आयरन लेडी इंदिरा गांधींचा इतिहास माहिती 2021 | Indira Gandhi Information In Marathi

indira gandhi information in marathi | आयरन लेडी इंदिरा गांधींचा  इतिहास आयरन लेडी इंदिरा गांधींचा इतिहास माहिती 2021 | indira gandhi information in marathi

आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कारकीर्द क्रांतिकारकच राहिली आहे. भारतासारख्या पारंपारीक रिती-भाती असलेल्या देशात त्या पंतप्रधान पदी पोहोचल्या ही विशेष बाब आहे. जेव्हा स्त्रियांना विशेष असे स्वातंत्र्य नव्हते तेव्हा इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून विराजमान होत्या. इंदिरा गांधी यांच्यात प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता होती. त्यामुळेच त्यांना आयरन लेडी असे म्हणतात. अशा या आयरन लेडीने घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयांचा मागोवा आजच्या Indira Gandhi Information In Marathi या लेखात घेऊ या.

बँकांचे राष्ट्रीयीकरण –

इंदिरा गांधी (indira gandhi work) यांनी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे होय. इंग्रजांनी केलेल्या आर्थिक शोषणाचे परिणाम स्वातंत्र्यानंतर दिसू लागले होते. आपल्या देशात प्रचंड प्रमाणात आर्थिक विषमता होती. मोजक्या लोकांकडे प्रचंड संपत्ती तर उर्वरित लोक अत्यंत हलकी मध्ये जगत होते. त्या काळात भारतातील ज्या 14 मोठ्या बँका होत्या त्यांच्याजवळ देशामधील 80 टक्के संपत्ती होती.

या बँकांवर काही मोजक्या श्रीमंत लोकांचे वर्चस्व होते. बँकांकडून सर्वसामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचे सहाय्य मिळत नव्हते. बँकांमधील ही संपत्ती देशाच्या विकासासाठी उपयोगात यावी यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी काही पावले उचलली. त्यानुसार त्यांनी 19 जुलै 1969 ला काढलेल्या सूचनेनुसार भारतातील 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. ‘बँकिंग कंपनी ऑर्डिनन्स’ म्हणून या सूचनेला ओळखले जाते. कालांतराने याच नावाने विधेयक संमत केल्या गेले आणि पुढे कायद्यात रूपांतर झाले. या 14 बँकांमध्ये पुढील बँका होत्या.

1) अलाहाबाद बँक

2) बँक ऑफ इंडिया

3)बँक ऑफ बडोदा

4) बँक ऑफ महाराष्ट्र

5) कॅनरा बँक

6) सेंट्रल बँक ऑफ इंडिया

7) देना बँक

8) इंडियन बँक

9) पंजाब अँड सिंध बँक

10) सिंडिकेट बँक

10) इंडियन ओव्हरसिस बँक

11) युको बँक

12) पंजाब नॅशनल बँक

13)  युनायटेड बँक ऑफ इंडिया.

त्यावेळेस केवळ एसबीआय ही एकमेव शासकीय बँक होती.

जोपर्यंत बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते तोपर्यंत या बँका केवळ काही विशिष्ट श्रीमंत लोकांना कर्ज द्यायचे. बँकांच्या सुविधांचा लाभ विशिष्ट वर्गासच मिळत असे. मात्र राष्ट्रीयीकरण झाल्यावर सर्वसामान्य लोकांना बँकेच्या सुविधांचा लाभ मिळू लागला.आर्थिक केंद्रीकरण थांबले. सर्वसामान्य लोकांना, छोट्या व्यापाऱ्यांना कर्जे मिळू लागली. यातून बँकेतील संपत्तीचे विकेंद्रीकरण होण्यास मदत झाली. बँकवरील श्रीमंतांचा प्रभाव कमी झाला.

See also  राजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Woman Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur

राष्ट्रीयीकरणामुळे बँकांना लोन पोर्टफोलिओ मध्ये 40 टक्के कृषी कर्ज देणे अनिवार्य केले.देशाच्या विकासासाठी आवश्यक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात आली.  त्यामुळे देशाच्या विकासाचा पाया रचला गेला. जुलै 1969 पर्यंत आपल्या देशात वरील बँकांच्या फक्त 8322 शाखा होत्या. यानंतर मात्र 1994 पर्यंत 60 हजार पार शाखा पोहोचल्या. 1980 मध्ये आणखी सहा खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

बँकांचे राष्ट्रीयीकरण हे देशहिताच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास एक महत्त्वपूर्ण अशी क्रांतिकारक घटना ठरते. त्यामुळे देशाचा चौफेर विकास करणे सोईचे गेले.

संस्थानिकांचे भत्ते बंद –

15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला. तेव्हा भारतामध्ये सुमारे 600 च्या आसपास संस्थाने होती. ही संस्थाने सुद्धा स्वतंत्र झाली. तत्कालीन करारानुसार ही संस्थाने एक तर स्वतंत्र राहू शकली असती किंवा भारत वा पाकिस्तान या देशांमध्ये सामील झाली असती. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कौशल्याने व मुत्सद्देगिरीने ही संस्थाने भारतात सामील केली. संस्थानिक आणि भारत सरकार यांच्यात करार झाला. त्यानुसार भारत सरकार तर्फे संस्थानिकांना दरवर्षी राजभत्ता प्रदान केला जात होता.परंतु इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये संविधानात दुरुस्ती करून संस्थानिकांचा भत्ता बंद केला.

पाकिस्तानची फाळणी – बांगलादेशची निर्मिती –

अखंड भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली. त्यानुसार मुस्लीम बहुल भाग पाकिस्तान बनला. बंगालचे विभाजन करून बंगालचा पूर्व पाकिस्तान बंगला. या पूर्व पाकिस्तानातील जनतेच्या वाटेला भेदभाव आला. पश्चिम पाकिस्तानच्या तुलनेत पूर्व पाकिस्तानच्या जनतेच्या वाटेला कायम पाकिस्तानी लष्कराच्या वर्चस्वाखाली राहावे लागत होते.पाकिस्तानी लष्कर आपल्याच जनतेवर अत्याचार करीत होते. पूर्व पाकिस्तानच्या वाटेला केवळ अन्याय आला. तेव्हा शेख मुजीबुर रहमान यांनी पूर्व पाकिस्तानच्या स्वायत्त्ततेसाठी लढा दिला. अशाप्रकारे पूर्व पाकिस्तानमध्ये गृहयुद्धास सुरुवात झाली. अशा या गृहयुद्धामुळे जवळपास दहा लाख बांगला शरणार्थी लोक भारतात आले. त्यामुळे भारतावरही आर्थिक संकट निर्माण झाले.भारताने या गृहयुद्धात हस्तक्षेप करावा असे, पूर्व पाकिस्तानातील जनतेला वाटत होते. त्यातूनच 1971 चे भारत-पाक युद्ध झाले.आयरन लेडी इंदिरा गांधींचे इतिहास माहिती 2021 | indira gandhi information in marathi

See also  Lata Mangeshkar Biography In Marathi | लता मंगेशकर यांच्या विषयी माहिती

भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मुत्सद्देगिरी यामुळे पाकिस्तानचा जबरदस्त पराभव झाला या युद्धात झाला.  केवळ 11 दिवसात पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले. ऑपरेशन ट्राईडेंट अंतर्गत पाकिस्तानातील कराचीवर भारतीय नौसेनेने जबरदस्त हल्ला केला. यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कणखर वृत्तीचे दर्शन घडते. जेव्हा ॲडमिरल एस. एम. नंदा यांनी नौसेनेने कराचीवर हल्ला करण्याबाबत विचारले. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या ‘ इफ देअर इज अ वॉर, देअर इज अ वॉर ‘ . म्हणजे जर युद्ध आहे तर युद्ध आहेच. पाकिस्तानचे जवळपास 93 हजार सैनिक युद्धकैदी बनले.

भारत – पाक युद्धाच्या वेळेस अमेरिकेचा प्रचंड दबाव भारतावर आला. परंतु इंदिरा गांधींनी हा दबाव झुगारून दिला. रशिया सोबत महत्त्वपूर्ण लष्करी करार करून पाकिस्तान व अमेरिकेच्या मनसुब्यावर पाणी फेरले. पाकिस्तानच्या विनाशर्त शरणागती नंतर पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश हा एक नवीन देश निर्माण झाला. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आशिया खंडाचा केवळ इतिहासच म्हणजेच Indira Gandhi information in marathi नाही बदलला तर भुगोलही बदलला. माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींच्या या कार्याचे कौतुक केले होते. त्यावेळी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींचा उल्लेख ‘ दुर्गा ‘ असा केला होता. ज्यांना सुरुवातीला ‘ गुंगी गुडिया’ म्हटले गेले त्या शेवटी ‘ दुर्गा ‘, आयरन लेडी ‘ ठरल्या.

भारताची पहिली यशस्वी अणुचाचणी –

भारत स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तान व चीन या देशांत सोबत आपले युद्ध झाले. चीन सोबतच्या युद्धात आपण हरलो. या दोन्ही देशांसोबत सीमेवर आपल्या चकमकी सुरूच होत्या. तेव्हा शत्रुवर वचक ठेवण्यासाठी आपला देश आण्विक शक्तीने संपन्न असणे आवश्यक होते. परंतु आण्विक तंत्रज्ञान कोणताही देश पुरवत नव्हता. तसेच अमेरिकेचे जागतिक वर्चस्व झुगारून अणु संशोधनाचे कार्य करणे कठीण काम होते.परंतु भारताने अणु संशोधन सुरू ठेवले.

See also  Pablo Picasso Informmation In Marathi 2021 | पाब्लो पिकासोबद्दल माहिती

जागतिक गुप्तहेर संघटनांना हुलकावणी देत 18 मे 1974 ला भारताने पहिली अणुचाचणी केली. ही चाचणी पोखरण येथे घेण्यात आली. या चाचणीला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्मायलिंग बुद्धा असे नाव दिले. राजस्थान मधील जैसलमेर पासून सुमारे 140 किलोमीटर लांब मलका या गावात ही चाचणी केली. अणुचाचणी घेतल्यावर अमेरिकेसहित पूर्ण जग चकित झाले. कारण अमेरिका , इस्राएल , पाकिस्तान आणि चीन या देशांच्या गुप्तहेर संघटना यांना या सुगावा देखील लागला नाही. या चाचणी नंतर अमेरिकेने भारतावर काही निर्बंध लावले. परंतु इंदिरा गांधींनी हे एक प्रकारचे आव्हान म्हणून स्वीकारले. भारत अण्वस्त्र संपन्न बनण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते.

या चाचणीमुळे भारत अण्वस्त्रधारी झाला आणि शत्रूवर वचक निर्माण झाला.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार –

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही मोहिम इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीतील सर्वात संवेदनशील तसेच वादग्रस्त मानली जाते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली फुटीरतावादी विचारसरणीचे लोक एकत्र आले. त्यांनी स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली. खलिस्तानच्या मागणीचा जोर वाढू लागला. खलिस्तानवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र अमृतसर मधील सुवर्ण मंदिरात लपवून ठेवली होती. पंजाबमधील परिस्थिती बघता पंतप्रधान इंदिरा गांधींनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या मोहिमेअंतर्गत कारवाई केली. त्यानुसार भारतीय सैन्याने कारवाई केली. त्यात सुवर्णमंदिरात लपलेल्या खलिस्तानवादी व सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे खलिस्तानवाद्यांचा बिमोड केला. परंतु ही कारवाई  फार महागात पडली. याची प्रतिक्रिया म्हणून इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शीख सुरक्षा रक्षकांकडून केल्या गेली. देशात शीख विरोधी दंगली पेटल्या आणि भारताने आपल्या आयरन लेडी गमावली.

पंतप्रधान इंदिरा गांधी (indira gandhi work)  ह्या जगातील सामर्थ्यशाली नेत्यांमध्ये गणल्या जातात. खरोखरच त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता त्या ‘ आयरन लेडी ‘ ठरतात.

आपण ह्या पोस्ट मध्ये इंदिरा गांधीं बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Rajkumari Amrut Kaur बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

शेती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी.कॉम ला नक्की भेट दया .

Spread the love