छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई 2021 | Shivaji Maharaj Museum In Mumbai full Information In Marathi

Shivaji Maharaj Museum In Mumbai Information In Marathi | छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई

 

एखाद्या विशिष्ट विषयाशी  संबधित असलेल्या वस्तुंचा पद्धतशीरपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. आपला इतिहास,संस्कृती, परंपरा यांचा ठेवा वस्तु , शिल्प यांच्या स्वरूपात संग्रहालय मार्फत ठेवला जातो. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तुसंग्रहालयात विविध वस्तु,चित्रे,छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते.  वस्तुसंग्रहालयांना भेट दिल्यावर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, कला,संस्कृती आणि परिस्थिती याविषयी माहिती मिळते. आजच्या या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई (Shivaji Maharaj Museum In Mumbai full Information In Marathi) विषयी माहिती घेऊ या.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची स्थापना :

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे भारतातील एक महत्वाचे वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयाचे नाव अगोदर Prince of Wales Museum of Western India असे होते. या संग्रहालयाचे निर्माण कार्य १९१५ सालीच पूर्ण झाले होते. हे संग्रहालय १० जानेवारी १९२२ साली, प्रिंस ऑफ वेल्स च्या भारतातील आगमणाप्रित्यर्थ सर्व सामान्य जनतेसाठी करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईतील प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिक यांच्या सहकार्याने मुंबई सरकारने  स्मारकाच्या रूपात केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा आराखडा  ब्रिटिश वास्तुविशारद डब्लू. जी. विटेट यांनी करुन या वास्तुची उभारणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ही वस्तु उत्कृष्ट वस्तुकलेचा नमूना आहे. या भव्य वास्तुच्या निर्माण कार्यात हिंदू मंदिरे, राजपूत आणि इस्लामी शैलीचा वापर केलेला आहे. ही वास्तु सुमारे 2 एक्करच्या परिसरात उभारलेली आहे. या वस्तुमध्ये एकूण तीन मजले आहेत. ही वास्तु आतून चौकोनी आहे.

See also  Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन मुंबईचे  तत्कालीन

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबईत नेमके कोठे आहे ?

हे भव्य संग्रहालय दक्षिण मुंबईतील एलफिस्टन कॉलेज समोर फोर्ट विलियम जवळ आहे. या संग्रहालयाच्या समोर रीगल सिनेमा आणि पोलिस आयुक्त कार्यालय आहे. बाजूला डेव्हिड ससून बुक म्युझियम, व्हॅस्टन हॉटेल देखील आहे. समुद्राच्या दिशेने गेल्यावर गेट वे ऑफ इंडिया येते.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील वस्तु संग्रह :

हे एक विशाल संग्रहालय  आहे. या संग्रहालयात जवळपास ५०००० पेक्षा जास्त वस्तुंचा संग्रह आहे. या भव्य संग्रहालयातील म्हणजेच Shivaji Maharaj Museum In Mumbai वस्तूंचे वर्गीकरण कला, पुरातत्व आणि प्राकृतिक अशा तीन प्रकारात करण्यात आले आहे.

या संग्रहालयात इतिहास प्रेमींसाठी अनेक प्राचीन वस्तु  आणि दुर्मिळ चित्रे,हस्तलिखिते जतन करुन ठेवलेल्या आहेत.या संग्रहालयातील प्रत्येक विभाग पाहता पाहता कमीतकमी दोन ते तीन तास सहजच लागतात. या संग्रहालयात काळे आणि पांढरे पाषाणांचे प्राचीन शिल्प आहे.पाचव्या शतकातील मुर्तीही येथे ठेवलेली दिसून येते.अनेक बुध्दमुर्त्या देखील या ठिकाणी पहायला मिळतात. सिंधु संस्कृतीतील अवशेष, इ.स. १६४९ मधील रामायणाची जवळपास २०० लघुचित्रे  आपले लक्ष वेधून घेतात. याशिवाय अनेक प्राचीन कलात्मक चित्रे आपल्याला मोहित करतात.छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई 2021 | Shivaji Maharaj Museum In Mumbai full Information In Marathi

इ.स. १५५० -७० या कालखंडातील मुघल शैलीचा नमूना येथे पाहावयास मिळतो. त्याशिवाय १६४१ मधील दुर्मिळ चित्रे, आणि दुर्मिळ सचित्र हस्तलिखिते सुध्दा आपणास येथे बघायला मिळतात. अनेक प्रकारची प्राचीन तैलचित्रे देखील याठिकाणी बघायला मिळतात.

या संग्रहालयात सामुद्रिक वारसा देखील जोपासला आहे. या विशेष दालनात नौकावहन तंत्रज्ञानाची माहिती तसेच समुद्र मार्ग नकाशे यांची शास्त्रीय माहिती याठिकाणी मिळते.

अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील मौल्यवान दगड, खंजीर यांचे दर्शनही या संग्रहालयात  होते.

या संग्रहालयाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या दालनात जपान, चीन, तसेच यूरोपीयन चित्रे आहे.या दालनात प्राचीन शस्त्रे आणि प्राचीन वस्त्रे देखील आहेत. बाराव्या शतकातील पाटण-गुजरात येथील पटोला साडया येथे आहेत.

See also  Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती

प्राचीन भारतातील शस्त्र, त्यांची विविधता येथे पाहल्यावर आपण थक्क होवून जातो. याच दालनात आपल्याला अल्लाउद्दीन खलजी याची तलवार तर सम्राट अकबर याचे चिलखत आणि ढाल बघायला मिळते.छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई 2021 | Shivaji Maharaj Museum In Mumbai full Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा पत्ता :

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महात्मा गांधी रोड,फोर्ट, मुंबई ४०००२३.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाकडे कसे जायचे ?

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला म्हणजेच Shivaji Maharaj Museum In Mumbai जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या सीएसटी, पश्चिम रेल्वे स्टेशन वरून पायी अथवा बेस्टने जाता येते. खाजगी वाहनाने जायचे असल्यास हुतात्मा चौक आणि कालाघोड़ा या ठिकाणी वाहन पार्क करुन जाता येते.

कधी जायचे :

सोमवार ते रविवार.

वेळ:

सकाळी १०.१५ ते संध्याकाळी ६.००.

दोन तास या वस्तुसंग्रहालयात फिरता येते.

प्रवेश शुल्क :

विद्यार्थ्यांसाठी खास सवलत देण्यात येते. सर्वसामान्यासाठी मात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येते.

तुम्हीही या संग्रहालयाला भेट द्या व आनंद घ्या.

“तुम्हाला आमची माहिती शिवाजी संग्रहालय मुंबईबद्दल कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

आपण ह्या पोस्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

(संदर्भ – गूगल)

आरोग्या बद्दल मराठीत अजून जाणून घेण्यासाठी योगा टिप्स वेबसाईट ला भेट दया .

Spread the love

4 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई 2021 | Shivaji Maharaj Museum In Mumbai full Information In Marathi”

  1. खूप छान वाटलं ,हिते येण्याची उत्सुकता वाढली आहे ,कोण कोणते वस्तू चे संग्रलाय भरते आणि केव्हा भरते ते आम्हाला कळेल का म्हणजे जेव्हा भरेल तेव्हा बाघायला मिळेल ,,

    Reply
    • या संग्रहालयाच्या website वर आपणास हवी असलेली माहिती निश्चित मिळेल. धन्यवाद.

      Reply

Leave a Comment