कल्पना ओटो फ्रँक यांना होती.

See also  Pablo Picasso Informmation In Marathi 2021 | पाब्लो पिकासोबद्दल माहिती

त्यामुळे तिथे  असणारी सर्व मंडळीसकाळी  आठ वाजण्याच्या आतच आपली सर्व कामे उरकून घेत असत. आणि संपूर्ण दिवस एकाच जागेवर बसून राहत असत.  येथील दीर्घ काळात ते फक्त रात्रीचे रेडीयो ऐकत असत. आणि अशाच एका रात्री त्यांनी बातमी ऐकली कि नाजींपासून यहुदी लोकांची सुटका होणार आहे. लवकरच ,पण या सर्व शासन निर्णयाला थोडा वेळ होता. पण तोपर्यंत नाजींचे सैनिक यहुदी लोकांना शोधून शोधून मारत होते. आता त्यांना बस थोडाच काळ तिथे काढायचा होता. आणि ते सर्व पूर्णपणे स्वतंत्र झाले असते. पण नशिबाला हे मान्यच नव्हते आणि कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला येथे यहुदी लपून असल्याचा सुगावा लागला. आणि नको व्हायला पाहिजे तेच झाले नाजींच्या सैनिकांनी ॲन फ्रँक आणि तिच्या कुटुंबाला पकडले.

फ्रँक कुटुंबाला दैनंदिन उपयोगी समान कोण देत असे ? : anne-frank-information-in-marathi-2022

मीप गीस या कुटुंबाची खूप खास मैत्रीण होती आणि ती यहुदी नव्हती. ती त्यांना मदत करत असे. ती आपला जीव धोक्यात टाकून त्यांना आवश्यक  वस्तू आणून देत असे. जेव्हा फ्रँक कुटुंब पकडल्या गेले तेव्हा मीप गीस सिक्रेट अनेक्समध्ये  गेल्या आणि तिथे पडलेले सर्व समान स्वतःकडे ठेऊन घेतले. त्यातच ती डायरी पण होती .जेव्हा  ॲनचे वडील यातना शिबीरमधून परत  आले तेव्हा मीप गीस यांनी ती डायरी त्यांना दिली.ओटो फ्रँक यांच्या मित्रांनी त्यांना डायरी प्रसिद्ध करण्याचा सल्ला दिला .जोपर्यंत डायरी मिम गीसजवळ होती. तो पर्यंत त्यांनी त्या डायरीतील एकही शब्द वाचला नाही. त्यांच्यामते ती डायरी वाचली असती तर ती त्यांनी जाळून टाकली असती. कारण त्या डायरीत ॲनने  माझे आणि माझ्या पतीचे आणि त्या सर्वांचे नाव होते ज्यांनी फ्रँक कुटुंबाला मदत केली होती. आणि हि डायरी जर नाजींच्या हाती लागली असती तर सर्वना मृत्युदंड दिल्या गेला असता .

See also  आयरन लेडी इंदिरा गांधींचा इतिहास माहिती 2021 | Indira Gandhi Information In Marathi

पकडल्यानंतर ॲन फ्रँक व तिच्या कुटुंबाचे काय झाले ? :

anne-frank-information-in-marathi-2022
source: pixabay.com

४ ऑगस्ट १९४४ ला नाझींनी सिक्रेट अनेक्स मध्ये लपलेल्या ॲन फ्रँक आणि तिच्या कुटुंबाला शोधून काढले. आणि त्यांना अ‍ॅम्स्टरडॅमजवळ असलेल्या आस्वीज यातना शिबीरमध्ये पाठवण्यात आले.आस्वीज शहरात आणल्यानंतर ओटो फ्रँक यांना त्यांच्या कुटुंबापासून अलग केले गेले. पण ॲन तिची बहिण आणि आई यांना एकत्र ठेवण्यात आले. पण थोड्याच दिवसात ॲन आणि तिची बहिण मार्गोत फ्रँक यांना त्यांच्या आईपासून अलग केले.  आणि दोघी बहिणींना Bergen Belsen concentration camp मध्ये पाठवण्यात आले. ॲन आणि तिची बहिण यांना तिथे कुठल्याच सुविधा नव्हत्या. खायला जेवण नाही. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपवत आणि पांघरायला काहीच देत नव्हते. असेच हाल बाकी यहुदींचे पण होते. कोवळ्या मनाची ॲन व तिची बहिण हे सर्व सहन करू शकल्या नाही आणि खूपच दुख:दायक त्यांचा अंत मार्च १९४५ ला टायफाईडने झाला. त्यानंतर १५ एप्रिल १९४५ ला त्या शिबिरातील इतर यहुदींना ब्रिटीश सेनेने मुक्त केले.

बायबलनंतर दुसऱ्या क्रमांकाचे वाचल्या जाणारे पुस्तक : The Diary of a Young Girl

असे म्हटले जाते कि ही जगातली सर्वात प्रसिद्ध डायरी आहे.या पुस्तकाला ६० पेक्षाही जास्त भाषेत translate केलेले आहे . बायबलनंतर दुसऱ्या क्रमांकाचे वाचल्या जाणारे हे पुस्तक आहे.ॲन जर जिवंत असती तर ती बघू शकली असती कि तिने किती लोकांना प्रेरित केले आहे. आणि तिला खूप आनंद झाला असता. कारण ती नेहमीच असे म्हणायची कि ,मला असे जीवन जगायचे आहे कि लोक माझ्यापासून प्रेरणा घेतील. आणि ते खरे पण झाले ॲन लिहिलेल्या डायरीवर सिनेमे बनविल्या गेले. तिने लिहीलेल्या पुस्तकाला  खूप पुरस्कार मिळाले ,ते राहत असलेले ठिकाणास museum म्हणून घोषित करण्यात आले.

तुम्हाला आमचा anne-frank-information-in-marathi-2022 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला भेट देऊ शकता.

संदर्भ : google

 

 

 

Spread the love

Leave a Comment