Table of Contents
History Of Gateway Of India २०२१ | गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास
‘ मुंबईचा ताजमहाल ‘ तसेच ‘ भारताचे प्रवेशद्वार ‘ अशी ओळख असलेले गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील एक महत्वाचे ठिकाण आहे. कुणी मुंबई फिरायला गेले आणि गेट वे ऑफ इंडिया न बघताच परत आले असे सहसा होत नाही. गेट वे ऑफ इंडिया हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य स्थळ आहे. हजारो लोक दररोज गेट वे ऑफ इंडिया या भव्य वास्तुला भेट देत असतात. आजच्या या लेखात आपण History Of Gateway Of India २०२१ म्हणजेच गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास याबाबत माहिती घेऊ या.
गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास : History of Gateway Of India २०२१
गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास तसा फार जुना नाही. भारत पारतंत्र्यात होता तेव्हा ब्रिटनचे सम्राट जॉर्ज पंचम आणि रानी मेरी सन १९११ ला भारत भेटीवर आले होते. त्यांना भारताचे अनुक्रमे राजे आणि रानी म्हणून नुकतेच घोषित केले होते. त्यांचा सन्मान म्हणून गेट वे ऑफ इंडिया ही वास्तु उभारण्यात आली.
गेट वे ऑफ इंडिया या वास्तुची पायाभरणी ३१ मार्च १९११ ला मुंबईचे राज्यपाल सर जॉर्ज सिडनहैम क्लार्क यांनी केली. गेट वे ऑफ इंडियाच्या बांधकामाचा आराखडा स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनी तयार केलेला अंतिम आराखडा ३१ मार्च १९१४ ला मंजूर झाला.
गेट वे ऑफ इंडिया या वास्तुचे बांधकामासाठी अपोलो बंदर येथे जमीन प्राप्त करण्याचे कार्य १९१५ मध्ये सुरु झाले. प्रत्यक्षात बांधकाम १९१९ ला सुरु झाले आणि १९२४ ला ते बांधकाम पूर्ण झाले.
गेट वे ऑफ इंडियाची रचना आणि स्थापत्यशास्त्र :
गेट वे ऑफ इंडिया स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमूना आहे. स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनी तयार केलेला आराखडा मंजूर करुन गेट वे ऑफ इंडिया या वास्तुचे बांधकाम गॅमॉन इंडिया लिमिटेड या बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीला देण्यात आले.
गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम इंडो – सेरासेनिक स्थापत्य शैलीत केलेले आहे. थोडा फार गुजराती शैलीतील बांधकामाचाही प्रभाव या गेट वे ऑफ इंडियाच्या बांधकामावर दिसून येतो. गेट वे ऑफ इंडियाचे निमूळते मनोरे, घुमट, मिनार आपले लक्ष वेधून घेते. या वास्तुच्या बांधकामात पिवळ्या रंगाच्या बेसाल्ट दगडांचा वापर केला आहे. बांधकामासाठी लागणारे दगड जवळच्या ठाणे जिल्ह्यातील खरोदी खाणीतून आणले होते. तर जाळीदार खिडक्या ग्वाल्हेर येथून आणल्या होत्या.
सागराभिमुख असलेल्या या वास्तुच्या बांधकामासाठी अकरा वर्षे लागली.
आयताकृती असलेल्या या वास्तुचे मुख्यता तीन भाग आहेत. गेट वे ऑफ इंडियाची मध्य कमान ८५ फुट उंच आहे.मध्यवर्ती भागात असलेला घुमट ८३ फुट उंच असून त्याचा व्यास ४८ फुट आहे. हा घुमट या वास्तुचे मुख्य वैशिष्ट्य असून पर्यटकांचे आकर्षण आहे. कमानीमध्ये असलेल्या मोठ्या हॉल मध्ये एकाच वेळी जवळपास ५०० ते ६०० लोक येऊ शकतात. या वास्तुच्या बांधकामासाठी त्या काळात २१ लाख रुपये खर्च आला होता.
गेट वे ऑफ इंडियाच्या मागील भागातील पायऱ्या अरबी समुद्रात उतरतात. तेथून अरबी समुद्राचे विलोभनीय दृश्य आपण बघू शकतो. येथूनच आपल्याला घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणी बघण्यासाठी बोटीने जाता येते. गेट वे ऑफ इंडिया येथून दर दोन तासांनी बोट आहे. सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० बोटीद्वारे जाता येते. तेथे शिवकालीन लेणी, गुफेमध्ये कोरलेला भव्य हत्ती बघण्यासारखे आहे.
गेट वे ऑफ इंडियाला कसे पोहोचाल ?
गेट वे ऑफ इंडियाला आपण वर्षभरात केव्हाही भेट देऊ शकतो. मुंबईमधील छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ आणि सांताक्रूझ या डोमेस्टिक विमानतळावरून आपण टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन आणि बस स्टैंड येथून गेट वे ऑफ इंडियासाठी भरपूर बसेस आणि टॅक्सी मिळतात.
गेट वे ऑफ इंडिया जवळ छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत शिवाय होटल ताज आहेच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन २६ जानेवारी १९६१ ला करण्यात आले होते.
गेट वे ऑफ इंडिया आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीचा मानबिंदु आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अखेरचे ब्रिटिश जहाज याच गेट वे ऑफ इंडियामधून बाहेर पडले होते. गेट वे ऑफ इंडियाला भेट देऊन तुम्ही नक्की आनंदी व्हाल यात शंका नाही.
तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर कोणार्क सूर्य मंदिराविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही खालील लिंकवरून माहिती घेऊ शकता.Konark Surya Mandir information in marathi 2021 | कोणार्क सूर्य मंदिर मराठी माहिती
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइटला पण भेट देऊ शकता.
स्त्रोत : google