Table of Contents
Shivaji Maharaj Marathi Mahiti 2021 | युगप्रवर्तक राजा : छत्रपती शिवाजी महाराज
(जन्म- 19फेब्रुवारी 1630- मृत्यू,- 3 एप्रिल 1680)
जगाच्या इतिहासात अनेक राजे , चक्रवर्ती सम्राट, बादशहा होऊन गेले पण या सर्वांमध्ये उठून दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणेजच Shivaji Maharaj Marathi Mahiti ! शिवाजी महाराजांचा मृत्यु होऊन 340 वर्षे झाली. तरीही महाराजांविषयी आदर, कौतुक आणि उत्सुकता उत्तरोत्तर वाढत आहे. महाराजांमध्ये असे काय होते की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण कमी न होता वाढतच आहे. त्याबद्दलच आपण या लेखामध्ये महाराजांविषयी म्हणेजच Shivaji Maharaj Marathi Mahiti ( shivaji maharaj history in marathi) जाणून घेऊ या.
1) मराठा साम्राज्याची स्थापना : ( shivaji maharaj history in marathi)
छ. शिवाजी महाराजांचा म्हणेजच Shivaji Maharaj Marathi Mahiti उदय अशा काळात झाला की ज्यावेळेस उभ्या भारतात स्वतंत्र वा सार्वभौम असे राजे बोटावर मोजण्या इतके होते. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही यांच्या अधिपत्याखाली भारत होता. शिवाय इंग्रज, पोर्तुगिज, डच, फ्रेंच आणि सिद्दी हे होतेच. महाराष्ट्रातील पराक्रमी सरदार वरीलपैकी कोणत्यातरी शाहीमध्ये आपला पराक्रम, आपले जीवन,खर्च करीत होते.
युद्ध बादशहाचे पण रक्त वाहत होते मराठ्यांचे ! मुघल,आदिलशाह,निजामशाह अणि कुतुबशाह यांची सत्तेसाठी आपापसात जोरदार संघर्ष सुरु होता. हे सुलतान आपल्या साम्राज्यविस्तारासाठी लढत होते पण युद्धात मरत होते येथील मराठे. लेकी-सुना विधवा होत होत्या. मराठ्यांचे ही आपापसात पटत नव्हते. सर्वसामान्य रयतेचा तर कोणीच वाली नव्हता.
रयतेचे असे हे हाल बघून जिजामाता अणि राजे व्यथित होत. जिजामातेचे संस्कार आणि शहाजी राजे यांची प्रेरणा यातून स्वराज्याची संकल्पना महाराजानी जोपासली. वतनासाठी जगण्यापेक्षा स्वराज्यासाठी जगा. अशी प्रेरणा त्यानी मराठ्याना दिली. ‘हे राज्य होणे ही श्रींची इच्छा आहे’ असे ध्येय सर्वांसमोर ठेऊन स्वराज्याच्या कार्यास सर्वांना प्रवुत्त केले. अशा परिस्थितीत त्यांनी मराठा समाजाला एकत्र आणले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
2) उत्तम प्रशासक : ( shivaji maharaj history in marathi)
लोककल्याणकारी राज्य करण्याचे ध्येय समोर ठेवून महाराजांनी प्रशासनाची उत्तम घडी बसवली. केंद्रीय प्रशासन व्यवस्थेत त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. यामध्ये 1. पेशवा 2.अमात्य 3. दानाध्यक्ष्य किंवा पंडितराव 4. सेनापती 5. वाकनीस वा मंत्री 6. सुमंत 7. सूरनीस वा सचिव 8. न्यायाधीश. या पदांची निर्मिती केली. अष्टप्रधान मंडळ महाराज्यांच्या नेतृत्वाखाली कामे पार पाडीत. न्यायाधीश आणि पंडितराव खेरीज इतर मंत्र्याना मोहिमेवर जावे लागे. कोणतेही पद वंशपरंपरागत नसे. कर्तुत्व आणि निष्ठां या निकषावर पद दिले जाई. मंत्र्याना वतने वा जहागिरी न देता रोख वेतन दिले जाई.
केन्द्रीय राज्यकारभाराची विविध कार्यांची विभागणी अठरा कारखाने व बारा महालातुन केलेली होती. स्वतंत्र अधिकारी व हिशोब ठेवणारे कारकुन नेमलेले होते. प्रांतीय प्रशासन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी स्वराज्याचे चार सरसुभे पाडले होते. त्यावरच्या प्रमुखास सरसुभेदार म्हणत होते. सरसुभ्याचे प्रांत किंवा सुभा, यावरील प्रमुखास सुभेदार म्हणत होते. सुभ्याचे परगणा, यावरील प्रमुखास सर हवालदार असे म्हणत. परगण्याचे महाल,या वरील प्रमुखास हवालदार असे म्हणत. शेवटचा खेडे, याचा कारभार पाटिल, कुलकर्णी , महाजन या स्थानिक अधिकार्यांकडून पाहिल्या जात असे. अशाप्रकारे प्रांतीय प्रशासन व्यवस्थेचे विभाग पाडले होते.
पारंपारीक महसूल व्यवस्थेत सुधारणा केल्या. वतने खालसा केली. रयतवारी पध्दतीने जमीन महसूल गोळा केल्या जाऊ लागला. रयतेची पिळवणूक थांबाली. जमीनदारांवर वचक निर्माण झाला. जमिनीची मोजणी, प्रतवारी व उत्पन्न यानुसार महसूल गोळा केल्या जाऊ लागला. साधारणता उत्पन्नाचा 2/5 इतका महसूल रोख वा धान्याच्या स्वरूपात वसूल केल्या जाई. याखेरीज आयात – निर्यात , जकात , जंगल उत्पन्न, टाकसाळ, मासेमारी व इतर व्यवसायावर ही महसूल गोळा केल्या जात असे.
हे ही वाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार
3) उत्कृष्ट सैन्यव्यवस्था व युद्ध कलेचा योग्य वापर : (shivaji maharaj history in marathi)
शत्रूच्या तुलनेत महाराजांचे सैन्य नगण्यच होते. तरीही त्यांनी अनेक नेत्रदीपक विजय मिळविले. याचे कारण त्यांनी आपली सैनिकव्यवस्था उत्तम ठेवली. तोफखाना,हत्ती असे अवजड व संथ घटक त्यांच्या सैन्यात नसे. त्यामुळे वेगवान हालचाली करणे सहज शक्य असे. गनिमी काव्याचा उत्कृष्ट वापर महाराजांनी केला. शत्रूला बिकट ठिकाणी हेरून अकस्मात् पूर्ण ताकदीने जोमदार हल्ला चढविणे त्यामुळे सैन्यदल कमी असल्यावरही महाराजांनी मोठ मोठ्या फौजांचा पराभव केला.
हे ही वाचा : छ. संभाजी महाराज यांच्याविषयी माहिती
महाराजांनी योग्य माणसे निवडली होती. महाराजांना व्यक्तीच्या गुणांची पारख होती. मुरारबाजी, बाजीप्रभू, तानाजी,बहिर्जी असे कितीतरी नररत्ने महाराजांनी हेरली होती. हेरखाते जागते ठेवले. अचूक माहिती व नियोजन आणि त्याची योग्य अंमबजावणी करणे. त्यामुळे हमखास यश मिळे.किल्ल्यांची डागडुजी वा नवनिर्मिती अशी केली की जिंकावयास कठीण.
समुद्र किनाऱ्याकडे महाराजांनी दुर्लक्ष केले नाही. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग असे किल्ले बांधले कोळी,भंडारी यासारख्या पश्चिम किनारपट्टीवरच्या जातींचा आरमारात समावेश केला. गलबत,गुराव,शीबाड, तरांडी, तारु,माचवा यासारखी जहाजे बांधली. दर्यासारंग, मायनायक अशी आरमारातिल पदे निर्माण केली. आरमार उभारणीसाठी पोर्तगिज तंत्राचा वापर केला. पश्चिमेंकडील समुद्रात भगवा झेंडा असलेली जहाजे दिमाखात वावरत होती. अशाप्रकारे सिद्दी,इंग्रज,पोर्तुगीज, डच व फ्रेंच यांच्यावर वचक ठेवला.
हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा लाल महालावर छापा
4) प्रजा व स्त्रिया यांची काळजी घेणारा राजा : (history of shivaji maharaj)
स्वराज्यात प्रजा व स्त्रिया तसेच धार्मिक स्थळे यांची दक्षता घेतली जात असे. स्त्रियांच्या अब्रुवर जर कोणी हात टाकत असेल तर त्याला कडक शिक्षा होई.रांझ्याच्या पाटलाची गोष्ट सर्वश्रुत आहेच. जमीनदार – वतनदार यांच्या जाचापासून सर्वसामान्य प्रजेचे रक्षण केले. मशिदीलाही धक्का लावू नये अशी सैन्यास सक्त ताकीद होती. मोहिमे दरम्यान शेतीची नासाडी होऊ नये यासाठी महाराज दक्ष होते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये.
जे लागेल ते विकत घ्यायचे असा सक्त आदेश सैन्यास होता. या अगोदर राजा बदलला तरी सर्वसामान्य प्रजेच्या जीवनात फरक पडत नसे. जे अत्याचार व्हायचे ते व्हायचेच. परंतु स्वराज्यात परिस्थिती बदलली. राजा लेकरांसारखी काळजी घेत असे. न्याय मिळत असे. अत्याचार करायची कोणी हिम्मत करत नसे. त्यामुळे हा राजा आणि हे राज्य प्रजेला स्वतःचे वाटत असे. शिवाय महाराजांच्या आज्ञापत्रात महाराजांचे व्यक्तिमत्व दिसून येते.
हे ही वाचा : छ. शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ?
5) उत्कृष्ट नियोजन व उत्तम हेरखाते : (history of shivaji maharaj)
उत्कृष्ट नियोजन हा यशाचा पाया असतो. एखादी मोहीम असो वा किल्ला बांधणी, महाराज अगोदर नियोजन करीत. प्लॅन A सोबत प्लॅन B सुद्धा तयार असे. वेळेवर पाहू,करू असे त्यांचे कधीही नसे. त्यामुळे त्यांना हमखास यश मिळे. क्वचितच अपयश पदरी पडे. शिवाय बहिर्जी नाईकच्या नेतृत्वाखाली हेरखात्याचा उत्कृष्टपणे केलेला वापर, त्यामुळे महाराजांनी अशक्य वाटायचे ते शक्य करून दाखविले. बहिर्जी नाइक हा राजांचे तिसरे नेत्रच होते. बहिर्जी नाइक कडून प्राप्त माहितीतुन महाराज मोहिमेची आखणी करीत आणि त्याची योग्य अमलबजावणी करीत. त्यामुळेच अफजलखान प्रसंग,पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणे,लाल महाल कामगिरी, सुरतेच्या मोहिमा आणि आग्र्यातून सुटका अशा कितीतरी मोहिमा त्यांनी फत्ते करून दाखविल्या.
6) थोर मुत्सद्दी : (history of shivaji maharaj)
महाराज म्हणेजच Shivaji Maharaj Marathi Mahiti थोर मुत्सद्दी होते. शहाजी राजांची सुटका करण्यासाठी मुघल बादशहा शाहजहान शी बोलणी केली आणि आदिलशहाला शहाजी राजांची सुटका करण्यास भाग पाडले. अफजल खान जेंव्हा स्वराज्यावर चालून आला तेंव्हा सावध पवित्रा घेत त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशीआणले आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी कमालीच्या धैर्याने,शौर्याने आणि मुत्सद्दीपणे अफजल खानास मारले.
सिद्दी जोहरशी बोलणी करुन त्यास गाफिल ठेवले आणि विशालगडाला सहीसलामत पोचले. सुरतेच्या लुटीच्या प्रसंगी इंग्रजांशी संघर्ष वाढवीला नाही. पुरंदर चा तह स्वीकार करणे व त्याद्वारे पुढील विनाश न होऊ देणे. आग्र्याच्या कैदेतुन यशस्वी सुटका करुन सर्व जगाला थक्क केले. अशा अनेक प्रसंगी महाराजानी आपल्या मुत्सद्दीगिरिने काम फत्ते केले.
हे ही वाचा : शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे महत्व
7) पुरोगामी विचारांचा राजा : (history of shivaji maharaj)
महाराज म्हणेजच Shivaji Maharaj Marathi Mahiti अंधश्रद्ध नव्हते, धर्मांध तर अजिबात नव्हते. राजे खरोखर पुरोगामी विचारांचे होते. त्यांच्या कित्येक कृतीतून हे सिद्ध होते. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर राजमाता जिजाऊ सती जाण्यास निघाल्या तेंव्हा त्यांना महाराजांनी रोखले. नेतोजी पालकर, निंबाळकर यांना परत हिंदू धर्मात घेतले व त्यांच्या सोबत सोयरिक केली.
राजाराम राजे जेंव्हा पालथे जन्मास आले तेंव्हा त्यांनी बाळराजे मुघलशाही पालथी घालतील असे उद्गार काढले. खऱ्या अर्थाने महाराज पुरोगामी विचारांचे होते.खरोखरच महाराजांनी काळोख्या,भयाण अंधारातून तेजाकडे, अधर्माकडून धर्माकडे, अन्यायकडून न्यायाकडे जाणारे, प्रजेला आपले वाटणारे स्वराज्य स्थापन केले. जणू “नूतन सृष्ट्रीच निमार्ण केली”.
महाराजांचे कुशल संघटन , द्रष्टेपणा, परिस्थितीचे अचूक आकलन ,योग्य निर्णयक्षमता, नियोजनबध्द अमलबजावणी, प्रजेच्या कल्याणाची भावना, मुत्सद्दीपणा, धैर्य, न्यायबुद्धी आणि सर्वात महत्त्वाचे पराभवातून ही जिद्दीने उभरण्याची नवी उमेद. अशा अनेक गुणांमुळे महाराजांचे व्यक्तिमत्व असाधारण ठरते. जगाच्या इतिहासात असा राजा म्हणजेच Shivaji Maharaj Marathi Mahiti झाला नाही.
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com वेबसाईटला भेट देऊ शकता .
छत्रपती शिवाजी महाराज की जय
thank you sir
चांगली आनी दर्जेदार माहिती
thank you sir
शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाविषयी परिपूर्ण माहिती देणारा सर्वांगसुंदर लेख.
thank you sir
Chatrapati Shivaji maharaj ki jay…
thank you
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay
Thank you 🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती वाचून आपल्या अंगाला कटाच येतो. इतके महान होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे सर खूप खुप धन्यावद इतकी छानमाहिती दिल्याबद्दल.
Thank you sir