Badrinath Temple History In Marathi 2021 | भगवान बद्रीनाथ मंदिरबाबत माहिती

Badrinath Temple History In Marathi 2021 |भगवान बद्रीनाथ मंदिरबाबत माहिती

Badrinath Temple History In Marathi 2021

Badrinath Temple History In Marathi 2021 हिंदू धर्मातील अतिक्षय पवित्र असे भगवान बद्रीनाथ मंदिर आहे. हिंदू धर्मात मान्यता असलेल्या चार धामपैकी एक हे भगवान बद्रीनाथचे मंदिर आहे. भगवान विष्णूला हे मंदिर समर्पित आहे. आजच्या या लेखात आपण बद्रीनाथ मंदिराबाबत माहिती घेऊ या.

भगवान बद्रीनाथ मंदिर कोठे आहे ? Badrinath Temple History In Marathi 2021

Badrinath Temple History In Marathi 2021

उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यातील बद्रीनाथ या गावात अलकनंदा नदीच्या काठी बद्रिनाथाचे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3133 मी. (10,279 फुट) उंच आहे.

भगवान बद्रीनाथ मंदिर कोणी निर्माण केले ?

असे म्हटले जाते कि बद्रीनाथ मंदिराची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी केली. त्यानंतर सोळाव्या शतकात गढवालच्या राजाने सध्याच्या मंदिरात बद्रिनाथाच्या मूर्तीची स्थापना केली.

इ.स. 1803 मध्ये हिमालयात भूकंप आला होता. त्यावेळी या मंदिराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर जयपूरच्या राजाने या मंदिराचे पुहा बांधकाम केले.

हे ही वाचा रामेश्वरम मंदिर 

भगवान बद्रीनाथ मंदिराच्या नावाबाबत आख्यायिका :

या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे कि, एकदा भगवान विष्णू या ठिकाणी तपश्चर्येला बसले होते. भगवान विष्णूला ऊन लागू नये म्हणून माता लक्ष्मी देवीने बदरीचे म्हणजेच बोरीच्या झाडाचे रूप घेऊन त्यांना सावली दिली. त्यामुळे या ठिकाणाला बदरीवरून बदरीनाथ असे नाव पडले. तसेही या मंदिराच्या परिसरात बोरीची झाडे पुष्कळ आहेत.

See also  Rameshwaram Temple History In Marathi २०२१ | रामेश्वरम मंदिराचा इतिहास

विष्णू पुराण, स्कंद पुराण आणि महाभारत यांमध्येही या मंदिराचा उल्लेख मिळते.

भगवान बद्रीनाथ मंदिराची स्थापत्यकला :

हे मंदिर संपूर्ण दगडापासून बनविले आहे. अलकनंदा नदीच्या काठापासून सुमारे 50 मीटर हे मंदिर उंच आहे. मंदिरात गर्भगृह, दर्शनमंडप आणि सभामंडप आहेत. लांब शिड्यांच्या साहाय्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात पोहोचता येते. या मुख्य द्वाराला सिंहद्वार असेही म्हणतात. याठिकाणी कमानीच्या आकाराचे एक द्वार आहे. या दरवाज्याच्या वरच्या बाजूला तीन सोनेरी कलश आहेत. छताच्या वरच्या बाजूला एक विशालकाय घंटी लटकवली आहे.

मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर एक मंडप आहे. तेथे भाविक पूजाअर्चा करतात. त्या मंडपात खूप मोठे स्तंभ आहेत. त्यावर मुर्त्या कोरलेल्या आहेत. गर्भागृहाचे छत शंकूच्या आकाराचे आहे. हे छत रुंद असून ते 15 मीटर लांब आहे.

गर्भगृहात असलेली  भगवान बद्रीनाथाची शालीग्रामची मूर्ती सुमारे 1 मीटर ( 3.3 फुट ) आहे. चतुर्भुज असलेली ही मूर्ती झाडाखाली आहे. मूर्तीच्या वरती असलेले छत सोन्याचे आहे. भगवान बद्रिनाथाच्या एका हातात शंख आहे तर दुसऱ्या हातात चक्र आहे. इतर दोन हात योगमुद्रामध्ये मांडीवर आहेत.

गर्भगृहात नर आणि नारायण यांच्याखेरीज नारद,उद्धव यांच्याही मुर्त्या आहेत. त्याशिवाय मंदिराच्या सभोवती लक्ष्मी,गरुड आणि नवदुर्गा यांच्या मुर्त्या आहेत. त्यासोबतच लक्ष्मी नृसिंह आणि आदि शंकराचार्य आणि काही इतर देवतांच्या मुर्त्या आहेत. ह्या मंदिरात असलेल्या सर्व मुर्त्या शालीग्रामपासून बनविलेल्या आहेत.

हे ही वाचा मीनाक्षी अम्मान मंदिर

माता मूर्तीची यात्रा :

भगवान बद्रीनाथच्या तीर्थक्षेत्री माता मूर्तीची यात्रा दरवर्षी भरत असते. हा सोहळा म्हणजे गंगा नदीचा पृथ्वीवरील आगमनाचा उत्सव असतो. याशिवाय बद्रिकेदार हा देखील उत्सव तेथे साजरा केला जातो. हा सोहळा दरवर्षी जून महिन्यात भगवान बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरात साजरा केला जातो.

भगवान बद्रीनाथच्या मंदिराला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ   कोणती ?

भगवान बद्रीनाथच्या मंदिराला भेट देण्यासाठी मे ते जून हा कालावधी सर्वात उत्तम आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यानही भाविक या ठिकाणी भेट देत असतात. नोव्हेंबर पासून याठिकाणी बर्फ पडत असते. त्यामुळे त्याकाळात आणि पावसाळ्यात हे मंदिर बंद असते. त्याकाळात तेथे भूस्खलन होत असते.

See also  Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021 | अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर

हे ही वाचा रहस्यमयी भगवान पुरी मंदिर

भगवान बद्रीनाथच्या मंदिर येथे कसे जावे ?

जर आपण रोडद्वारे जात असाल तर अगोदर आपणास ऋषिकेश येथे जावे लागेल. तेथून बद्रीनाथ मंदिर 294 किमी लांब आहे. ऋषिकेशवरून बद्रीनाथासाठी पुष्कळ बसेस उपलब्ध आहेत.

रेल्वेने जर असाल तर बद्रीनाथपासून जवळील रेल्वे स्टेशन हरिद्वार आहे. बद्रीनाथ ते हरिद्वार अंतर 154 किमी आहे.

पाहण्यासारखी ठिकाणी :

अलकनंदा नदीच्या काठी तप्त कुंड आहे. धार्मिक कार्यासाठी याठिकाणी भाविक येतात. त्याशिवाय भीम पूल जो नैसर्गिक बनलेला आहे. गणेश गुफा,व्यास गुफा तुम्ही पाहू शकता. वसुंधरा झरा हे देखील एक रमणीय ठिकाण तेथे आहे. कागभूशुंडी तळ, पांडूकेश्वर ही ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत.

तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला भेट देऊ शकता.

स्त्रोत : गुगल

 

 

 

Spread the love

Leave a Comment