Table of Contents
Maharashtra SSC Result 2026 | इयत्ता दहावीची मार्कशीट कधी मिळणार? ?

विद्यार्थी मित्रांनो फेब्रु – मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता 10 वी) परीक्षेच्या निकालाची (Maharashtra SSC Result 2026) तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मे 2026 च्या पहिल्या आठवड्यात हा निकाल लागणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार फेब्रु – मार्च – 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 8 मे 2026 ला लागणार आहे. हा निकाल 8 मे 2026 ला दुपारी ठीक 01.00 घोषित केल्या जाणार आहे. या ठिकाणी तुम्ही इयत्ता 10 वी चा निकाल बघू शकता. तत्पूर्वी इयत्ता बारावीचा निकाल दिनांक २ मे 2026 रोजी जाहीर झाला होता.
यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 20 फेब्रु ते दिनांक 18 मार्च 2026 या दरम्यान पार पडली होती.
SSC Maharashtra State Board 2025-26 ला सुमारे 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. आता या विद्यार्थ्यांची आणि पालकांची निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे. खाली दिलेल्या माहितीवरून तुम्ही 10 वी चा निकाल बघू शकता.
हे ही वाचा : इयत्ता 10 वी आणि 12 वी नंतर काय कराल ?
महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत website वर निकाल कसा बघावा ? Maharashtra SSC Result 2026
- विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम www.mahresult.nic.in या अधिकृत असलेल्या website वर जावे.
- वरील website च्या होमपेज वर 10 वी च्या निकालाच्या लिंक वर क्लिक करावी.
- स्वतःचा बोर्डाचा रोल नंबर पूर्ण टाकावा.
- त्यानंतर स्वतःच्या आईचे नाव टाइप करावे.
- त्यानंतर ‘निकाल पहा‘ या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला स्वतःचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
विद्यार्थी मित्रांनो मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळे खालीलप्रमाणे आहेत. त्यावरून तुम्ही वरील स्टेप वापरून आपला निकाल बघू शकता.
खालील अधिकृत लिंकवरून तुम्ही आपला निकाल बघा.
- www.mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://ssc.mahresults.org.in
- https://lokmat.news18.com
- https://www.indiatoday.in/education-today/results
- http://mh10.abpmajha.com
- https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याप्रकारे आपला इयत्ता 10 चा निकाल Maharashtra 10th Result 2026 बघू शकाल. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
इयत्ता दहावीची मार्कशीट कधी मिळणार ?
आज ऑनलाईन निकाल लागल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा दिवसांनी गुणपत्रिका शाळांना मिळतील. त्यानंतर विद्यार्थी आपली गुणपत्रिका आणि शाळा सोडण्याचा दाखला (TC) शाळेतून घेऊ शकतील.
विद्यार्थी रिचेकिंग साठी सुद्धा फॉर्म भरू शकतात त्यासाठी त्यांनी आपल्या शाळेत जाऊन चौकशी करावी.
विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा!!!
तुम्हाला आमचा हा लेख आवडल्यास शेअर करा.
तुम्ही आमच्या मराठीमाहीती या वेबसाईटला भेट देऊ शकता.
