Table of Contents
जगातील सर्वात लांब नदी नाईलविषयी संपूर्ण माहिती | Nail River Information In Marathi 2023
मानवी संस्कृतीच्या इतिहासात नद्यांना (Nail River Information In Marathi 2023)खूप मोठे महत्व आहे. सुरुवातीपासून मानवी वस्ती ही नद्यांच्या काठी वसलेल्या आढळून येतात.जगातील विविध संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झालेल्या आढळून येतील. आजच्या या लेखात आपण मानवी इतिहासात महत्वाची असणाऱ्या नाईल नदीची माहिती जाणून घेणार आहोत.
नाईल नदीची वैशिष्ट्ये : Nail River Information In Marathi 2023
जगातील सर्वात लांब नदी कोणती ?/नाईल नदीची लांबी किती आहे ?
आफ्रिका खंडात असलेली नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी सुमारे 6650 किमी (4130 मैल) आहे. या नदीच्या प्रवाहाखाली सुमारे 33,49,000 चौ.किमी क्षेत्र आले आहे.
नाईल नदी किती देशांमधून वाहते ? Nail River Information In Marathi 2023
ही आफ्रिकन नदी जवळपास 10 देशांमधून वाहत जाते. इजिप्त,टांझानिया, रवांडा,युगांडा,केनिया,बुरुंडी, दक्षिण सुदान, सुदान, इथिओपिया आणि कांगो या देशांमधून ही नदी वाहते.
हे ही वाचा : गंगा नदीविषयी माहिती
नाईल नदी कोणत्या समुद्रास मिळते ?
उत्तरवाहिनी असलेली नाईल नाईल नदी भूमध्य सागरास मिळते.
नाईल नदीच्या काठी कोणती संस्कृती उदयास आली ? नाईल नदीच्या काठी कोणती मानवी संस्कृती होती ?
नाईल नदीच्या काठी इजिप्तशियन संस्कृती विकसित झाली होती. या संस्कृतीचा काळ साधारणता इ.स. पू. 5000 ते इ.स. 640 मानल्या जातो. नाईल नदीमुळे इजिप्त समृद्ध झाला आहे. म्हणूनच इजिप्तला नाईलची देणगी असे संबोधले जाते. प्राचीन इजिप्तचे लोक नाईल नदीला आर किंवा और असे संबोधत असत.
नाईल नदी कोठे उगम पावते ? / नाईल नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत?
पश्चिम आफ्रिकेत असलेल्या बुरुंडी या देशातील व्हिक्टोरिया लेक पासून नाईल नदी उगम पावते. श्वेत नाईल आणि निळी नाईल अशा दोन प्रमुख उपनद्या आहेत. श्वेत नाईल नदीचा उगम व्हिक्टोरिया लेक पासून होतो तर निळ्या नाईल नदीचा उगम इथियोपियातील ताना सरोवारापासून होतो.
श्वेत नाईल आणि निळी नाईल यांच्या संगम सुदानमधील खार्टुम या शहराजवळ होतो. येथूनच पुढे या प्रवाहाला नाईल असे म्हटले जाते.अटबारा नदी , रुकारारा नदी (कागेरा नदी), लुवियारोन्झा नदी, सुदान मधून आलेली Al Gazal नदी , इथियोपियातून आलेली सोबात नदी आणि रुवूबू नदी ह्या नाईल नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
नाईल नदीवर कोणते धरण आहे ?
नाईल नदीवर 1899 ते 1902 या काळात आस्वान हे धरण निर्माण केले गेले. त्यानंतर सेन्नार धरण, झीफ्ट बंधारा, अस्युत बंधारा नाईल नदीवर उभारण्यात आलेले आहेत.
नाईल नदीमधील जैवविविधता / नाईल नदीमध्ये कोणते जलचर आढळतात ?
या नदीच्या काठी त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. या नदीच्या काठी लांब धाग्याचा कापूस, ऊस, सातू, घेवडे,तांदूळ, तीळ, कांदे, जवस,खजूर आणि द्राक्षे ही पिके घेतात.
नाईल नदीमध्ये माशांच्या अंदाजे 129 प्रजाती आढळतात. ही नदी लॉगरहेड कासव आणि नाईल मगर यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
संदर्भ : गुगल.
मित्रांनो आम्ही दिलेली Nail River Information In Marathi 2023 ही माहिती आवडल्यास नक्की शेयर करा.
do visit to www.aboutindianenglish.com