ऑक्टोबर महिना (October Month Dinvishesh) सुरू झाला की लगेच ऋतू बदलायला सुरुवात होते. पावसाचा ओलावा कमी होऊन वातावरणात गारवा जाणवू लागतो. हा महिना जणू सण, उत्सव, परंपरा आणि ऐतिहासिक घटनांची भमांदियाळी असते. आपल्या कुटुंबीयांपासून समाज, राष्ट्र आणि जगभरातील महत्त्वाच्या दिवसांची आठवण करून देणारा हा महिना तसा खूपच खास मानला जात असतो.
चला तर मग पाहूया – या ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे दिनविशेष.
१ ऑक्टोबर – ज्येष्ठ नागरिक दिन व कॉफी दिन
ऑक्टोबरची सुरुवात होते ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक दिनापासून. आपल्या वडीलधाऱ्यांचा अनुभव म्हणजे खास खजिना. त्यांचा सन्मान करून, त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी १ ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. याच दिवशी जागतिक कॉफी दिनही साजरा होतो हे पण खास . सकाळची झोप उडवणारी, थकवा घालवणारी कॉफी या पेयाला जागतिक स्तरावर मान्यता देण्याचा १ ऑक्टोबर हा दिवस असतो.
२ ऑक्टोबर – गांधी जयंती आणि शास्त्री जयंती
हा दिवस भारतीयांसाठी अतिशय खास आहे. कारण …..
महात्मा गांधीजी – सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्य संग्रामाचे जनक म्हणजे महात्मा गांधीजी . त्यांच्या विचारांचा आजही जगभर प्रभाव आहे.
लाल बहादूर शास्त्रीजी – साधेपणा, प्रामाणिकपणा आणि “जय जवान, जय किसान”चा संदेश देणारे भारताचे माजी पंतप्रधान. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते.
५ ऑक्टोबर – जागतिक शिक्षक दिन
शिक्षक फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाही, तर माणूस घडवतो. त्यांच्या मेहनतीला मान्यता देण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.
१९४९ ला याच दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खडकवासला (पुणे महाराष्ट्र) या ठिकाणी जगातील पहिली त्रि- सेवा अकादमी म्हणजे राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनीच्या (NDA) मुख्य इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.
८ ऑक्टोबर – भारतीय वायुदल दिन
आपल्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे भारतीय वायुदल दिन. १९३२ साली भारतीय वायुदलाची स्थापना झाली आणि तेव्हापासून हा दिवस भारतात अभिमानाने पाळला जातो.
९ ऑक्टोबर – टपाल दिन
आज आपण मोबाईल आणि ई-मेल वापरतो, पण पत्रव्यवहाराची जुनी पद्धत म्हणजे टपाल होय. याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक टपाल दिन सर्वत्र साजरा होतो.
१० ऑक्टोबर – मानसिक आरोग्य दिन
शारीरिक आरोग्यासारखेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. तणाव, नैराश्य, चिंता याबद्दल उघडपणे बोलावे यासाठी मानसिक आरोग्य दिन हा दिवस जगभर पाळला जातो.
१५ ऑक्टोबर – डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन
भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती, विज्ञान आणि शिक्षण यासाठी आयुष्य समर्पित करणारे डॉ. ए.पी.जे. कलाम यांचा जन्मदिवस. याच दिवशी जागतिक पांढरी काठी दिनसुद्धा येतो, जो दृष्टिहीन व्यक्तींच्या स्वावलंबनाचे प्रतीक देखील आहे.
१६ ऑक्टोबर – अन्न दिन | October Month Dinvishesh
उपासमार आणि कुपोषण अजूनही जगातील खूप मोठी समस्या आहे. अन्नाचा अपव्यय टाळावा, अन्नसुरक्षा वाढवावी याची जाणीव करून देणारा हा दिवस.
१७ ऑक्टोबर – दारिद्र्य निर्मूलन दिन
समाजातील विषमता कमी करण्यासाठी, दारिद्र्याचे निर्मुलन करण्यासाठी, गरीब लोकांच्या हक्कांसाठी जनजागृती करणारा हा दिवस.
२० ऑक्टोबर – ऑस्टिओपोरोसिस दिन
हाडांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. विशेषतः महिलांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो.
२४ ऑक्टोबर – संयुक्त राष्ट्र संघ दिवस
१९४५ साली UNO स्थापन झाले. जगभर शांतता, विकास आणि मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या या संस्थेची आठवण करून देणारा संयुक्त राष्ट्र संघ दिवस.
३१ ऑक्टोबर – राष्ट्रीय ऐक्य दिन
‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय ऐक्य दिन . त्यांनी भारत एकसंध ठेवण्यासाठी मोठी भूमिका निभावली होती. या दिवशी देशभरात राष्ट्रीय एकता शपथ घेतली जाते. परदेशात याच दिवशी हॅलोवीन उत्सव रंगत असतो.
🌿 ऑक्टोबर महिन्याची खास वैशिष्ट्ये | October Month Dinvishesh
हा महिना भारतीय सणांसाठीही प्रसिद्ध आहे. नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा हे उत्सव बहुधा याच महिन्यात येत असतात.
एकीकडे सामाजिक जागृतीचे दिवस, तर दुसरीकडे आनंद-उत्सव यांचा संगम या महिन्यात बघायला मिळते.
गांधीजींपासून कलाम साहेबांपर्यंत प्रेरणा देणाऱ्या नेत्यांच्या जयंत्या आपल्याला आदर्श घ्यायला शिकवतात.
✨ निष्कर्ष : October Month Dinvishesh
ऑक्टोबर महिना म्हणजे जणू एका पुस्तकातले विविध धडे. काही दिवस आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात, काही समाजाबद्दल जबाबदारी शिकवतात, तर काही दिवस आनंद आणि उत्सवाचा अनुभव देतात. अशा या महिन्यात आपण फक्त तारखा लक्षात ठेवायच्या नाहीत, तर त्यामागचं खरं महत्त्वही समजून घ्यायचं आहे.
मित्रांनो तुम्हाला जर शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर http://marathitrader.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.