Lata Mangeshkar Biography In Marathi | लता मंगेशकर यांच्या विषयी माहिती
आजच्या युगात लता मंगेशकर lata-mangeshkar-biography-in-marathi यांना ओळखत नसलेला व्यक्ती होऊच शकत नाही.लतादीदींच्या आवाजाची जादूच काही वेगळी आहे. साक्षात माता सरस्वतीच जणू काही त्यांच्या मुखातून गायन करते आहे.तब्बल सहा दशक त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी २५ भाषांमध्ये ५०,००० पेक्षा जास्त गाणी म्हटली.सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा रेकॉर्ड पण त्यांच्याच नावावर आहे.
लता मंगेशकर यांचे प्रारंभिक जीवन :
स्वर्गीय लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेम्बर १९२९ मध्ये मध्यप्रदेशमधील इंदूर येथे एका गायक घराण्यात झाला. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक आणि नट दिनानाथ मंगेशकर यांच्या त्या जेष्ठ पुत्री होत्या. लहानपणा पासूनच लाताजींना कुटुंब मधेच संगीताचे शिक्षण मिळाले.पण त्यांच्या वडिलांना लाताजीनी चित्रपटासाठी गाणी म्हणणे पसंत नव्हते. आणि म्हणूनच त्यांनी वसंत जोगळेकर यांनी निर्देशित केलेला चित्रपट कीर्ती हसाल यातील लताजींच्या आवाजातील गाणे काढून टाकले.
असे म्हणतात कि लतादीदींचे वडील उत्तम भविष्यकार पण होते, त्यांनी लता लहान असतानाच सांगितले होते कि ती मोठी होऊन उत्तम गायिका होणार. पण हे सर्व बघायला मी जिवंत असणार नाही. आणि झाले ही तसेच लतादीदी तेरा वर्षाच्या असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तेरा वर्षाच्या लाताजींवर येऊन पडली. लताजींचे भावंड म्हणजे आशा,उषा,मीना आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर हे होत. लहान असतांना त्यांनी काही चित्रपटात बालकलाकार म्हणून पण काम केले.
लता मंगेशकर यांना लहान असतांना हेमा म्हटले जायचे. पण नंतर त्यांच्या वडिलांनी” भाव बंधन “या नाटकातील नायिकेच्या नावावरून लता हे नाव ठेवले. लता दीदी फक्त ५ वर्षाच्या होत्या जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या संगीत नाटकासाठी बालकलाकार म्हणून काम केले.
वयाच्या ९ व्या वर्षापासूनच त्यांनी शास्त्रीय संगीतात जम बसविला. शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण उस्ताद अमानत खान,बडे गुलामआली खान पंडित तुलसीदास शर्मा अमानत खान देवसल्ले यांच्याकडे घेतले. १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी फक्त १३ वर्षाच्या लाताजींवर येऊन पडली.
हे ही वाचा : इंदिरा गांधी यांच्याबाबत माहिती
नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक हे लताजींच्या वडिलांचे जिवलग मित्र होते त्यांनीच लता मंगेशकर यांच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी मदत केली. लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यासाठी मदत केली. त्यांनी त्यांच्या “पहिली मंगळा गौर “या मराठी चित्रपटात एक छोटीसी भूमिकापण दिली .त्यामध्ये लताजींनी एक गाणे पण म्हटले आहे.
लताजी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात जरी मराठी गायिका आणि अभिनेत्री म्हणून केली असली तरी पुढे जाऊन त्या हिदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध गायिका बनल्या.
लता मंगेशकर यांची हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून सुरवात : lata-mangeshkar-biography-in-marathi
१९४३ मध्ये एका मराठी चित्रपटात त्यांचे हिंदी गाणे आले. गजाभाऊ या चित्रपटातील हे गाणे असे होते, “माता एक सपूत कि दुनिया बदल दे तू”. पुढे त्या १९४५ मध्ये मास्टर विनायक कंपनी सोबत मुंबईला गेल्या. तेथे जाऊन त्यांनी उस्ताद अमानत आली खान यांच्या कडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकल्या. अनेक संगीतकारांनी त्यांना खूप पातळ आवाज आहे म्हणून नाकारले सुद्धा .
त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांनीसुद्धा लताजी यांच्या मराठी मिश्रित उद्गारावरून खोचक शेरा मारला होता. पण लताजी यांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी तेव्हाच्या दिग्गज उर्दू गायकांकडे जाऊन उर्दू शब्द उच्चारण्याचे प्रशिक्षण घेतले.
लताजी यांनी त्यांच्या जीवनात अनेक गाणी म्हटली. त्यांच्या आवाजाने कधी कोणाला रडविले तर कधी कोणाला हसविले,कोणाला प्रेमाची जाणीव करून दिली आणि सीमेवर असणाऱ्या सैनिकांचा उत्साह वाढविला. लतादीदी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस नेहमीच चप्पल बाहेर काढून जात असत.
लता मंगेशकर त्यांच्या आयुष्यात फक्त एकाच दिवस शाळेत गेल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी त्या आपल्या सोबत आशाजी यांना घेऊन गेल्या होत्या. पण शिक्षकांनी आशा यांची शाळेची फी भरल्याशिवाय त्यांना शाळेत बसता येणार नाही असे म्हटले. या गोष्टीचा लताजी यांना खूप राग आला आणि त्या नंतर कधीच शाळेत नाही गेल्या. आणि शाळेत न जाताच त्यांना त्यांच्या असमान्य कर्तुत्वाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीसोबत इतरही बऱ्याच विद्यापीठाच्या पदवी मिळाल्या.
लताजी यांना १९५८ मध्ये मधुमती या चित्रपटात सलील चौधरी यांनी स्वरबद्ध केलेले आजा रे परदेसी या गाण्यासाठी सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका असा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. १९६२ मध्ये लताजींना दुसरा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. १९६३ मध्ये त्यांनी आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर ये मेरे वतन के लोगो हे गीत गायीले. हे गीत जे सी रामचंद्र यांनी संगीत बद्ध केले होते. या देशभक्तीपर गीतात असा काही जीव ओतला की नेहरू यांच्यासुद्धा डोळ्यात अश्रू आले.
लताजी यांच्या नावावर बरेच सन्मान आहेत .पण भारतात दिल्या जाणारे सर्वोच्च सन्मान म्हणजे भारतरत्न ,पद्म विभूषण ,पद्म भूषण हे सुध्दा मिळाले.
लता मंगेशकर यांचा मृत्यू : lata-mangeshkar-biography-in-marathi
६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी कोविड संक्रमण मुळे मृत्यू झाला.त्या ९२ वर्ष जगल्या. लतादीदी यांनी तब्बल ६ दशकं लोकांच्या मनावर राज्य केलं. अशा या स्वराच्या देवीला शतशः प्रणाम. त्यांच्या गाण्यासोबतच त्यांचे राहणीमान पण उत्तम होते जास्त भडकपणा त्यांना आवडत नसे. त्या कायमच पांढरा रंगाच्या साडीत वावरल्या. आवाजात नम्रता होती. काही चूक असेल तर मला परत बोलवा म्हणणाऱ्या लता संगीत दिग्दर्शकाच्या पहिली पसंत होत्या. इतर नवीन गायकांनाह फिल्मफेअर मिळवा म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड नाकारणाऱ्याही लतादीदीच होत्या.
आपल्या कुटुंबाचा सांभाळ करता करता मात्र स्वतः एकट्याच राहिल्या. पण पूर्ण जगाला आपलेसे करून या जगाचा लतादीदी यांनी अखेरचा निरोप घेतला. असंख्य वर्षानंतरही त्या आपल्या मनात कायम जिवंतच राहतील. अश्या या स्वरकोकीलेला त्रिवार मानाचा मुजरा.
तुम्हाला आमचा lata-mangeshkar-biography-in-marathi हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला भेट देऊ शकता.
संदर्भ : गुगल