स्मिता पाटील माहिती मराठी | Smita Patil Information In Marathi

स्मिता पाटील माहिती मराठी | Smita Patil Information In Marathi

Smita Patil Information In Marathi
सौजन्य : Govt. of India

आजच्या या लेखात आपण स्मिता पाटील (Smita Patil Information In Marathi) या लोकप्रिय अभिनेत्री बद्दल माहिती घेणार आहोत. स्मिता पाटील या मराठी कन्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंत्र्याची मुलगी असल्यावरही त्यांच्यामध्ये अहंकाराचा लवलेश नव्हता. पण हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांची कारकीर्द वाखाणण्यासारखी आहे.

जन्म आणि शिक्षण  :

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोम्बेर १९५५ मध्ये पुण्यात
झाला. पुण्यातीलच रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून त्यांचे
शिक्षण झाले. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराव गिरधर पाटील एक राजकारणी होते. तर त्यांची आई समाजसेविका होत्या.स्मिता पाटील यांनि अभिनयाचे शिक्षण पुण्यामधील फिल्म and टेलिव्हिजन institute ऑफ इंडिया येथून घेतले.

 स्मिता पाटील यांच्या चित्रपटाची सुरवात : Smita Patil Information In Marathi

स्मिता पाटील यांनी  सुरवातीला दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून काम केले. असे म्हणतात कि त्या दूरदर्शनच्या सेटवर जातांना टी शर्ट आणि जीन्स घालून जायच्या आणि तिथे गेल्यानंतर जीन्सवरच साडी घालायच्या. श्याम बेनेगल यांनी एकदा स्मिता यांना वृत्त निवेदन करतांना बघितले आणि त्यांच्यातील अभिनय क्षमता ओळखली. त्यांनी १९७५ मध्ये स्मिता पाटील यांना  पहिला ब्रेक दिला. चरण दास चोर या चित्रपटात रोल दिला आणि त्यांनीही संधीचे सोने केले. त्यांचा नैसर्गिक अभिनयाचे सगळीकडून कौतुक झाले.  त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही.

हे ही वाचा : इंदिरा गांधी यांच्याबाबत माहिती 

स्मिता पाटील यांचे कामाप्रती समर्पण :

स्मिता या त्यांच्या कामाप्रती खूप प्रामाणिक होत्या.सहज अभिनय करण्यात त्या माहीर होत्या. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल त्यांच्या आठवनींना उजाळा देत सांगतात कि मंथन चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस स्मिता काही गावातील बायकांसोबत  त्यांचा सारखेच कपडे घालून बसली होती आणि तिथे काही कॉलेजचे विद्यार्थी आले आणि त्यांनी विचारले कि फिल्मची हिरोईन कोणती आहे? जेव्हा स्मिता यांच्या कडे इशारा केला तेव्हा तुम्ही मस्करी तर नाही ना करत. ही गावातील बाई मुंबईच्या चित्रपटातील हिरोईन कशी होऊ शकते, असे ते उद्गारले. हीच खासियत  होती स्मिताची त्या इतका सहज अभिनय करायच्या कि जणू ती व्यक्तिरेखा म्हणजे त्याच आहेत.

See also  आयरन लेडी इंदिरा गांधींचा इतिहास माहिती 2021 | Indira Gandhi Information In Marathi

केतन मेहता सांगतात कि मिर्च मसाला या चित्रपटाच्या शुटींगसाठी त्यांना आणि  काही सहकलाकारांना खूप उन्हामध्ये लाल् वाळलेल्या मिरच्यांच्या मध्ये शुटींग करायचे होते. तेव्हा त्यांनी खूप उल्हासाने काम केले आणि इतर कलाकारांना सुद्धा प्रोत्साहित केले. ८० च्या दशकात त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटात सुद्धा काम केले. फक्त 10 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ८० चित्रपटात काम केले आणि त्यातही जास्तीत जास्त हीट झाले.

३१ वर्षाच्या काळात स्मिता पाटील यांनी  तब्बल दोन दशक गाजवली. आता मात्र चित्रपटाची कथा त्यांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्या जाऊ लागल्या .१९७७ हे वर्ष त्यांच्या साठी मोलाचे ठरले. या वर्षात त्यांचे दोन चित्रपट आले. भूमिका आणि मंथन हे दोन्ही चित्रपट हिट झाले.कलात्मक चित्रपटातून त्यांना दिग्गज कलाकार ओम पुरी, शबाणा आझमी ,नसरुद्दिन  शहा,अमरीश पुरी,अमोल पालेकर यांच्या सोबत काम करण्याच्या संधी मिळत गेल्या. स्मिता यांनी स्त्री प्रधान भूमिका जास्त केल्या .

स्मिता पाटील यांनी मराठी चित्रपटात सुद्धा आपले वेगळे स्थान निर्माण केले. उंबरठा आणि जैत रे जैत अशा वैशिष्ठ पूर्ण चित्रपटात त्यांनी काम केले.

स्मिता पाटील यांनी व्यावसायिक चित्रपटही केलेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी नमक हलाल आणि शक्ती या चित्रपटात काम केले.

सुपरस्टार अमीताभ बच्चन यांच्या सोबत काम केल्या नंतर का रडल्या ?

‘आज रपट जाये तो हमें ना ..’  हे गाणे स्मिता पाटील यांच्या नमक हराम या चित्रपटातील आहे.  अमिताभ बच्चन म्हणतात कि स्मिता यांची तारीफ करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच नाहीत. हे गाणे चित्रित झाल्या नंतर त्या खूप रडत होत्या. पण अमिताभ यांनी समजाविल्यानंतर त्या समजल्या. स्मिता पाटील ह्या बोल्ड सीन देत नसत. मात्र या गाण्यात त्यांना त्यांच्या ईच्छेविरुद्ध शुटींग करावे लागले.   हे गाणे त्यांना कधीच आवडले नाही पण चित्रपटाच्या वेळी कामिन्टमेंट केली म्हणून हे करावे लागले होते.

See also  Shrinivas Ramanujan mathematician | थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन

स्मिता पाटील यांना मिळालेले पुरस्कार: Smita Patil Information In Marathi

स्मिता पाटील एक सशक्त अभिनेत्री होत्या. १९७७ मध्ये भूमिका या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. भूमिका या चित्रपटापासून सुरु झालेला त्याचा प्रवास मिर्च मसाला,आक्रोश,गिद्ध,निशांत,चक्र अशा एका पेक्षा एक सरस चित्रपटापर्यंत घेऊन गेला. १९८१ मध्ये त्यांना चक्र या चित्रपटासाठी पुन्हा एकदा  राष्ट्रीय पुरस्कार मिळाला .१९८५ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.

खूप कमी कालावधीतच त्यांनी अभिनयाच्या जोरावर तमाम हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीचे लक्ष आपल्याकडे खेचले. बोलक्या डोळ्यांच्या  स्मिताने प्रेक्षकांचीच नाही तर चित्रपट सृष्टीतील दिग्गज मंडळींची मने जिंकली.पण स्मिता पाटील या अल्पायुषी ठरल्या आणि राज बब्बर यांच्या सोबत विवाह झाल्यानंतर पहिल्याच बाळंतपणात त्यांचा मृत्यू १३ डिसेंबर १९८६ ला झाला.त्यावेळी त्या फक्त ३१ वर्षाच्या होत्या.

तुम्हाला आमचा Smita Patil Information In Marathi हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

Spread the love

Leave a Comment