जगातील पहिली महिला अंतराळवीर | World’s First Woman Astronuat
World’s First Woman Astronuat रशियाने स्पुटनिक 1 हा उपग्रह अंतराळात सोडला आणि अंतराळ युगाची सुरुवात झाली. रशियाने सुरवातीला लायका ही कुत्री अंतराळात सोडली. त्यानंतर रशियाने युरी गागारीन याला अंतराळात पाठवून जगातील पहिला अंतराळवीर पाठविण्याचा मान मिळविला. त्याचप्रमाणे जगातील पहिली महिला अंतराळवीर पाठविण्याचा मान देखील रशियानेच मिळविला आहे. आजच्या या लेखात आपण जगातील पहिली महिला अंतराळवीर (World’s First Woman Astronuat) कोण आहे हे जाणून घेऊ या.
जगातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ? World’s First Woman Astronuat
जगातील पहिली महिला अंतराळवीर होण्याचा मान रशियाच्या व्हेलेंटिना तेरेश्कोव्हा या रशियन महिला अंतराळवीरास मिळाला आहे.
रशियाने 16 जून 1963 रोजी वोस्तोक – 6 हे अंतराळ यान पाठविले. या अवकाश यानातून व्हेलेंटिना तेरेश्कोव्हा हिने अंतराळात जाणारी पहिली महिला अंतराळवीर होण्याचा मान प्राप्त केला.
रशियातील मासलेविकोव्ह याठिकाणी व्हेलेंटिना तेरेश्कोव्हाचा जन्म 6 मार्च 1937 ला झाला. अंतराळात महिला पाठविण्याची तयारी करत असताना चारशे महिलांमधील व्हेलेंटिना तेरेश्कोव्हाची निवड करण्यात आली. याकरिता व्हेलेंटिना तेरेश्कोव्हाचे पॅराशुटींग आणि स्कायडायव्हिंगमधील कौशल्य कामी आले.
व्हेलेंटिना तेरेश्कोव्हाने वोस्तोक – 6 या यानातून पृथ्वीभोवती 48 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे ती अंतराळात तीन दिवस होती. या कालावधीत तिने अंतराळात स्त्रीच्या शरीरात काय बदल होतात याचे निरीक्षण करत नोंद घेतली.
हे ही वाचा : भारताची पहिली महिला कॅबिनेट मंत्रीराजकुमारी अमृत कौर Full माहिती 2021 | First Woman Cabinet Minister Of India | Rajkumari Amrut Kaur
व्हेलेंटिना तेरेश्कोव्हाला मिळालेले मान – सन्मान आणि पुरस्कार :
जगातील पहिली महिला अंतराळवीर असा मान मिळाल्याने साहजिकच व्हेलेंटिना तेरेश्कोव्हा हिचे संपूर्ण जगात कौतुक झाले. तिला अमाप प्रसिद्धी मिळाली.
रशियाने आपल्या या पहिल्या महिला अंतराळवीरचा खूप सन्मान केला. तिला रशियातील विविध मान सन्मान मिळाले.
व्हेलेंटिना तेरेश्कोव्हाला ‘हिरो ऑफ सोव्हिएत युनियन’, ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ , ‘ऑर्डर ऑफ ऑक्टोबर रिव्हाल्यूशन’, ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप ‘ आणि ‘ऑर्डर ऑफ बॅनर ऑफ लोवर’ असे विविध पुरस्कार मिळाले. रशियातील रस्ते, चौक, शाळा आणि वस्तुसंग्रहालये यांना तिचे नाव देण्यात आले. चंद्रावरील काही टेकड्यांना देखील तिचे नाव देण्यात आले होते.
विविध देशांनी देखील व्हेलेंटिना तेरेश्कोव्हाचा यथोचित गौरव केला होता. झेकोस्लोव्हाकिया, रूमानिया, फ्रान्स, इटली, जर्मनी, जॉर्डन, पोलंड, इजिप्त, हंगेरी आणि बल्गेरिया या देशांनी तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. अनेक देशांनी तिला आपल्या देशाचे नागरिकत्व प्रदान केले.
जगातील बऱ्याच विद्यापीठांनी तिला मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केला होता. ‘ इट इज आरा, सी गर्ल ‘ , ‘ द फर्स्ट वूमन इन स्पेस ‘ आणि ‘ इनटू दॅट सायलेंट सी ‘ ही तीन पुस्तके व्हेलेंटिना तेरेश्कोव्हावर प्रकाशित झाली.
मित्रांनो आजच्या या लेखात आपण जगातील पहिली महिला अंतराळवीर व्हेलेंटिना तेरेश्कोव्हााविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला World’s First Woman Astronuat ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
तुम्ही आमच्या या इतिहासाची सोनेरी पाने फेसबुक पेजला फॉलो करून विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.
तुम्ही आमच्या मराठी माहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.
स्त्रोत : गुगल
1 thought on “जगातील पहिली महिला अंतराळवीर | World’s First Woman Astronuat”