Table of Contents
माईग्रेन (डोके दुखी)ची कारणे,लक्षणे आणि उपाय |Migraine Symptoms And Causes
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आजच्या या लेखात आपण मायग्रेन (Migraine Symptoms And Causes) अर्थातच डोकेदुखी यावरची लक्षणे, कारणे आणि उपाय बघणार आहोत. सर्वात आधी आपण मायग्रेन (migraine meaning in marathi) कशाला म्हणतात हे जाणून घेऊया.
डोक्याच्या अर्ध्या भागात अतिशय तीव्र वेदना होणे, उलटी,आंबट ढेकर येणे, डोळे दुखणे, डोळ्यासमोर अंधार येणे किंवा प्रकाशासारखे दिसणे तसेच मानेचा खालचा भाग दुखणे ही सर्व लक्षणे एकाच वेळी दिसणे म्हणजे मायग्रेन होय. मायग्रेनलाच अर्धशिशी असे म्हणतात.
काही लोक याला मायग्रेनचा अटॅक असे सुद्धा म्हणतात. मायग्रेनचा अटॅक कोणत्याही वयातील व्यक्तीला केव्हाही होऊ शकतो. सध्याच्या धकाधकीच्या परिस्थितीत तर याचे प्रमाण आणखीनच वाढलेले आहे. स्त्री असो पुरुष असो वा लहान बालके कोणीच यापासून सुटलेले नाही.
मायग्रेन हा आजार जीवघेणं नसला तरी त्यामध्ये होणारा त्रास थोडा गंभीर स्वरूपाचा असतो आणि विशेष म्हणजे सायन्स सुद्धा मायग्रेन होण्यामागचे नेमके कारण सांगू शकत नाही.
मायग्रेन वर उपाय शोधण्याअगोदर आपण मायग्रेन होण्यामागची कारणे सविस्तर जाणून घेऊया.
मायग्रेन कशामुळे होतो ?
1. आनुवंशिकता-
मायग्रेन होण्यामागच्या कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवंशिकता होय.आपल्या कुटुंबातील सदस्यांपैकी जर कोणाला मायग्रेन हा आजार असेल तर साहजिकच तो पुढच्या पिढीमध्ये येतो.
2.पुरेशी झोप न होणे-
पुरेसी झोप न झाल्यास डोके दुखी सुरू होऊ शकते.
3. जास्त तेलकट किंवा अति गरम,आंबट पदार्थ खाणे-
मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने असे आढळून आले आहे की त्यांनी जर अति तेलगट आंबट पदार्थ जास्त खाण्यात आली तर त्यांना हा त्रास होतो.
4. उशिरा जेवण करणे-
उशिरा जेवण करणे किंवा दोन वेळच्या जेवणामध्ये खूप मोठे अंतर ठेवणे यामुळे सुद्धा मायग्रेन होऊ शकते.सकाळी उठल्यावर नाश्ता न करता डायरेक्ट जेवण करणे यामुळे सुद्धा शरीरामधील आम्लाचे प्रमाण वाढले जाते आणि अर्थातच डोकेदुखीचा त्रास सुरू होऊन जातो.
5. अतिशय ताण घेणे-
असे म्हटले जाते की जी व्यक्ती अतिशय भावनिक आहे तिला हा त्रास जास्त होतो.बऱ्याचदा काय होती की आपल्याला अतिशय ताण येतो आणि आपण सतत त्याचाच विचार करत राहतो. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.
6. अति उत्तेजित करणारे घटक-
अति उत्तेजित करणारे घटक म्हणजे जसे की मोठ्याने होणाऱ्या आवाज, तीव्र प्रकाश तीव्र सुहास असणारे सुगंधी द्रव्य यामुळे सुद्धा मायग्रेन होऊ शकते.
7. पॅकिंग फूड किंवा चॉकलेटचे जास्त प्रमाणात सेवन करणे-
पॅकिंग फूड किंवा चॉकलेट अति जास्त खाल्ल्यामुळे सुद्धा मायग्रेन होऊ शकते. पॅकिंग फूडमध्ये प्रक्रिया करत असताना ते जास्त काळ टिकली पाहिजेत म्हणून त्यावर प्रीझर्व्हेटिव्ह वापरले असतात आणि चॉकलेट मध्ये कॅफेन नावाचा घटक असतो आणि मायग्रेन असणाऱ्या व्यक्तींना हे सहन होत नाही त्यामुळे तीव्र स्वरूपाचे डोकेदुखी सुरू होते.
8.पेय –
मायग्रेन होण्याच्या कारणांमध्ये पेय ही महत्त्वाची भूमिका बजावतात. अति जास्त प्रमाणात कॉफी किंवा चहाचे सेवन करणे. यामुळे डोकेदुखी होण्यास सुरुवात होते बऱ्याचदा उलटी सुद्धा होते.
9. औषध उपचार-
बऱ्याचदा वेगवेगळ्या आजारावर जेव्हा आपण औषध घेतो त्यापासून ऍसिडिटी होते आणि अशा वेळेला डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.
कोण कोणत्या कारणांमुळे मायग्रेन होऊ शकते हे बघितल्यानंतर आता आपण मायग्रेन मध्ये कोणते लक्षणे दिसतात हे बघणार आहोत.
हे ही वाचा : व्हिटॅमिन बी 12 का आवश्यक आहे.व्हिटॅमिन बी 12 लक्षणे आणि उपाय | Vitamin B 12
लक्षणे : Migraine Symptoms And Causes
1. सुरुवातीला सौम्य प्रकारचे डोके दुखायला सुरुवात होते हळूहळू डोके दुखण्याची तीव्रता एवढी वाढते की जणू काही कोणी हातोडेच आपल्या डोक्यामध्ये आपटतोय.
2. अर्धे डोके दुखणे डावीकडे किंवा उजवीकडे दुखायला सुरुवात होते बऱ्याचदा मध्ये सुद्धा ते दुखायला लागते.
3. डोके दुखणे एवढे तीव्र असते की चालले किंवा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला मान हलवली तरी जास्त दुखायला लागते.
4. डोक्याच्या खालच्या भागात म्हणजे मानेजवळ दुखायला लागते.
5. तोंडामध्ये जास्त प्रमाणात पाणी सुटते आणि उलटी सारखे वाटते.
6. डोळ्याच्या समोर अंधार येते किंवा तीव्र प्रकाशासारखे दिसायला लागते.
7. डोळा किंवा चेहऱ्याचा काही भाग सुजल्यासारखा दिसतो.
मायग्रेन होण्याआधी दिसणारी लक्षणे बघितल्यानंतर आपण मायग्रेनवर काय उपाय करता येतील हे बघणार आहोत.
मायग्रेनवर उपाय / अर्ध डोके दुखणे उपाय : Migraine Symptoms And Causes / Migraine treatment in marathi
1. रात्री पूर्ण झोप घेणे.
2. भरपूर पाणी पिणे.
3. वेळेवर नाश्ता व वेळेवर जेवण करणे दोन वेळच्या जेवणामध्ये जास्त अंतर न ठेवणे.
4. अति तेलगट अती गरम आणि आंबट पदार्थ खाणे टाळणे.
5. नियमित व्यायाम करणे.
6. प्रक्रिया करून बनवलेले अन्नपदार्थ खाणे टाळणे.
7. ताजे व सकस अन्नपदार्थ खाणे
8. योगा, ध्यान व प्राणायाम करणे.
मायग्रेन म्हणजे डोकेदुखी लवकरात लवकर बसण्यासाठी काही आपण घरगुती उपाय बघणार आहोत.
1. डोक्याची मालिश करणे –
मायग्रेनचा त्रास होत असल्यास जर आपण डोक्याची, मानेची आणि खांद्याची तेल लावून मालिश केली तर बऱ्यापैकी आराम मिळतो. मालिश करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचे तेल वापरू शकता.
2. अद्रकचा उपयोग –
अद्रकचा एक छोटासा तुकडा तोंडामध्ये ठेवून त्याचा रस पीत राहावा यामुळे बऱ्यापैकी आराम मिळतो.
3. दूध आणि गुळाचे सेवन –
मायग्रेन डोकेदुखी मध्ये दूध आणि गुळाचे सेवन केल्यास ताबडतोब आराम मिळतो रोज सकाळी उठल्यानंतर गुडाचा एक छोटासा तुकडा तोंडात ठेवून त्यावर दूध प्यावे यामुळे मायग्रेन डोकेदुखीवर फायदा मिळतो.
4.लवंग –
तोंडामध्ये लवंग ठेऊन ती चघडत राहिल्यास सुद्धा बऱ्यापैकी आराम मिळतो.
5. कोमट पाणी पिऊन उलटी करण्याचा प्रयत्न करणे-
बऱ्याचदा मायग्रेन अटॅकमध्ये स्वतःहूनच उलटी होते. मात्र जर उलटी होत नसेल तर गडवाभर कोमट पाणी पिऊन उलटी करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे डोकेदुखीवर आराम मिळतो.
मायग्रेन (Migraine Symptoms And Causes) या आजारावर परफेक्ट उपाय नसला तरी पण वर दिलेल्या माहितीप्रमाणे जर तुम्ही उपाययोजना केली तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. या प्रकारच्या आणि अशा वेगवेगळ्या माहिती पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी नक्कीच वाचत राहा www.historicaltouch.com धन्यवाद.
विविध प्रकारच्या महितींसाठी तुम्ही मराठी माहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट द्या.
तुम्ही आमच्या अंतरंग आणि इतिहासाची सोनेरी पाने या फेसबुक पेजेसना जरूर फॉलो करा.
संदर्भ : गुगल