Table of Contents
Indus Vally Civilization Trade In Marathi | 5000 हजार वर्षांपूर्वीचा आंतरराष्ट्रीय व्यापार : सिंधू संस्कृतीचा प्राचीन सागरी व्यापार इतिहास

आजपासून जवळपास 5000 वर्षांपूर्वी आपल्या भारतातील सिंधू संस्कृतीचे लोक (Indus Vally Civilization Trade) जगातील इतर मोठ्या संस्कृतीतील लोकांसोबत व्यापार करीत होते. आज आपण या आधुनिक काळात जेव्हा जागतिक व्यापार (Global Trade) किंवा कॉर्पोरेट बिझनेसविषयी ऐकतो तेव्हा आपल्याला वाटते की ही एक आधुनिक संकल्पना आहे. परंतु असे नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपल्या भारतातील प्राचीनकाळी व्यापारी हजारो मैलांचा आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होते. Historical Touch मध्ये आपण भारतातील प्राचीनकाळी होणाऱ्या व्यापाराचा इतिहास बघणार आहोत.
सिंधू संस्कृतीचा मेसोपोटेमियासोबत असलेले व्यापारी संबंध : Indus Vally Civilization Trade
पुरातत्वीय विभागाने केलेल्या उत्खननात असे जे पुरावे समोर आले ते असे दर्शवितात की, आपल्या सिंधू संस्कृतीचे व्यापारी लोक मेसोपोटेमिया म्हणजे आजच्या इराक आणि कुवेत मधील लोक यांच्यात प्रत्यक्ष व्यापार होत होता. तेथे मिळालेल्या मातीच्या पाट्यांवर मेलुहा (Meluhha) अशा नावाचा उल्लेख आढळतो. मेलुहा हा शब्द सिंधू संस्कृतीसाठी वापरला जात असे.
मेसोपोटेमियासोबतचा व्यापारात प्रामुख्याने कोणत्या वस्तूंची देवाणघेवाण होत असे ?
निर्यात (Export) :
मेसोपोटेमियाला आपल्या भारतातून सुती कापड (Cotton), हस्तिदंत (Ivory), मौल्यवान मणी (Carnelian beads), सोने आणि तांबे असे मौल्यवान धातू निर्यात केले जात असत.
आयात (Import) :
मेसोपोटेमियाला वरील वस्तूंचीनिर्यात होत होती तर त्या बदल्यात मौल्यवान दगड, सुगंधी द्रव्ये, आणि काही धातू यांची आयात केली जात होती.
हे ही वाचा : सिंधू संस्कृती व हडप्पा संस्कृती माहिती 2021 | Full Haddapa Sanskruti In Marathi | Sindhu Sanskruti History In Marathi
जगातील पहिले मानवनिर्मित बंदर – लोथल (World’s First Dockyard – Lothal) : Indus Vally Civilization Trade
सिंधू संस्कृतीचा उल्लेख केला तर हडप्पा आणि मोहंजोदडोसोबत लोथलचे देखील नाव येते. याचे कारण असे की, सिंधू संस्कृतीतील व्यापारी लोक त्यांचा व्यापार गुजरातमधील लोथल या शहरातून करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. संशोधनानुसार असे आढळले की, सुमारे 4500 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीतील लोकांनी लोथल या ठिकाणी समुद्राकाठी एक अवाढव्य असे मानवनिर्मित बंदर ( Dockyard) विकसित केले होते.
लोथलचे बंदर इतके विकसित होते की, समुद्राच्या भरती-ओहोटीचा (Tides) योग्यप्रकारे वापर करू जहाजे बंदरात आणली आणि सोडली जात असत. या लोथलवरूनच मेसोपोटेमियापर्यंतचा प्रवास व्यापारी जहाजे अरबी समुद्राच्या मार्गाने करीत असत.
व्यापारी मुद्रा-चलन आणि वजन-मापे : Indus Vally Civilization Trade
व्यापार पारदर्शकपणे आणि सुरळीत चालण्यासाठी सिंधू संस्कृतीच्या लोकांनी एक अत्यंत प्रगत अशी व्यवस्था निर्माण केल्याचे आढळून आले आहे. त्यांची ही पद्धत आपल्याला खालील बाबींवरून दिसून येते.
एकसमान वजन आणि मापे :
सिंधू संस्कृतीमध्ये मापनासाठी आणि वजनासाठी एकच प्रमाणित पद्धत प्रचलित होती असे आढळून आले आहे. व्यापारात पारदर्शकता आणि विश्वसनीयता होती. यामुळे फसवणूक होण्याची शक्यताच नव्हती.
मातीच्या बनविलेल्या मुद्रा (Steatile Seals) : Indus Vally Civilization Trade
वस्तूंची वाहतूक करतांना त्या सुरक्षित राहाव्या म्हणून तसेच त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांवर खास प्रकारच्या मुद्रा (Seals) असत. या मुद्रांवर प्राणी आणि काही सांकेतिक लिपी कोरलेली आढळून आली आहे. आपल्याला वाटेल की या मुद्रा खरेदी-विक्रीकरिता लागणारी नाणी होती ताप्रमाणे असतील. परंतु तसे नव्हे. मुळात या मुद्रांचा वापर व्यापारातील सुरक्षा आणि ओळख याकरिता होत असे.
सिंधू संस्कृतीतील व्यापार लोक आपला माल कापडात किंवा गोणपाटात बांधून परदेशात पाठवीत असत, तेंव्हा त्या कापडाच्या किंवा गोणपाटाच्या गाठीवर ओली माती लावण्यात येत होती. नंतर त्या ओल्या मातीवर व्यापारी लोक आपली मुद्रा उमटवित असत.असे केल्याने मालाची सुरक्षितता दिसून येत होती. जर ही मातीवर असलेली मुद्रेची छाप तुटली तर तर समजायचे की मालासोबत धोका झाला आहे. आता या आजच्या काळात जसे आपण मोहोरबंद करतो तो हाच प्रकार होता.
या मुद्रांवर काही प्राण्यांची चित्रे आणि लिपी कोरलेली होती. ती बहुदा संबंधित व्यापाऱ्याची व त्यांच्या व्यापारी संस्थेची ओळख ज्याला आपण आधुनिक काळात लोगो (Brand Logo) म्हणतो. असे केल्याने व्यापारात विश्वसनियता तर राहायचीच सोबत मेसोपोटेमियामधील व्यापाऱ्यांना समजत असे की आलेला माल कोणत्या व्यापाऱ्याचा आहे .
मातीच्या मुद्रांवरील चित्रे आणि त्यांचे महत्व काय होते ? Indus Vally Civilization Trade
सिंधूसंस्कृतीमधील या मुद्रांवर जी चित्रे काढली होती ती काही कलाकुसर नव्हती. तर त्या चित्रांचे धार्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक महत्व होते. तत्कालीन मुद्रांवर खालील प्रकारची चित्रे आढळून आलेली आहेत.
एकशिंगी पशु (Unicorn) : Indus Vally Civilization Trade
या सिंधू संस्कृतीमधील सापडलेल्या सर्वात जास्त मुद्रांवर एक शिंग असलेला काल्पनिक वा दुर्मिळ असलेला पशु (Unicorn) आढळून आलेला आहे.बहुधा हा कोण्या एका मोठ्या व्यापारी संस्थेचे वा सत्तेचे प्रतिक किंवा चिन्ह असावे.
पशुपती मुद्रा (Pashupati Seal) : Indus Vally Civilization Trade
सिंधू संस्कृतीमधील महत्वाचे शहर असलेले मोहंजोदडो येथे केलेल्या उत्खननात एक जगप्रसिद्ध मुद्रा मिळाली. या मुद्रेवर त्रिमुख असलेला पुरुष योगमुद्रेत बसलेला दिसत आहे. त्या पुरुषाला संशोधक पशुपती किंवा शिव मानतात.त्या पशुपतीच्या सभोवती काही प्राणी असल्याचे दिसून येते.
निष्कर्ष :
आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण ग्लोबल सप्लाय चेन किंवा ग्लोबल ट्रेड म्हणतो, त्याचा पाया आपल्या सिंधू संस्कृतीतील लोकांनी 4500 वर्षांपूर्वीच रचला होता.त्याकाळी आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान नसतांनाही फक्त निसर्ग आणि भूगोलाचा अचूक उपयोग करून समुद्रमार्गे परदेशाशी व्यापार केला. सिंधू संस्कृतीचा हा सागरी मार्गाने होणारा व्यापार सांगतो की, प्राचीन काळी आपला भारत किती प्रगत आणि संपन्न होता. आपल्या या प्राचीन इतिहासापासून आपण नक्कीच बोध घेतला पाहिजे.
मित्रांनो तुम्हाला जर शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या मराठी ट्रेडर या वेबसाईटला जरूर भेट द्या.