श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग : इतिहास, पौराणिक कथा आणि स्थापत्यकलेविषयी सविस्तर माहिती | Grishneshwar Jyotirlinga Temple History

Grishneshwar Jyotirlinga Temple History

Table of Contents

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग : इतिहास, पौराणिक कथा आणि स्थापत्यकलेविषयी सविस्तर माहिती|Grishneshwar Jyotirlinga Temple History

आपल्या भारतातील सनातन संस्कृतीमध्ये भगवान शिवच्या १२ पवित्र ज्योतिर्लिंगांना खूप महत्व आहे. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे म्हणजे १२ वे ज्योतिर्लिंग म्हणून श्री घृष्णेश्वर महादेव (Grishneshwar Jyotirlinga Temple History ) संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या वेरूळजवळ हे मंदिर वसलेले आहे. श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर हे अध्यात्म , स्थापत्यकलेचा आणि महाराष्ट्राचा इतिहास यांचा एक अद्वितीय संगम आहे. आजच्या या लेखात श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचा इतिहास, पौराणिक कथा आणि स्थापत्यकलेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहे.

श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराची पौराणिक उत्पत्ती : शिवभक्त घुश्माची अमर भक्ती गाथा : Grishneshwar Jyotirlinga Temple History

आपल्या शिवपुराणात वर्णन असलेल्या कोटिरुद्र संहिता मध्ये शिवभक्त घुश्माची अमर भक्तीविषयी माहिती दिलेली आहे. तिच्या या अमर भक्तिभावामुळे या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराची स्थापना झालेली आहे असे मानले जाते. घुश्माची भक्ती आणि महात्म्य पुढीलप्रमाणे आहे.

१. मातीच्या शिवलिंगाची पूजा :

देवगिरी पर्वताजवळ असलेल्या सुधर्म ब्राम्हणाची घुश्मा ही दुसरी पत्नी होती. ती दररोज १०१ मातीची शिवलिंगे बनवून त्यांची मनोभावे पूजा-अर्चना करीत असे. त्यानंतर जवळच्या तलावात त्या शिवलिंगांचे विसर्जन करीत असे.

२. पुत्रप्राप्ती आणि सवतेद्वारा पुत्राची हत्या :

भगवान शिवच्या कृपेने घुश्माला एक पुत्र प्राप्त झाला. मात्र तिची सवत असलेली सुदेह ही एक दृष्ट बाई होती. तिने घुश्माच्या पुत्राची मत्सरापोटी हत्या करून जवळच्या तलावात फेकून दिले.

३. पुत्र जिवंत होणे आणि भगवान शिवचे दर्शन :

घुश्माने पुत्राची हत्या झाल्यावरही भगवान शिवची भक्ती चालूच ठेवली. तिच्या या नित्यनेमाच्या या भक्तिभावाने भगवान शिव तिला प्रसन्न झाले. घुश्माने नित्यानेमाने जसी १०१ शिवलिंगे तलावात विसर्जित केली त्याच क्षणी तिचा पुत्र जिवंत होऊन तलावातून बाहेर आला  आणि भगवान शिव प्रकट होऊन तिला दर्शन दिले.

४. घृष्णेश्वर नाव कसे पडले ?

भगवान शिव क्रोधीत होऊन सुदेहाला श्राप देणार तेवढ्यातच दयाळू घुश्माने सुदेहासाठी अभय मागितले आणि भगवान शिवानी त्याच ठिकाणी निवास करण्याची प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिव लिंगरुपात प्रकट झाले. घुश्माच्या नावावरून घुश्मेश्वर नाव पडले आणि पुढे त्याचे घृष्णेश्वर असे झाले.

हे देखील  वाचा : Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021 | अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर

श्री घृष्णेश्वर मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी : Grishneshwar Jyotirlinga Temple History

श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचा केवळ पौराणिक इतिहासच नाही तर मध्ययुगीन इतिहास देखील आहे कि जो महाराष्ट्राशी संबंधित आहे. खिलजी आणि  मुघल यांच्या आक्रमणाने नुकसान झाल्यावर महाराष्ट्राच्या दोन महान ऐतिहासिक व्यक्तींनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून पुनरुज्जीवन केले. त्याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे.

१. मालोजीराजे भोसले यांनी केलेला श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोधार :

मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा होते. त्यांच्याकडे वेरूळची जहागिरी होती. मालोजीराजे खूप धार्मिक होते. ते भगवान शिवाचे निस्सीम भक्त होते. पडक्या अवस्थेत असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात ते नेहमी पूजा-अर्चना करण्यासाठी येत असत. या मंदिराची अवस्था बघून ते हळहळत असत.अशातच त्यांना वेरूळ परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गुप्त धन मिळाले. त्या धनातून त्यांनी श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिरालगतच खूप मोठा चौकोनी तलावाची देखील निर्मिती केली. याच तलावाला शिवालय तीर्थ  म्हणून ओळखले जाते.

२. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोधार :

१८ व्या शतकात इंदूरच्या राज्यकर्त्या असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी तत्कालीन संपूर्ण भारतातील प्रमुख असलेल्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला होता.

अहिल्याबाई होळकर यांनी कुशल कामगारांच्या माध्यमातून लाल पाषाणामध्ये श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. पाच मजली नक्षीदार शिखर आणि भव्य सभामंडप त्यांनी त्यावेळी तयार केला होता.

Grishneshwar Jyotirlinga Temple History

श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराची रचना आणि स्थापत्यकला : Grishneshwar Jyotirlinga Temple History

भारतीय स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर आहे.

१. लाल पाषाणातील कोरीव काम :

श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचे संपूर्ण काम लाल कोरीव पाषाणामध्ये कोरीव काम केले आहे. या कामासाठी स्थानिक लाल बेसाल्ट खडकांचा वापर केला  आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या दगडांची चकाकी कायम राहिली आहे.

२. पाच मजल्यांचे शिखर :

श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचे शिखर निमुळते होत गेलेले आहे. या शिखरांचे मुख्य वैशिट्य म्हणजे यावर पौराणिक देव-देवता,यक्ष,गंधर्व तसेच दशावतारांची  शिल्पे बारकाईने कोरलेली आहेत.

३. मंदिरासमोरचा सभामंडप :

मंदिराच्या गर्भगृहजवळ २४ नक्षीदार पाषाणाचे असलेल्या खांबावर हा सभामंडप तोललेला आहे.

४. नंदी मंडप :

मंदिराच्या बाहेर गर्भगृहजवळ एकाच अखंड पाषाणात कोरलेली नंदीची सुबक असी मूर्ती आहे.

५. गर्भगृह:

गर्भगृह हे जमिनीच्या मुल पातळीच्या थोडे खोल असून तेथे पूर्वाभिमुख स्वयंभू ज्योतिर्लिंग विराजमान आहे.

श्री घृष्णेश्वरला कसे जावे ?

विमान मार्ग :

छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळ आहे. मुंबईवरून तुम्ही विमानांद्वारे येवू शकता. तेथून हे श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर अंदाजे ३५ किमी दूर आहे.

रेल्वे मार्ग :

छत्रपती संभाजीनगर हे रेल्वे स्थानक आहे . एक प्रमुख जंक्शन आहे. देशभरातून तेथे रेल्वेने जाता येते.

रस्ते मार्ग :

समृद्धी  महामार्गाने देशभरातून छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचता येते.

नजीकची आकर्षणे :

श्री घृष्णेश्वर नजीकची आकर्षणे म्हणजे वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या , कैलास मंदिर , देवगिरीचा किल्ला, खुलताबादचा भद्रा मारुती हे आहेत.

श्रावण महिना तसेच महाशिवात्रीला श्री घृष्णेश्वर येथे खूप मोठा उत्सव असतो. श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर हे आस्थेसोबतच स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आपण या ठिकाणी जरूर भेट द्यावी.

मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा.

तुम्हाला जर शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या मराठी ट्रेडर या वेबसाईटला जरूर भेट द्या.

Spread the love

Leave a Comment