Prataprao Gujar – Nesari Khindchi Ladhai 1674 | वेडात मराठे वीर दौडले सात

Prataprao Gujar – Nesari Khindchi Ladhai 1674 | वेडात मराठे वीर दौडले सात

Prataprao Gujar - Nesari Khindchi Ladhai 1674

Prataprao Gujar – Nesari Khindchi Ladhai 1674 | वेडात मराठे वीर दौडले सात

थोर कवी कुसुमाग्रज यांची एक कविता आहे. त्यामध्ये  ते म्हणतात  – “म्यानातून उसळे तलवारीची पात,  वेडात मराठे वीर दौडले सात….. ” ही कविता ऐकताना अंगावर शहारे येतात. हे कोण मराठी वीर होते ? ते का वेडात दौडले ? आणि कोणावर दौडले ? नेसरीच्या खिंडीची लढाई केव्हा झाली ? Prataprao Gujar – Nesari Khindchi Ladhai 1674 | वेडात मराठे वीर दौडले सात याबाबत आपण माहिती आजच्या या लेखात घेऊ या.

अब्दुल करीम बहलोलखानचे स्वराज्यावर आक्रमण :

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीवर चौफेर आक्रमण करून आदिलशाहीतील मुलुख काबीज करण्याचा सपाटा सुरु केला होता. कोंडाजी फर्जद यांनी अवघ्या 60 मावळ्यांनिशी पन्हाळा गड घेतला. त्यामुळे आदिलशाही दरबार चिंताग्रस्त झाला होता.  महाराजांच्या वाढत्या पराक्रमाला पायबंद घालून आदिलशाहीचे रक्षण करण्यासाठी आदिलशाही सल्तनतीने एका मातब्बर सरदाराची नेमणूक केली.

तो सरदार होता अब्दुल करीम बहलोलखान. हा मुळचा अफगानिस्तानचा. पठाण. ताकदीने दूसरा अफजलखानच ! अत्यंत शूर सरदार होता हा. तेव्हा मिरज आणि पन्हाळा सुभा त्याच्याकडेच होता. त्याच्याच सुभ्यातील  पन्हाळा गड महाराजांनी घेतला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांवरील मोहिम त्याने मोठ्या त्वेषाने स्वीकारली. बारा हजार फौज घेऊन बहलोलखान निघाला.तिकोट्याजवळ असलेले उमराणी या गावी तो आला. तेथून अजुन भली मोठी फौज जमा करण्याचा खानाचा प्रयत्न होता.

त्यावेळी महाराज पन्हाळा गडावर होते. बहलोलखानाच्या स्वारीची खबर प्राप्त होताच महाराजांनी त्वरेने प्रतापराव गुजर (कुडतोजी गुजर )  आणि खाशी सरदार मंडळी यांच्याशी गुप्त मसलत करून त्यांना बहलोलखानावर चढाई करण्यास सांगितले.

See also  Kabir ke Dohe In Marathi 2021| कबीर वाणी | कबीर के दोहे

सरनौबत प्रतापराव गुजर महाराजांना मुजरा करून निघाले. सोबत पंधरा हजार फौज घेतली. निसबतीस विठ्ठल पिलदेव अत्रे,आनंदराव मकाजी, कृष्णाजी भास्कर, विसाजी बल्लाळ, सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे आणि दीपाजी राउतराव असे मातब्बर सरदार होते.

बहलोलखानाचा पराभव आणि धर्मवाट :

मराठी फौज उमराणीजवळ आली. खानाला मराठी फौजेचा थांगपत्ता नव्हता. मराठ्यांनी खानाच्या फौजेच्या पाणीपुरवठा तोडला. प्रतापरावने त्यानंतर खानाच्या फौजेवर अचानक हल्ला चढविला. भयंकर लढाईस सुरुवात झाली. प्रतापराव , आनंदराव आणि सिद्दी हिलाल यांनी तूफान कापाकापी सुरु केली. पठानांची मुंडकी भराभर उडत होती. त्यातच खानाच्या फौजेतील एक हत्ती बिथरला. त्या हत्तीने आपल्याच फौजेतील सैनिकांना तुडविले. शेवटी सिदोजी निंबाळकर या मराठा सरदारने तो हत्ती काबीज करून आणला.

बहलोलखान हा सिद्दी महंमद बर्की ,भाईखान या योद्ध्यासह मराठ्यांना तोंड देत होता. पण मराठे पठानांच्या फौजेला भारी पडत होते. तेवढ्यात दीपाजी राउतराव यांनी बर्कीला उडविले. बहलोलखान पठानांची ही कत्तल बघत होता. त्याची पुरी फौज तहानेने कासावीस झाली होती. मराठ्यांनी जलाशय अगोदरच ताब्यात घेतले होते.

बहलोलखान पुरता फसला होता. मराठ्यांना तोंड देणे पठानी फौजेला जड जाऊ लागले होते. त्यामुळे त्याने शेवटी सरनौबत प्रतापरावकडे आपला दूत पाठवून क्षमायाचना मागुन धर्मवाट मागितली. पुन्हा स्वराज्याच्या वाटेस जाणार नाही असे वचन खानाने प्रतापराव यांना दिले. मोठ्या मनाच्या प्रतापराव यांनी खानाला माफ करून फौजेसह जाऊ दिले. ही लढाई 15 एप्रिल 1673 च्या सुमारास झाली होती.

महाराजांना खबर मिळाली की सरनौबत प्रतापराव यांनी बहलोलखानाचा पराभव केला. परंतु हाती आलेला खान प्रतापरावाच्या औदार्याने सुटून गेला हे कळल्यावर महाराज खुप रागावले. त्यांनी प्रतापरावाना पत्र पाठवून विचारले की , ‘सला काय निमित्त केला ? खानाला कैद का केले नाही ? खानाला का जाऊ दिले ? त्याला सोडायला परवानगी कोणी दिली ? हा खान पुन्हा स्वराज्यावर उलटेल. अशी महाराजांची भावना होती. प्रतापराव यांना पत्र मिळाल्यावर आपली चुक लक्षात आली. विजयाचा आनंद ओसरला.

See also  Sant Namdev information in marathi 2021| संत नामदेव विषयी माहिती

वेडात मराठे वीर दौडले सात :

बहलोलखान मात्र शांत बसलेला नव्हता. त्याने अधिक फौज जमाविली. स्वराज्याच्या रोखाने खान पुन्हा चालून आला. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालु होती.

खानाच्या मोहिमेची खबर प्राप्त होताच महाराज चिडले. त्यांनी प्रतापराव यांना खरमरीत पत्र पाठविले. महाराजांनी पत्रात लिहिले की , ‘बहलोलखान घडोघडी येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो,याची गाठ घालून , बुडवून फत्ते करणे. नाही तर तोंड न दाखविणे.’  महाराजांचे हे पत्र प्रतापराव यांना मिळाले. सरनौबत त्यावेळी गडहिंग्लस परिसरात होते.

पत्र पाहताच सरनौबत स्वत:वरच खुप चिडले. बहलोलखानाची कृतघ्नता त्यांना अधिक त्रास देत होती. महाराजांचा रागावालेला चेहरा त्यांच्या नजरेसमोर वारंवार येत होता.

बहलोलखानाचा पुरता बीमोड केल्याशिवाय तोंड दाखवू नका असा महाराजांचा आदेश होता. गेल्या आठ – नऊ महिन्यात प्रतापराव बादशाही मुलुखात हल्ले चढवित होते. परंतु बहलोलखान मात्र त्यांच्या तावडीत सापडत नव्हता.

रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाची लगबग सुरु होती. अष्टप्रधान मंडळातील आपण सोडून इतर मंत्र्यांचे मुजरे झडत होते. मात्र आपण तेथे जाऊ शकत नाही म्हणून प्रतापराव खुप नाराज होते. प्रतापराव बहोलालच्या मागावरच होते. आणि प्रतापराव यांना खबर मिळाली की, बहलोलखान भली मोठी फौज घेऊन नेसरीच्या रोखाने येत आहे.

प्रतापराव आपल्या सहा शिलेदारांसह छावनीपासुन दूर टेहळत होते. बहलोलचे नाव ऐकल्यावर सरनौबत प्रतापराव रागाने बेभान झाले. सुडाने पेटून उठलेले सरनौबत संतापाच्या आवेशात तसेच आपला घोडा बहलोलच्या दिशेने फेकला. त्यांच्या मागे विठ्ठल पिलदेव अत्रे , दीपाजी राउतराव, विठोजी शिंदे, कृष्णाजी भाष्कर, विसाजी बल्लाळ आणि  सिद्दी हिलाल हेही त्यांच्या मागे निघाले. निदान आपली फौज घेऊन जाण्याचे  भानही प्रतापराव यांना राहिले नाही. बहलोलच्या एवढ्यामोठ्या फौजेचा आपण कसा मुकाबला करू याचाही विचार सरनौबत प्रतापराव यांना आला नाही. वेडात मराठे वीर दौडले सात..

Prataprao Gujar - Nesari Khindchi Ladhai 1674
सौजन्य : tweeter.com

बहलोलखान आपल्या अफाट फौजेसह नेसरीची खिंड ओलांडत होता. तेवढ्यात प्रतापराव आणि त्यांचे सहा शिलेदार वेगाने  चालून येत असल्याचे खानाला दिसले. खान चकित झाला. खासा प्रतापराव केवळ सहा सरदारांनिशी येत होते.

See also  Afzalkhan And Aurangjeb 1657 | आणि औरगंजेब अफजलखानाच्या हातून वाचला

संतप्त सरनौबत आणि त्यांचे सहा सोबती म्यानातून तलवार काढून बेफानपणे त्या शत्रूसैन्यात घुसले. त्यांच्या तडाख्यात जे जे सापडले ते उडाले. वेगाने प्रतापराव आणि त्यांच्या सहा सोबत्यांचे तलवारी फिरू लागल्या.

असंख्य शत्रूंच्या गराड्यात ते सात जण लढत होते. शत्रुंचे घाव त्यांच्यावर पडत होते. शेवटी एक – एक करीत प्रतापराव आणि त्यांचे सोबती पडले. संतापाच्या भरात प्रतापराव आणि त्यांचे सोबती बहलोलखानावर चालून गेले आणि ठार झाले.

ही दुर्दैवी घटना दिनांक 24 फेब्रुवारी 1674 ला घडली.  राज्यभिषेकाच्या मंगल प्रसंगी ही कडू वार्ता आली. महाराजांचे शब्द खोलवर रुतल्याने प्रतापराव इरेस पेटले आणि त्यांनी खरच महाराजांना तोंड दाखविले नाही.

प्रतापराव  आणि त्यांचे सोबती पडल्याचे महाराजांना कळताच ते फार दू:खी झाले. प्रतापराव आणि त्यांच्या सोबत्यांचा सूड आनंदराव यांनी घेतला. त्यांनी बहलोलखानाचा जबरदस्त पराभव बंकापुर येथे केला. बहलोलखानास रणभूमीवरून पळ काढावा लागला.

कालांतराने महाराजांनी राजाराम महाराज यांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी लाऊन दिले.

आमचा Prataprao Gujar – Nesari Khindchi Ladhai 1674 | वेडात मराठे वीर दौडले सात हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर प्रतापगडच्या युद्धाविषयी माहिती घ्यायची असेल तर पुढील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.प्रतापगडाच्या पायथ्याशी 2021 | Pratapgad Makes History In Marathi

तुम्ही आमच्या http://www.newiinfo.com या website ला भेट देऊ शकता.

 

Spread the love

1 thought on “Prataprao Gujar – Nesari Khindchi Ladhai 1674 | वेडात मराठे वीर दौडले सात”

Leave a Comment