स्वराज्यजननी जिजामाता माहिती | Swarajy Janani Jijamata 2022

स्वराज्यजननी जिजामाता माहिती |  Swarajy Janani Jijamata  2022

swarajy-janani-jijamata-2022

भारताच्या इतिहासात अनेक स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाने आपले नाव अजरामर केलेले आहे. ज्या स्त्रियांनी इतिहास घडविला त्यामध्ये स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ (swarajy-janani-jijamata-2022) यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. राजमाता जिजाऊ यांच्याच प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेने केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचाही इतिहास बदलला. अशा या राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती आजच्या या लेखात आपण घेऊ या.

जिजामाता यांचा जन्म : Swarajy Janani Jijamata yancha janm

जिजामाता यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे 12 जानेवारी १५९८ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव होते तर आईचे नाव म्हाळसाबाई होते.

जिजामाता यांचा विवाह :

जिजामाता यांचा विवाह तत्कालीन मातब्बर सरदार मालोजीराजे भोसले यांचा जेष्ठ मुलगा शहाजीराजे भोसले यांच्यासोबत 1609 मध्ये झाला. शहाजी राजे आणि जिजामाता यांना एकूण आठ अपत्ये झाली. त्यात सहा मुली आणि दोन मुले. त्यांचा मोठा मुलगा संभाजी राजे तर धाकटे शिवराय. संभाजी राजे हे शहाजी राजांच्यासोबत कर्नाटकात होते. तेथे कनकगिरीच्या वेढ्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला अफजलखान कारणीभूत होता. पुढे शिवरायांनी जिजाऊ यांच्याच इच्छेनुसार अफजलखानाला मारले.

जिजामाता यांचे कार्य : swarajy-janani-jijamata-2022

swarajy-janani-jijamata-2022

राजमाता जिजाऊ यांनी केलेले महान कार्य म्हणजे त्यांनी स्वराज्याचे दोन छत्रपती घडविले. छत्रपती शिवाजी महाराज (युगप्रवर्तक राजा : छत्रपती शिवाजी महाराज | Full Shivaji Maharaj Marathi Mahiti 2021 )हे जे आदर्श राज्यकर्ते बनले ते राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळेच. त्यांनी शिवरायांवर अतिक्षय उत्तम असे संस्कार करून युगप्रवर्तक राजा घडविला. शिवरायांना त्यांच्या बालपणी जिजाऊ रामायण , महाभारत यातील कथा सांगत असत. त्यांच्या कोवळ्या मनावर चारित्र्य , न्याय , पराक्रम , धाडस, असे गुण बिंबविले.

See also  History of Shivaji Maharaj 2021 | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षरतेवर शंका घेणारे ग्रँट डफ आणि सर जदुनाथ सरकार यांचा चुकीचा दावा

शहाजी राजे बंगळुरूला गेल्यावर पुण्याची जहागीरीचा कारभार राजमाता जिजाऊ यांच्याच मार्गदर्शनाखाली चालत असे. त्यामुळे राज्यकारभार कसा करावा याचे बाळकडू शिवरायांना बालपणीच मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज( Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार )यांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार राजमाता जिजाऊ यांच्या हस्ते चालत असे. शिवराय जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असताना आणि ते आग्रा येथे असताना त्यांनीच कारभार बघितला. शिवाय महाराज जेव्हा जेव्हा मोहिमेवर जात असत तेव्हा राजमाता राज्यकारभारावर जातीने लक्ष देत असत. वेळप्रसंगी कठीण समयी महाराज ही जिजाऊ यांचा सल्ला घेत असत.

राजमाता जिजाऊ यांना राजकारणाचे धडे माहेरी त्यांचे वडील लखुजी राजे आणि लग्नानंतर पती शहाजी राजे यांच्याकडून मिळाले. त्याचाच फायदा पुढे शिवरायांना मिळाला.

राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू :

राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या ठिकाणी झाला.

राजमाता जिजाऊ यांनी शिवछत्रपतीना घडवून एक युगप्रवर्तक राजा घडविला. इतिहासात राजमाता जिजाऊ यांचे हे कार्य कधीही विसरणार नाही.

तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास नक्की शेअर करा.

तुम्ही आमच्याhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

 

 

Spread the love

4 thoughts on “स्वराज्यजननी जिजामाता माहिती | Swarajy Janani Jijamata 2022”

Leave a Comment