भारतीय वंशाच्या सुएला ब्रेवरमन यांना मिळाला पहिला राणी एलिझाबेथ द्वितीय वूमन ऑफ द ईयर पुरस्कार | Suella Braverman Gets Woman Of The Year Awards 2022
ब्रिटनची गृहमंत्री असलेल्या सूएला ब्रेवरमन (Suella Braverman Gets Woman Of The Year Awards 2022) यांना पहिला राणी एलिझाबेथ द्वितीय वूमन ऑफ द ईयर 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 ला लंडन येथे झालेल्या एका कार्यक्रमात 42 वर्षीय सुएला ब्रेवरमन यांना मिळालेला पुरस्कार त्यांच्यावतीने त्यांच्या आई – वडिलांनी स्वीकारला.
हे ही वाचा : स्वतंत्र भारताची पहिली महिला कॅबनेट मंत्रीराजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Woman Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur
कोण आहेत सुएला ब्रेवरमन ?Suella Braverman Gets Woman Of The Year Awards 2022
सुएला ब्रेवरमन यांचा जन्म 3 एप्रिल 1980 ला लंडनमध्ये झाला. सुएला ब्रेवरमन ह्या पेशाने वकील आहेत. 2015 पासून त्या फेयरहेम (fareham) मधून ब्रिटनच्या पार्लमेंटच्या सदस्य आहेत. 2020 मध्ये ब्रिटनच्या अटॉर्नी जनरल बनल्या. 6 सप्टेंबर 2022 रोजी नवनियुक्त ब्रिटिश पंतप्रधान लिज ट्रस यांच्या मंत्रिमंडळात त्या ब्रिटनच्या गृह मंत्री (Home Secretary of UK 2022) बनल्या. त्यांच्या अगोदर प्रीती पटेल या ब्रिटनच्या गृह मंत्री होत्या.
सुएला ब्रेवरमन या कंजर्वेटीव पक्षाच्या आहेत. त्यांनी ऋषी सूनक यांचा प्रचारही केला होता. एकप्रकारे त्या लीज ट्रस यांच्या विरोधात होत्या. परंतु लिज ट्रस यांनी सुएला यांना आपल्या मंत्रिमंडळात गृह मंत्री हे महत्त्वाचे पद दिले. ब्रिटनमधील शरणार्थी रवांडा येथे स्थलांतरित करण्याच्या कार्यात सुएला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सुएला ब्रेवरमन मूळच्या कोठच्या आहेत ? Suella Brivarman origin
सुएला ब्रेवरमन यांची आई उमा ह्या मूळच्या तमिळ तर वडील क्रिस्टी फर्नांडिस गोव्याचे आहेत. त्यांचे आई वडील अगोदर मॉरिशस गेले. नंतर 1960 मध्ये ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. 2018 मध्ये त्यांनी रायल ब्रेवरमन (Rael Brevarman) यांच्यासोबत लग्न केले.
सुएला ब्रेवरमन या बौद्ध धर्माला मानतात. त्यांनी पार्लमेंटमध्ये धम्मपदाला साक्षी ठेवून शपथ घेतली.
मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.
तुम्ही आमच्या फेसबुक पेज अंतरंगला फॉलो करून विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.
तुम्ही आमच्या मराठी माहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.
संदर्भ : गुगल
1 thought on “भारतीय वंशाच्या सुएला ब्रेवरमन यांना मिळाला पहिला राणी एलिझाबेथ द्वितीय वूमन ऑफ द ईयर पुरस्कार | Suella Braverman Gets Woman Of The Year Awards 2022”