प्रतापगडाच्या पायथ्याशी 2021 | Pratapgad Makes History In Marathi

  प्रतापगडाच्या पायथ्याशी | Pratapgad Makes History In Marathi

         छ. शिवाजी महाराजांच्या वाढत्या पराक्रमामुळे पुरा आदिलशाही दरबार चिंताग्रस्त झाला. राजांनी जावळी घेतल्यावर आदिलशाही खळबळून जागी झाली. मुठभर सैन्यानिशी शिवाजीराजे भोसले ( history of shivaji maharaj) आदिलशाहीला आव्हानच कसे देतात याचेच सर्वांना आश्चर्य वाटत होते. रोज नवा इतिहास घडत होता. एकेक मुलुख स्वतंत्र होत होता. राजांच्या या वाढत्या पराक्रमास पायबंद कसा घालावा हा प्रश्न आदिलशाही दरबारासमोर होता.

हे ही वाचा साल्हेरची लढाई

अली आदिलशहा व त्याची सावत्र आई  बडी बेगम साहिबा यांनी शिवाजी महाराजांचा बीमोड कसा करावा यासाठी दरबार भरविला. दरबारातील वातावरण गंभीर होते. अनेक मातब्बर सरदार खाली मान घालून उभे होते. शिवाजी महाराजवरील मोहिमेचा विडा उचलण्याची कोणी हिम्मत करत नव्हते. बादशहा आणि बडी बेगम साहिबा यांचा क्रोध वाढत होता. तेवढ्यात दरबारातील उभ्या असलेल्या सरदारांमधून अत्यंत बलशाली असा धिप्पाड देहाचा सरदार पुढे आला आणि त्याने तबकातील विडा उचलला.

तो सरदार होता अफजलखान(afzal khan) . जेवढा शुर तेवढाच क्रूर,अन् कपटीही. बादशहा, बडी बेगम साहिबा आणि अख्खा दरबार खुष झाला. त्याला कारणही तसेच होते. खानाने जी मोहीम हाती घेतली ती पूर्ण केलीच. त्याला पराजय माहीत नव्हता. शक्तीने आणि कपटानेही त्याने कर्नाटकात अनेक राजांचा पराभव केला. खान कर्तबगार  होता एका सामान्य स्वयंपाकीण स्त्रीचा मुलगा तो .पण स्वतःच्या कर्तबगारीने आदिलशाही दरबारातील एक मातब्बर सरदार बनला होता. अफजलखान अत्यंत कडक शिस्तीचा होता. तो उत्तम प्रशासक होता. न्याय देतांना अफजलखान (afzal khan)पक्षपात करीत नसे. प्रजेच्या हितासाठी तो दक्ष असे. प्रजेला तो ‘पोंगड़े’ म्हणजे मित्र समजे.

         असा हा खान भोसलेंचा वैरी होता. शहाजीराजांना कैद करून यानेच विजापूरला आणले होते. शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांना विश्र्वासघाताने यानेच मारले. आता शिवाजी महाराजांवरील मोहीम मोठ्या आनंदाने खानाने स्वीकारली. चढ्या घोड्यानिशी जाऊन शिवाजीस कैद करून आणतो. अशी गर्जना त्याने दरबारात केली.

हे ही वाचा वेडात मराठे वीर दौडले सात

बादशहा अली आदिलशहाने खानाचा खास सन्मान केला. त्यास मौल्यवान वस्तू तसेच स्वतःची खास कट्यार भेट दिली. सोबतीला बारा हजार घोडदळ, दहा हजार पायदळ,असंख्य हत्ती, उंट, तोफा आणि अगणित खजिना दिला. मुसेखान , हसन खान पठाण, सिद्दी हिलाल, रणदुल्ला खान, नाईकजी पांढरे, प्रतापराव मोरे, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, झुंजारराव घाडगे, रहीमखान आणि सय्यद बंडा असे सुरमा, मातब्बर सरदार दिले. शिवाय खानास सामील होण्याचे फर्मान ही मावळातील वतनदारांना दिले.

अफजलखान (afzal khan) मोहिमेवर निघाला तेंव्हा राजे राजगडावर होते. वाटेत खानाने तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिरांची तोडफोड केली. महाराजांचे मेव्हणे बजाजी निंबाळकर यांना कैद केले. उद्देश हाच की राजे संतापाने बेभान होऊन चालून येतील. मग मोकळ्या मैदानात राजांच्या मुठभर सैन्याचा फडशा पाडता येईल असा खानाचा कयास होता. पण महाराज शांत राहिले. खानाची अफाट ताकद आणि फौज यापुढे आपण टिकणार नाही. सूड घेण्यासाठी गेलो तर सर्वनाश अटळ. त्यामुळे राजांनी विवेकाने प्रत्येक पाऊल उचलण्याचे ठरविले. त्यानुसार राजे राजगडावरून प्रतापगडावर म्हणजेच Pratapgad Makes History In Marathi आले.

See also  Ramsej Fort Information In Marathi 2021 | हा किल्ला जिंकायला मुघलांना तब्बल 5 वर्षे लागली

प्रतापगडाच्या पायथ्याशी विषयी माहिती 2021 | Pratapgad Makes History In Marathi

महाराज प्रतापगडाला म्हणजेच Pratapgad Makes History In Marathi आल्यावर खानही राजांच्या मागावर आला आणि वाईला तळ ठोकला. खानाने आपले काही सरदार स्वराज्यातील काही मुलुखावर सोडले. अशा या कठीण समयी राणीसाहेब सईबाई यांचा मृत्यू झाला. संभाजीराजे केवळ दोन वर्षांचे होते. आधीच खानाचे संकट त्यात राणीसाहेब सईबाई यांचा मृत्यू. पण महाराज धीरोदात्तपणे प्रत्येक प्रसंगाला तोंड देत होते.

शिवाजी महाराजांना शक्यतो वाईलाच भेटीस बोलाऊन कैद करावे वा मारावे या हेतूने आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यास महाराजांकडे पाठवले. खानाच्या वकिलाने शहाजीराजांशी खानाचे असलेले स्नेहसंबंध आणि राजांवरची दयाभावना याचे वर्णन करून खानाचे पत्र महाराजांना दिले. त्यात खानाने सर्व गडकिल्ले, मुलुख स्वाधीन करून शरण येण्यास सांगितले.

खानाच्या वकिलाने महाराजांना वाईला येण्यास खूप आग्रह केला पण महाराजांनी ,आपण खानास खूप घाबरलो आहोत त्यामुळे खानानेच जावळीत येऊन भेटावे असा आग्रह धरला. शिवाय संदेश देण्यासाठी राजांनी आपला वकील म्हणून पंताजी गोपीनाथ बोकील यांना खानाकडे पाठवले. निघण्यापूर्वी महाराजांनी पंताजी गोपीनाथ यांना खानाच्या हेतू विषयी माहिती करून घेण्यास सांगितले.

विश्वासराव नावाचा राजांचा एक हेर खानाच्या छावणीच्या जवळपास फिरत होताच. पंताजी गोपीनाथ यांनी खानाची भेट घेऊन महाराजांचे पत्र खानास दिले आणि महाराज किती घाबरले आहेत याचे रसभरीत वर्णन केले. शिवाजीराजा आपणास घाबरतो हे ऐकुन खान खूष झाला आणि महाराजांनी दिलेले जावळीत येण्याचे निमंत्रणही स्वीकारले. स्वतःच्या ताकदीची घमेंड,अफाट फौज आणि राजांचे घाबरणे यामुळे खानास विजय नजदीक वाटला.

खानाने जावळीत न जाण्याचे काही सरदारांचा सल्ला देखील ऐकला नाही व लष्कराला जावळीकडे कूच करण्याचा आदेश दिला. खानाचा तळ जावळीत येऊन पडला. इकडे महाराज व गडावरील मुख्य मंडळी यांच्यात खलबते सुरू झाली. खानाला भेटायचे, पण कसे ? कोठे ? खानाच्या छावणीत पूर्ण लष्कराच्या गराड्यात जाऊन भेटणे म्हणजे सर्वनाश अटळ ! म्हणून खानालाच त्याच्या लष्करापासून दूर गडाच्या एका ठिकाणी बोलावयाचे ठरले. त्यासंबंधी सर्व तपशील महाराजांनी पूर्ण नियोजन करून तयार केला. त्यासाठी खानाला तयार करणे आवश्यक होते.  तेंव्हा पुन्हा एकदा पंताजी गोपीनाथ यांना खानाकडे महाराजांनी पाठविले.

पंताजी गोपीनाथ यांनी खानाची भेट घेऊन महाराजांचे पत्र खानास दिले आणि महाराज किती घाबरले आहेत याचे वर्णन पुन्हा केले. खान हे ऐकुन खुष झाला. आदिलशाही विरुद्ध बंड करणारा शिवाजीराजा आपणास घाबरतो, आपला किती धाक , दरारा आहे याचा विचार करून खान खूपच खूष होत होता. नंतर पंताजी गोपीनाथ यांनी भेटीविषयीचा मुख्य मुद्दा हाती घेतला.

See also  माधवराव पेशवा विषयी माहिती 2021 | Full Madhavrao Peshwa History In Marathi

त्यानुसार खानाने सोबत दहा अंगरक्षक व दोन – तीन सेवक घ्यावे. सोबत शस्त्र ठेवता येईल. मात्र सैन्य आहे त्याठिकाणीच राहू द्यावे. इकडे राजांनी सुद्धा सशस्त्र यावे. सोबत दहा अंगरक्षक आणावे व खानाची भेट घ्यावी. खान तयार झाला. त्याला केवळ महाराज हवे होते. भेटीचा दिवस ठरला गुरुवार, 10 नोव्हेंबर 1659.

               भेटीच्या दिवसाच्या आदल्या दिवशी गडावर खलबते सुरू होती. रात्री महाराज गडावरील आपले सर्व जिवलग मंडळी सोबत खानाची भेट कशी घ्यायची याबाबत चर्चा करायला बसले. यामध्ये कान्होजी जेधे,बाजी जेधे, येसाजी, तानाजी,नेतोजी पालकर, माणकोजी दहातोंडे, सुभानजी इंगळे, बहिर्जी नाईक इत्यादी मंडळी होती. खानाचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन महाराजांनी चिलखत घालायचे व इतर शस्त्र सोबत ठेवायचे असे ठरले. त्यानंतर महाराजांनी आपल्या प्रमुख सरदारांच्या नेतृत्वाखाली सैन्याचा तुकड्या खानाच्या छावणीच्या जवळपास जंगलात दडून राहण्यास सांगितले. गडावरून तोफेचा आवाज आल्यावर खानाच्या सैन्यावर तुटून पडण्याचे आदेश दिले.

एकूण खानाचा पराभव निश्चित झाला. मात्र हे अवलंबून होते खानासोबतच्या भेटीवर ! खानाची प्रचंड ताकद आणि त्याची कपटनिती याला महाराज सामोरे कसे जातात यावर! कारण खानासोबत भेट घेणे सोपे नव्हते. कर्नाटकातील शिरेपट्टण येथील कस्तुरीरंग या राजासोबतचा प्रसंग याचा पुरावा होता.

हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुरतवरील पहिला हल्ला

  भेटीचा दिवस उजाडला खान भेटीच्या ठिकाणी निघाला. सोबत पहिलवान खान, रहीम खान, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते आणि इतर अंगरक्षक होते. भेटीसाठी उभारण्यात आलेला शामियाना खान बघतच राहिला. खास मौल्यवान वस्तू वापरून शामियाना सुशोभित केला होता. इकडे महाराजही जीवा महाला, येसाजी कंक, कोंडाजी कंक, संभाजी कावजी कोंढाळकर, कृष्णाजी गायकवाड, संभाजी करवर, सुरजी काटके, विसाजी मुरुंबक, सिद्दी इब्राहिम आणि काताजी इंगळे या दहा अंगरक्षकांसोबत निघाले.

शामियान्यात खानाजवळ सय्यद बंडा आहे याची माहिती मिळताच राजांनी खानास निरोप पाठविला की सय्यद बंडाची भीती वाटते तेंव्हा त्यास दूर ठेवावे. ‘ राजे घाबरतात ‘ याचे आणखी उदाहरण मिळाल्याने खान जास्तच खूष झाला. त्याने लगेच सय्यद बंडास दूर पाठविले. नंतरच महाराज शामियान्या कडे निघाले.

हे ही वाचा : वणी – दिंडोरीची लढाई

महाराज खानाच्या समोर जात उभे राहिले. खान नाटकीपणे जिव्हाळा दाखवत आलिंगन देण्यासाठी दोन्ही हात पुढे केले. महाराजांनीही पुढे होऊन त्याला आलिंगन दिले. धिप्पाड देहाच्या खाना पुढे महाराजांचीही उंची खुजी होती. महाराजांचे डोके खानाच्या छातीपर्यंत पोचत होते. खानाने महाराजांना मिठी मारली आणि त्यांची मान डाव्या काखेत पकडून दुसऱ्या हाताने कट्यारीचा वार केला.

चिलखत असल्यामुळे राजांचा फक्त अंगरखाच फाटला. राजे सावध होतेच. खानाकडून अशीच अपेक्षा होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाघनखे  खानाच्या पोटात खुपसले ! आणि खानाने भयंकर आरोळी ठोकली. दगा , दगा म्हणत खान मोठ्याने ओरडला. खानाची आतडी बाहेर आली. खान रक्ताने माखला.

See also  बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतील झुंज माहिती 2021 | Baji Prabhu Deshpande Pavankhind Full Information In Hindi

प्रतापगडाच्या पायथ्याशी विषयी माहिती 2021 | Pratapgad Makes History In Marathi

  अवघ्या काही क्षणात हे घडले. खानाच्या वकिलाने राजांवर वार केला. महाराजांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही त्याने पुन्हा वार केला. तेंव्हा महाराजांनी त्याला ठार केले. बाहेरही अंगरक्षकांमध्ये धुमचक्री सुरू झाली. त्यातून सय्यद बंडा आत घुसला. तेवढ्यात जीवा महालाही तेथे पोहोचला. सय्यद बंडाने महाराजांवर केलेला वार अडवत जीवाने क्षणात घाव घालून त्याचे दोन तुकडे केले.( होता जीवा म्हणून वाचला शिवा) हे सर्व सुरू असताना खान शामियान्याबाहेर पडून पालखीत बसला आणि छावणीकडे जाऊ लागला. ते पाहताच संभाजी कावजीने धावत येऊन पालखीच्या भोयांचे पाय छाटले आणि खानाची गर्दन उडविली. खानाचे मुंडके घेऊन तो महाराजांकडे आला.

महाराज शिताफीने गडावर आले. इशारा होताच तोफा कडाडल्या. खानाच्या सैन्यास त्या सन्मानादरम्यान मानाच्या तोफा वाटल्या. पण प्रत्यक्षात जंगलात दडून राहिलेल्या मावळ्यांना इशारा होता. हा इशारा होताच मावळे प्रचंड त्वेषाने खानाच्या सैन्यावर तुटून पडले. भयंकर रणधुमाळी सुरू झाली.चहूबाजूंनी खानाच्या फौजेवर मावळे हल्ले करत होते. प्रेतांचा खच पडत होता. जे शरण येत होते तेच वाचत होते. खानाचा एकही अंगरक्षक जिवंत राहिला नाही. उलट महाराजांचा एकही अंगरक्षक मेला नाही. खानाची खासी माणसे ठार झाली. महाराजांचे चुलते मंबाजी राजे भोसलेही ठार झाले. झुंझारराव घाडगे, अंबरखान आणि अफजल खानाची दोन्ही मुले कैद झाली. खानाच्या सैन्याची दैना उडाली. महाराजांना मारायला आलेल्या अफजलखानाचे  मुंडके आणि धड अलग झाले होते.

               जे  युद्धकैदी होते त्यानां राजांनी जीवदान दिले. राजे पुण्यश्लोक शरणागतास मारित नसत. युध्दात कामी आलेल्या व पराक्रम गाजवलेल्या सर्वाना बक्षिसे व मदत दिली. महाराजांचे 1734 सैनिक ठार झाले अणि 420 सैनिक जखमी झाले. आदिलशाहचे जवळजवळ 5000 सैनिक ठार व तितकेच जखमी झाले. 3000 सैनिक युध्दबंदी झाले. हत्ती, घोड़े, ऊंट, तोफा अणि अगणित खजिना प्राप्त झाला.

अफजलखानाच्या पार्थिव शरीरावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार प्रतापगडावर म्हणजेच Pratapgad Makes History In Marathi करण्यात आले.  प्रतापगडाच्या म्हणजेच Pratapgad Makes History In Marathi या युद्धाचे मराठ्यांच्या इतिहासात खूप महत्त्व आहे. या युद्धाने महाराजांचा शत्रूंवर धाक निर्माण झाला. मोठ मोठ्या फौजांना आपण हरवू शकतो हा विश्वास मराठ्यांमध्ये निर्माण झाला. आदिलशाही या धक्क्यातून सावरू शकली नाही.काही कालावधीतच महाराजांनी आदिलशाहीचा बराचसा मुलुख, किल्ले काबीज केले. रोज नवनवा इतिहास घडत होता, एकेक मुलुख स्वतंत्र होत होता.

आपण ह्या पोस्ट मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर FULL SHIVAJI MAHARAJ MARATHI MAHITI 2021 बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला पण भेट देऊ शकता .

Spread the love

10 thoughts on “प्रतापगडाच्या पायथ्याशी 2021 | Pratapgad Makes History In Marathi”

Leave a Comment