Shrinivas Ramanujan mathematician | थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन

Shrinivas Ramanujan mathematician | थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन

Shrinivas Ramanujan mathematician

आपल्या भारत देशाला गणीतज्ञांची  फार (Shrinivas Ramanujan mathematician) प्राचीन परंपरा लाभलेली आहे. आर्यभट्ट, कात्यायन,भास्कराचार्य,भास्कर प्रथम,वराहमिहीर, पिंगला,जयदेव, महाविरा, ब्रम्हगुप्त असे प्राचीन काळी गणितज्ञ भारतात होते. आधुनिक काळात ही असेच एक महान गणितज्ञ भारतात होऊन गेले ते म्हणजे श्रीनिवास रामानुजन. आजच्या या लेखात आपण श्रीनिवास रामानुजन या महान गणितज्ञबद्दल माहिती जाणून घेऊ या.

श्रीनिवास रामानुजन यांचे प्रारंभिक जीवन :Shrinivas Ramanujan mathematician

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 ला तत्कालीन मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील एरोड येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव के. श्रीनिवास तर आईचे नाव कोमलत्तामा होते. त्यांच्या पत्नीचे नाव जानकीअम्मा होते.

अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी असलेले श्रीनिवास रामानुजन माध्यमिक शाळेत असतानाच गणितीय सिद्धांत आणि प्रमेये सोडवीत असत. गणित या विषयाबद्दल त्यांना प्रचंड ओढ होती. असे म्हणतात की ते झोपले असतानाही गणीताचाच विचार करीत असत. झोपेतून जागे झाल्यावर कठीण असे गणितीय सूत्रे लिहीत असत.

विद्यार्थी दशेत ते गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवत तर इतर विषयात ते अनुत्तीर्ण होत असत. ते त्यामुळेच इ.11 वी मध्ये एकदा तर इ.12 वी मध्ये दोनदा अनुत्तीर्ण झाले.

श्रीनिवास रामानुजन यांचे गणित विषयातील कार्य / संशोधन :

Shrinivas Ramanujan mathematician

श्रीनिवास रामानुजन यांनी आपला पहिला गणितीय संशोधनपर लेख 1911 ला Indian Mathematical Society च्या नियतकालिकात लिहिला. या पहिल्याच लेखाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. हा लेख बेर्नुली  संख्येबाबत होता. त्यावेळेस त्यांचे वय फक्त तेवीस वर्षे होते.

त्यानंतर 1913 मध्ये त्यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेज च्या प्रो. हार्डी यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे तत्कालीन प्रसिद्ध गणितज्ञ होते. श्रीनिवास रामानुजन यांच्यासोबत पत्रव्यवहार केल्यानंतर प्रो. हार्डी हे खूप प्रभावित झाले. त्यांनी म्हटले की, श्रीनिवास रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत. प्रो. हार्डी यांनी श्रीनिवास रामानुजन यांना इंग्लंडला येण्याचे निमंत्रण दिले. लवकरच ते इंग्लंडला गेले. तेथे गेल्यावर प्रो. हार्डी आणि प्रो. लिटलवुड यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. तेथे त्यांनी अनेक संशोधनपर लेख लिहिले. हे लेख युरोपीय देशातील नियकालिकांमधून प्रसिद्ध झाले. केंब्रिज ट्रिनिटी कॉलेज ची फेलोशिप मिळविणारे ते पाहिले भारतीय होते. 1919 ला ते इंग्लंडहून भारतात परत आले.

See also  Lata Mangeshkar Biography In Marathi | लता मंगेशकर यांच्या विषयी माहिती

श्रीनिवास रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक होते हे त्यांच्या संशोधनातून सहजच लक्षात येते. विवृत्तिय समाकल (अवकलन आणि समाकलन),अतिगुणोत्तरीय श्रेढी, रीमान श्रेढी, अपसारी श्रेढी याबाबत संशोधन करून मोलाचे कार्य केले आहे. संख्या विभाजनबाबत त्यांचे कार्य खूप मोलाचे ठरले. संख्या सिद्धांतात श्रीनिवास रामानुजन यांनी केलेले कार्य भौतिक आणि संगणकीय विज्ञानात खूप उपयोगी पडले.

असे हे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी 26 एप्रिल  1920 ला मरण पावले.या थोर गणितज्ञचाा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो.

आमचा Shrinivas Ramanujan mathematician हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास नक्की शेअर करा.

तुम्हाला जर आर्य चाणक्य नीती बाबत माहिती जाणून घ्यायची असेल तर पुढील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.

Chanakya niti quotes information in marathi 2021 | चाणक्य नीति मराठी माहिती

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

स्रोत : गूगल

 

Spread the love

Leave a Comment