Chanakya niti quotes information in marathi 2021 | चाणक्य नीति मराठी माहिती

       Chanakya niti quotes information in marathi | चाणक्य नीति मराठी माहिती

चाणक्य यांचे मूळ नाव विष्णुगुप्त होय. कौटिल्य या नावानेही आर्य चाणक्य प्रसिद्ध आहेत. प्राचीन भारताचा महान चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त यांचे गुरु चाणक्य होत. आर्य चाणक्य यांच्याच मार्गदर्शनाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. प्राचीन भारताच्या राजकीय आणि कुटनीति शास्त्राचा पाया आर्य चाणक्य यांनीच घातला असे म्हटले जाते. त्यांनी रचलेला ‘अर्थशास्त्र ‘ हा राजनीतीवरील एक महान मार्गदर्शनपर ग्रंथ आहे. चाणक्य यांचे विचार राजकारणात जसे आवश्यक ठरतात तसेच दैनंदिन जीवनातही उपयोगी ठरतात. चाणक्य यांचे विचार, तत्त्वे यांना चाणक्य नीति (chanakya niti in marathi)  म्हणतात. आजच्या या लेखात चाणक्य नीति म्हणजेच Chanakya niti quotes information in marathi 2021 याबद्दल माहिती घेवु या.

chanakya niti quotes information in marathi

Chanakya niti quotes information in marathi चाणक्य नीति : (chanakya niti in marathi)

* दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका. स्वत: वर प्रयोग करुन शिकाल तर तुमचे वय कमी पडेल.

*कधीही आपल्या गुप्त गोष्टी कोणाला सांगू नका. त्याचा फायदा उचलून ते (लोक) तुमचा नाश करतील.

*शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. एक सुशिक्षित व्यक्ती सर्वत्र आदरणीय असतो. शिक्षण हे सौंदर्य आणि युवा यांना पराभूत करते.

*व्यक्तीने खुप प्रामाणिक असू नये. सरळ झाडे प्रथम कापली जातात.

*मनुष्याने आयुष्यात धर्म,अर्थ,काम,आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या मनुष्याने यातील एकाही गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही त्याचे आयुष्य वाया गेले.

See also  महाप्रतापी दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त विषयी माहिती 2021 | Samudragupta History In Marathi

*सापाच्या फन्यात,माशीच्या तोंडात आणि विंचवाच्या डंकामध्ये विष असते. परंतु द्रुष्ट व्यक्तीच्या शरीरात डोक्यापासून ते पायापर्यंत विष असते.

* आपण काय करण्याचे ठरविले आहे हे कोणालाही सांगू नका आणि काम करीत रहा.

* काही लोक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आलेला प्रत्येक दिवस ती जगतच असतात. परंतू ज्यांना पुढे जायचे असते ते लोक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात.

*कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी स्वत:ला पुढील तीन प्रश्न विचारा. मी हे कशासाठी करतो ? त्याचा परिणाम का्य होईल ? मला यश मिळेल का ? या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळेल तेव्हा खुशाल पुढे जा.

*कोणताही व्यक्ती आपल्या कर्तुत्वाने महान होतो, जन्माने नव्हे.

*सन्मान मागितल्याने मिळत नसतो. तो आपल्या कर्तुत्वाने मिळवावा लागतो.

* अस्वच्छ कपडे परिधान करणारे, स्वच्छ दात नसणारे, खुप खाणारे, कठोर शब्द बोलणारे,सूर्योदयानंतर उठणारे, अशा लोकांचे व्यक्तित्व कितीही महान असले तरी लक्ष्मीची त्यांच्यावर कृपा होत नसते.

* जे घडले ते घडून गेले. आपल्या हातून जर एखादे चुकीचे काम झाले तरी त्याची काळजी करणे सोडून वर्तमानात प्रामाणिकपणे जगून भविष्य सावरले पाहिजे.

*साप विषारी नसला तरी त्याने फोफावणे सोडू नये. तसेच कमजोर व्यक्तीने आपल्या कमजोरीचे प्रदर्शन करू नये.

*सदासर्वकाळ कोणालाही दबावाखाली किंवा उपकराखाली दाबुन ठेवून कोणतेही कार्य करवून घेता येत नाही.

* मित्राची स्त्री,गुरुची स्त्री, भगिनी आणि परस्त्री यांच्याशी संबंध करू नये.

*चुकीच्या मार्गाने धन, स्त्री मिळविणारा सुखी राहत नाही.

* आपली संस्कृती आणि सभ्यता यांचे पालन केले पाहिजे.

*विद्यार्थ्याचे प्रथम कर्तव्य शिक्षण घेणे हे आहे.

*आपल्या माता-पित्याची सेवा करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

*घराबाहेर जाताना आपण नेमके कोठे जात आहो याची माहिती आपल्या स्वकियांना दिली पाहिजे.

            चाणक्य नीति माहिती मराठी : (chanakya niti in marathi)

*आपल्या जीवनाचा जोडीदार निवडताना त्याच्या गुणांची पारख करणे आवश्यक असते. व्यक्तीचे बाह्य सौंदर्य हे व्यक्तीचे खरे सौंदर्य नसते. तर व्यक्तीचे मन आणि त्याचे विचार सुंदर असेल पाहिजे. बाह्य सौंदर्य पाहून विवाह करणारी व्यक्ती संकटात येवू शकते.तर अंतर्गत सौंदर्य पाहून विवाह करणारी व्यक्ती सुखी राहते.

See also  Vaishalichi Nagarvadhu Amrapali | आम्रपाली एक शापित सौंदर्यवती

*संस्कारच व्यक्तीला मान-सन्मान मिळवून देतात. संस्कारी जोडीदार घराला स्वर्ग बनवितात. संस्कारी माता-पिता आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतात.

*मर्यादेत राहणारी व्यक्ती कधी चुकीचे काम करू शकत नाही.

*धैर्यवान व्यक्ती प्रतिकूलरात्मक विचार मनात येवू देवू नका. नकारात्मक विचाराने आत्मविश्वास कमी होतो.

*पूर्ण सामर्थ्याने संकटाचा सामना करा. संकटावर मात करण्यासाठी धैर्य आणि समजुतदारपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात.

* रागीट स्वभावाची व्यक्ती कधीच सुखी आणि यशस्वी होऊ शकत नाही.

*यश आणि सुखी संसार करण्यासाठी शांत स्वभाव असणे आवश्यक असते परिस्थितीचा सामना करण्याचे सामर्थ्य बाळगतो.

* दुधात मिसळलेले पाणीही दुध बनते. तसेच आपणही चांगल्या लोकांबरोबर मैत्री करून चांगले होऊ शकतो.

* फुलांचा सुगंध केवळ वाऱ्याच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरते.

* निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही एक नवीन शत्रू निर्माण करता.

*आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एका मुर्खाला ग्रंथ देणे व्यर्थ आहे.  

   चाणक्य नीति माहिती मराठी सुविचार :(chanakya niti in marathi)

*मनुष्याला आपल्या शत्रूबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय त्या शत्रूविरोधात धोरण तयार करता येत नाही.

*मौन हे सर्वात मोठे शस्त्र आहे. शांत असल्यास समोरचा व्यक्ती आपल्या परिस्थितीबद्दल जाणुन घेवु शकत नाही.

*कठिण परिस्थितीत कोणताही निर्णय घाईत घेवु नये. घाईघाईत अनेकदा चुकीचा निर्णय घेतला जातो.म्हणून सर्व बाजूंनी काळजीपूर्वक समस्येचा विचार करून निर्णय घ्यावा.

आपल्या जीवनात  Chanakya niti quotes information in marathi म्हणजेच चाणक्य नीति (chanakya niti in marathi) खुप महत्वाची आहे. जर आपण यानुसार वागलो तर नक्कीच आपण सुखी जीवन जगु शकतो.

तुम्हाला जर सम्राट चंद्रगुप्त मौर्य विषयी माहिती हवी असेल तर खालील लिंक ओपन करुन तुम्ही वाचू शकता.

पहिला चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य विषयी माहिती 2021 | Chandragupta Maurya Story In Marathi

आरोग्या बद्दल मराठीत अजून जाणून घेण्यासाठी http://www.marathimahiti.com वेबसाईट ला भेट दया .

Spread the love