Purandar fort information in marathi 2021 | पुरंदर किल्ला माहिती

purandar fort | पुरंदर किल्ला माहिती

महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला म्हणून (purandar fort information in marathi 2021) म्हणजेच पुरंदर किल्ला आपल्या नजरेसमोर येतो. याचे कारण असे की या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. पराक्रमी मुरारबाजी देशपांडे दिलेर खानाशी झुंजताना याच किल्ल्यावर ठार झाले. शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यात झालेला पुरंदरचा तह पुरंदरच्या युद्धानंतरच झाला. आज आपण या लेखात purandar fort information in marathi 2021 म्हणजेच पुरंदर किल्ल्याविषयी माहिती घेऊ या.

purandar fort  म्हणजेच पुरंदर किल्ल्याचा इतिहास :

purandar fort information in marathi म्हणजेच पुरंदर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात येतो. या किल्ल्याची उंची १५०० मीटर आहे.  पुरंदर किल्ला हा विस्ताराने खुप मोठा आहे. पुरंदर किल्ला कोणी बांधला याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. बहुतेक हा किल्ला १२ व्या किंवा १३ व्या शतकात बांधला गेला. बहामनी सुलतानच्या काळात बीदरचे चंद्र्संपत देशपांडे यांनी बहामनी साम्राज्यात हा किल्ला जोडला. त्यांनीच या किल्ल्याची डागडूजी केली.

१४८९ साली निजामशहाचा सरदार मालिक अहमद याने  purandar fort information in marathi  म्हणजेच पुरंदर किल्ला जिंकुन घेतला. पुढे १५५० साली हा किल्ला आदिलशहाने जिंकला. तेव्हापासून बराच काळ हा किल्ला आदिलशाहीत होता.

आदिलशहाने शहाजीराजे ( shahaji raje bhosale) कैदेत टाकले आणि फत्तेखानास छ. शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj history in marathi) यांच्यावर पाठविले. तेव्हा पुरंदर किल्ला स्वराज्यात नव्हता. शिवाजी महाराजांनी महादजी निलकंठराव यांच्या मदतीने पुरंदर किल्ल्यात प्रवेश केला आणि पुरंदर किल्ल्यातुन फत्तेखानाच्या हल्ल्यास यशस्वीपणे तोंड दिले. हा शिवाजी महाराजांचा आदिलशाहीवरील पहिला मोठा विजय होता.

See also  जंजिरा किल्ला : एक अजिंक्य जलदुर्ग 2021 | Full Janjira Fort Information In Marathi

त्यानंतर पुरंदर किल्ल्यावरील महत्वाची ऐतिहासिक लढाई म्हणजे मुरारबाजी देशपांडे ( murar baji Deshpande) यांचा अद्भुत पराक्रम ! दिलेरखानाच्या ( dilerkhan) सुलतानढव्याला आपल्या पराक्रमाने परतवून लावून मुरारबाजी  देशपांडे येथेच अमर झाले. अवघ्या ७०० मावळ्यांना घेवुन मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेर खानाचा हल्ला परतवून लावला होता. मुरारबाजी देशपांडे यांच्या मृत्युनंतरही दिलेर खानाला पुरंदर किल्ला जिंकता आला नाही. त्यानंतर शिवाजी महाराज आणि मुघलांच्या वतीने मिर्झा राजे जयसिंग ( mirza raje jaysing) यांच्यात जो तह झाला तो इतिहासात पुरंदरचा तह ( purandarcha tah) म्हणून प्रसिद्ध आहे. या तहानुसार पुरंदर किल्ल्यासह  एकून २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले होते.

छत्रपती संभाजी महाराजांच्या (chhatrapati sambhaji maharaj) मृत्युनंतर औरंगजेबाने पुरंदर किल्ला जिंकुन त्याचे नाव आजमगड असे ठेवले. नंतर काही वर्षांनी शंकर नारायण सचिव यांनी मुघलांकडून हा किल्ला जिंकुन घेतला.

सवाई माधवराव पेशवे ( savai madhavrao peshave) यांचा जन्म १६९७ मध्ये याच किल्ल्यावर झाला. १८१८ ला मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पुरंदर किल्ल्यावरील प्रेक्षणीय ठिकाणे :

पुरंदर आणि वज्रगड एकाच  डोंगरावर वसलेले आहेत. पुरंदरपेक्षा मात्र वज्रगड उंचीने कमी आहे.

बिनी दरवाजा :

purandar fort information in marathi

पुरंदर माचीवर हा दरवाजा आहे. पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपुर या गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो.बिनी दरवाज्यातून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडया आहेत. सरळ रस्त्याने गेल्यावर काही बंगले आणि लष्कराच्या बराकी दिसतात.

पुरंदरेश्वर मंदिर :

पुरंदरेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर असून त्यात इंद्राची सव्वा ते दिड फूटापर्यंतची मूर्ति आहे. या मंदिराच्या रचनेवर हेमाडपंथी स्थापत्याचा प्रभाव दिसून येतो. या मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्या बाजीराव पेशव्यांनी केला होता.

रामेश्वर मंदिर :

पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूला पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या वर पुढे गेल्यावर पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी बांधलेल्या वाड्याचे अवशेष दिसतात.

दिल्ली दरवाजा :

दिल्लीच्या दिशेने तोंड असलेला हा दिल्ला दरवाजा होय. या दरवाज्याच्या जवळ श्री लक्ष्मी मातेचे मंदिर आहे. या दरवाज्याच्या आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा आहे. या दरवाज्यातून पुढे गेल्यावर आणखी एक दरवाजा आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या प्रतिकृती आहेत. तर डावीकडील वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे जाते. याच मार्गाने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी दिसतात.

See also  Panhala fort Information In Marathi 2021 | पन्हाळा किल्ला माहिती

केदारेश्वर मंदिर :

केदारेश्वर मंदिर

पुरंदरचे मूळ दैवत केदारेश्वर होय. या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. दर महाशिवरात्रीला येथे खुप मोठी गर्दी असते. केदारेश्वर मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळा आहे. पुरंदरच्या उंच भागावर हे मंदिर स्थित आहे. येथून तोरण,राजगड,रोहिडा,मल्हारगड दिसतात.

भैरवखिंड :

पुरंदरच्या माचीवरून थोड पुढे गेल्यावर भैरवखिंड आहे. या खिंडीतुन वज्रगडाकडे जाता येते. या खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. जवळच राजाळे तलाव आहे.

खंदकडा :

पुरंदर किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे एक कडा थेट गेलेला आहे. यालाच खंदकडा म्हणतात.

मुरार बाजी देशपांडे यांचा पुतळा :

मुरारबाजी देशपांडे

मुरारबाजी देशपांडे. flicr.com

बिनी दरवाज्यातुन आत गेल्यावर समोरच मुरारबाजी यांचा पुतळा आहे. हा पुतळा १९७० साली स्थापन केलेला आहे.

 

पद्मावती तलाव :

मुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्याच्या थोडे पुढे गेल्यावर पद्मावती तलाव आहे.

शेंदऱ्या बुरुज :

पद्मावती तलावाच्या मागे आणि बालेकिल्ल्याच्या वायव्येस एक बुरुज आहे त्यास शेंदऱ्या बुरुज म्हणतात.

purandar fort information in marathi म्हणजेच पुरंदर किल्ला व्यवस्थित बघण्यासाठी जवळपास दोन दिवस लागतात.

पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग :

पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोंन मार्ग आहेत. पहिला मार्ग पुण्यावरून ३० किमी. अंतरावर सासवड येथे आल्यावर तेथून बसने नारायणपुर पर्यंत जाता येते. नारायणपुरवरून किल्ल्यावर जाण्यास चांगला रस्ता आहे. तेथूनच एक जंगलातील पायवाट देखील आहे. त्यामार्गे १ तास लागतो.

दूसरा मार्ग जरा कठीण आहे. सासवड-भोर मार्गे जाणारी बस पुरंदर घाटमाथा येथे थांबते. तेथून पायवाटेने पुरंदरवर जाता येते.

राहण्याची व्यवस्था :

purandar fort information in marathi म्हणजेच पुरंदर किल्ला सध्या मिलिटरीच्या ताब्यात आहे. तेथे मिलिटरीचे बंगले आहेत. तेथे मिलिटरी अधिकाऱ्याची परवानगी घेतल्यावर राहता येते. जेवण मात्र सोबत आणावे लागते.

पुरंदर किल्ला गिरिदुर्ग असला तरी ट्रेकिंगसाठी सोपा आहे. आपण या किल्ल्यास भेट देऊन एक अलौकिक अनुभव प्राप्त करू शकता.

चाणक्य नीति याबद्दल तुम्ही खालील लिंक वरुन माहिती घेवु शकता. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

See also  Sambhaji Maharaj history in marathi language 2021 | छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती

  चाणक्य नीति मराठी माहिती

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइट ला ही भेट देऊ शकता.

Spread the love

7 thoughts on “Purandar fort information in marathi 2021 | पुरंदर किल्ला माहिती”

  1. किल्ले पुरंदरबद्दल परिपुर्ण माहिती अतिशय विस्तृतपणे सदर लेखात दिली आहे.ही माहिती इतिहास संशोधन विशेषतः महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपुर्ण आहे.

    Reply

Leave a Comment