जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान संपूर्ण माहिती | Jim Corbett National Park 2023

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान संपूर्ण माहिती | Jim Corbett National Park 2023

Jim Corbett National Park 2023
Jim Corbett National Park 2023

 

जिम कॉर्बेट हे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचप्रमाणे भारतातील सर्वात पहिला व्याघ्रप्रकल्प ठरण्याचा मानही जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानालाच जातो. आजच्या या लेखात आपण जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान संपूर्ण माहिती  (Jim Corbett National Park 2023) या बाबत माहिती घेऊ या.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे जुने नाव काय होते ? / जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली ?

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे पूर्वीचे नाव हेली नॅशनल पार्क असे होते. 1936 ला स्थापन झालेल्या या राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू कमी होत चाललेल्या बंगाली वाघांचे संवर्धन करणे हे होते. संयुक्त प्रांताचे तत्कालीन राज्यपाल माल्कम हेली यांच्या नावावरून या उद्यानास हेली नॅशनल पार्क हे नाव मिळाले.

सुरुवातीला प्रसिद्ध शिकारी असलेला जिम कॉर्बेट हा नंतर वन्यजीव संरक्षक बनला. 1955 ला त्याच्या मृत्यू झाला. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1957 ला जिम कॉर्बेट यांचे नाव हेली नॅशनल पार्कला देण्यात आले.

वास्तविक हेली नॅशनल पार्कला स्वातंत्र्यानंतर रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे नाव द्यायचे ठरले होते. मात्र नाव मिळाले जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. आता अलीकडे पुन्हा या पार्कला रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे नाव द्यायचे ठरले आहे.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोठे आहे ?

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंडमधील नैनिताल या जिल्ह्याजवळ असलेल्या रामनगर या शहराजवळ वसलेले आहे. रामगंगा नदीच्या काठावर वसलेले हे राष्ट्रीय उद्यान, गढवाल आणि कुमाऊं यांच्या दरम्यान आहे.

See also  Jaypur Pink City - World Heritage 2019 | गुलाबी शहर जयपुर जागतिक वारसा स्थळ

एकून 1316 चौ.किमी परिसरात जिम कॉर्बेट नॅशनल पार्क वसलेले आहे.

हे ही वाचा : सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये कोणते प्राणी आढळतात ?

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापनेचा मूळ हेतू लुप्त होत चाललेल्या रॉयल बंगाली टायगरचे संवर्धन करणे हा होता. त्यामुळे या अभयारण्यात रॉयल बंगाली टायगर, आशियायी हत्ती, मगरी, चित्ते, अस्वल, हरीण, असे पुष्कळ प्राणी आढळून येतात.

Jim Corbett National Park 2023
Jim Corbett National Park 2023

पक्ष्यांच्या 600 पेक्षा जास्त प्रजाती देखील या ठिकाणी दिसून येतात. त्यात प्रामुख्याने मोर, कबुतर, ईगल हे पक्षी आहेत.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देण्याची उत्तम वेळ कोणती ?

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. साधारणता नोव्हेंबर ते जून या काळात भेट देणे केव्हाही उत्तम राहते.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान येथे कसे जावे ?

रामनगरच्या रेल्वे स्टेशनपासून जिम कॉर्बेटचे गेट सुमारे 12 किमी आहे. दिल्लीपासून ते रामनगरपर्यंत ट्रेनने जाता येते. तेथून खाजगी बसने या पार्कला जाता येते.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान मुक्काम सोय  :

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमध्ये असलेल्या अतिथी ग्रहात मुक्काम करता येतो. या ठिकाणी 200 लीकांच्या राहण्याची सुविधा आहे. या शिवाय रामनगरमध्ये खाजगी हॉटेलदेखील आहेत.

भारताच्या या पहिल्या राष्ट्रीय उद्यानास भेट देऊन तुम्ही नक्कीच आनंदी होऊ शकता.

संदर्भ : गुगल

Please Do Visit To www.aboutindianenglish.com 

Spread the love

Leave a Comment