सप्तशृंगी माता मंदिर मराठी माहिती | Saptshrungi Mata Mandir Nashik 2022

सप्तशृंगी माता मंदिर मराठी माहिती | Saptshrungi Mata Mandir Nashik 2022

Saptshrungi Mata Mandir Nashik 2022
source : en.wikipedia. org

Saptshrungi Mata Mandir Nashik 2022 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी माता मंदिर (Saptshrungi Mata Mandir Nashik 20220) आहे. आद्य शक्तीपीठ म्हणून मान्यता मिळालेले हे शक्तीपीठ भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे श्रद्धास्थान अतिप्राचीन आणि स्वयंभू मानले जाते. आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील सप्तशृंगी माता मंदिर (सप्तशृंगी गड)  या आद्य शक्तीपीठाबाबत माहिती जाणून घेऊ या.

सप्तशृंगी माता मंदिर (सप्तशृंगी गड ) कोठे आहे ?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड कळवण तालुक्यात आहे. सप्तशृंगी गड नाशिकपासून उत्तरेला सुमारे 60 किमी दूर आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. सप्तशृंगी माता मंदिर सह्याद्रीच्या पठारावर वसलेले आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून जवळपास 4659 उंच आहे. सप्तश्रुंग याचा अर्थ सात शिखरे असा होतो. या गडावर विविध वनौषधी आढळून येतात.

हे हे वाचा : मीनाक्षी मंदिर माहिती 

सप्तशृंगी माता मंदिर माहिती : Saptshrungi Mata Mandir Nashik 2022

Saptshrungi Mata Mandir Nashik 2022
source : en.wikipedia.org

सप्तशृंगी मातेचे मंदिर महाराष्ट्रातील अर्धे शक्तीपीठ मानले जाते. पाषाणात कोरलेली देवीची मूर्ती आठ फुट उंच आहे. देवीला 18 हात असून ती विविध आयुधांनी सज्ज आहे.

सप्तशृंगी माता मंदिराबाबत आख्यायिक (इतिहास) : Saptshrungi Mata Mandir Nashik 2022

आपल्या अनेक धर्मग्रंथांत सप्तशृंगी मातेबाबत अनेक उल्लेख आढळतात. असे म्हटले जाते की, प्रभू श्रीराम आणि सीतामाता वनवासात असतांना जेव्हा दंडकारण्यात आले तेव्हा या मातेच्या दर्शनाला आले होते.

See also  Badrinath Temple History In Marathi 2021 | भगवान बद्रीनाथ मंदिरबाबत माहिती

अनेक पौराणिक कथांमध्ये असे म्हटले आहे की, महिषासुराचा वध केल्यावर  देवी माता या ठिकाणी विश्रांतीसाठी आली होती.

लीळाचरित्रमध्ये असा उल्लेख आहे की, लक्ष्मण – मेघनाथ युद्धात मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणसाठी हनुमानजींनी आणलेल्या पर्वताचा जो तुकडा पडला तो म्हणजेच हा सप्तशृंगी गड होय.

सप्तशृंगी माता मंदिर गडावर कसे जायचे ?

सप्तशृंगी माता मंदिर गडावर जाण्यासाठी नाशिक येथून जुन्या मध्यवर्ती बस स्थानकातून बसेस सुटतात. दिंडोरी नाका येथूनही सप्त शृंगीमाता मंदिर गडासाठी बसेस आहेत. जत्रेच्या कालावधीत जादा बसेस उपलब्ध असतात. मंदिरावर जाण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. ह्या मार्गाने मंदिरावर गेल्यावर दुसऱ्या बाजूने जाण्याचा मार्ग आहे.

 निवास आणि भोजन व्यवस्था :

मंदिराच्या ट्रस्टने भक्तांना निवास आणि भोजनाची सोय उपलब्ध केली आहे. गडावर 214 खोल्या उपलब्ध आहेत.

20 रुपयांमध्ये येथे जेवण मिळते. नवरात्र , चैत्र आणि पौर्णिमेला मोफत जेवण असते.

सप्तशृंगी गडावर पाहण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत ?

कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शितकडा, शिवतीर्थ, गुरुदेव आश्रम आणि गणपती मंदिर ही गडावर पाहण्यासारखी आहेत.

मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्ही आपल्या मित्रांना जरूर ही माहिती शेयर करा.

तुम्ही आमच्या अंतरंग ह्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा.

मराठी माहिती या वेबसाईटवर जाऊन तुम्ही विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

संदर्भ : गुगल

Spread the love

Leave a Comment