Table of Contents
Shivaji Maharajana kiti patni hotya ? छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ?

हिंदवी स्वराज्याचे संथापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव जरी समोर आले तर आपसूकच आदराने मान झुकते. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्रातील हतबल झालेल्या प्रजेमध्ये त्यांनी नवे चैतन्य निर्माण केले. गुणी लोकांना त्यांनी जवळ केले आणि मुघल,आदिलशाही तसेच स्वकीय असलेले शत्रू यांना तोंड देत स्वराज्याची निर्मिती केली. याकरिता महाराष्ट्रातील अनेक सरदार त्यांनी जोडले. प्रसंगी त्यांच्यासोबत नातेसंबंधही जोडले. आजच्या या लेखात आपण Shivaji Maharajana kiti patni hotya ? छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ? (Shivaji Maharaj Family) याबाबत माहिती घेऊ या.
Shivaji Maharajana kiti patni hotya ? छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ? Shivaji Maharaj Family
छत्रपती शिवाजी महाराज यांना एकुण आठ पत्नी होत्या. त्यांच्या पत्नींविषयी जास्त माहिती मिळत नाही. परंतु विविध कागदपत्रे यामध्ये त्यांच्या पत्नींविषयी उल्लेख येतात. त्यावरून आपल्याला शिवाजी महाराज यांच्या पत्नींविषयी माहिती मिळते. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या याबाबत माहिती घेऊ या.
1) सईबाई :

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले लग्न बालपणीच झाले. इ.स. 1640 मध्ये 16 मे ला शिवाजी महाराज यांचे लग्न फलटनच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराजे निंबाळकर यांची कन्या सईबाई यांच्याशी झाले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे सईबाई यांच्या पोटी जन्माला आले. त्यांना राणुबाई, सखुबाई आणि अंबिकाबाई या मुली होत्या. सईबाई यांचा मृत्यु 5 सप्टेंबर 1659 ला झाला.
2) सगुनाबाई :
महाराज यांचे दुसरे लग्न 1641 मध्ये शिर्के घराण्यातील सगुनाबाई यांच्याशी झाले.महाराजांची कन्या राजकुवरबाई यांच्या त्या मातोश्री होत.
3) सोयराबाई :
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची बहिण सोयराबाई यांच्याशी इ.स. 1650 मध्ये महाराजांचे तिसरे लग्न झाले. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम यांच्या त्या मातोश्री होत्या. सोयराबाई यांना दिपाबाई हे कन्यारत्न होते.
4) पुतळाबाई :
महाराज यांचे चौथे लग्न पालकर घराण्यातील पुतळाबाई यांच्या इ.स. 1653 मध्ये झाले. पुतळाबाई महाराजांचे देहावसान झाल्यावर 27 जून इ.स. 1680 मध्ये रायगडावर सती गेल्या होत्या.
5) लक्ष्मीबाई :
लक्ष्मीबाई यांच्याशी महाराजांचे पाचवे लग्न झाले. त्या विचारे घराण्यातील होत. हे लग्न इ.स. 1656 मध्ये झाले.
6) सकवारबाई :
इ.स. 1657 मध्ये महाराजांचे सहावे लग्न सकवारबाई यांच्याशी झाले. सकवारबाई या गायकवाड घराण्यातील होत्या. महाराजाचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे सकवारबाईचे भाऊ होते. कमलाबाई त्यांच्या पोटी जन्माला आल्या होत्या.
7) काशीबाई :
महाराजांचे सातवे लग्न सिंदखेडच्या जाधव घराण्यातील काशीबाई यांच्याशी झाले. हे लग्न इ.स. 1657 मध्ये झाले. जाधवराव जिजाऊमातेच्या माहेरची माणसे होती. यांचे निधन इ.स. 1674 ला झाले.
8) गुणवंताबाई :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी गुणवंताबाई होत. त्या इंगळे घराण्यातील होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराव इंगळे होते. हे लग्न 1657 झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे विवाह संबंध दृढ होण्याकरिता केले. स्वराज्याच्या कामात मराठी घराणे एकत्र येणे खुप आवश्यक होते. त्यातूनच स्वराज्य फुलले.
आमचा Shivaji Maharajana kiti patni hotya ? छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ? हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही खालील लिंकद्वारे माहिती घेऊ शकता.
Chhatrapati Shivaji Maharaj yancha rajyakarabhar | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार
तुम्ही आमच्या http://www.newiinfo.com या website ला भेट देऊ शकता.
स्त्रोत : google
1 thought on “Shivaji Maharajana kiti patni hotya ? छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ?”