Indian Wind Man Tulasi Tanti | अक्षय ऊर्जा क्रांतीचे जनक तुलसी तांती

Indian Wind Man Tulasi Tanti | अक्षय ऊर्जा क्रांतीचे जनक तुलसी तांती

indian-wind-man-tulasi-tanti
indian-wind-man-tulasi-tanti

indian-wind-man-tulasi-tanti  भारताचे विंड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय अक्षय ऊर्जा समूहाचे जनक तुलसी तांती यांचे 1 ऑक्टोबर 2022 ला शनिवारला मध्यरात्रीच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आजच्या या लेखात आपण तुलसी तांती यांच्याबाबत माहिती जाणून घेऊ या.

तुलसी तांती कोण आहेत ?

तुलसी तांती हे भारतीय अक्षय ऊर्जा उद्योगाचे जनक तसेच सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापक – संचालक आहेत.

भारतात अक्षय क्रांतीचे प्रणेते तुलसी तांती यांचा जन्म गुजरात राज्यातील राजकोटमध्ये 2 फेब्रुवारी 1958 ला झाला. त्यांच्या वडीलांचे नाव रणछोडभाई तर आईचे नाव रंभाबेन होते.

हे ही वाचा : पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?जगातील पहिली महिला अंतराळवीर | World’s First Woman Astronuat

तुलसी तांती हे वाणिज्य शाखेचे पदवीधर होते. ते इंडियन विंड टर्बाइन मानुफॅक्चर्स असोसिएशन चे चेअरमन होते. तसेच बेल्झियममध्ये असलेल्या झेडएफ विंड पॉवरचे देखील ते चेअरमन होते.

भारताचे विंड मॅन तुलसी तांती :indian-wind-man-tulasi-tanti

पवन उर्जा क्षेत्रात यायच्या अगोदर तुलसी तांती हे टेक्सटाईलच्या व्यवसायात सक्रिय होते. हा व्यवसाय त्यांनी 2001 साली बंद केला.

तत्पूर्वी त्यांनी 1994 साली अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करण्यासाठी सुझलॉन ही कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि 1995 ला ही कंपनी स्थापन केली. त्याअगोदर अक्षय ऊर्जा क्षेत्रात परकीय कंपन्यांचा बोलबाला होता. अशाप्रकारे भारतात हरित ऊर्जा क्षेत्रात काम करणारे ते प्रणेते ठरले.

तुलसी तांती आणि सुझलॉन :

तुलसी तांती यांनी सुझलॉन ही पवन उर्जा निर्माण करणारी कंपनी स्थापन करून देशात अक्षय ऊर्जा निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली.

See also  आयरन लेडी इंदिरा गांधींचा इतिहास माहिती 2021 | Indira Gandhi Information In Marathi

सुझलॉन कंपनीने 2003 साली अमेरिकेच्या डॅनमार अँड असोसिएटस या कंपनीसोबत करार केला. त्यानुसार सुझलॉनला मिनेसोटा येथील पवनऊर्जा प्रकल्पाकरिता 24 टर्बाइन पुरविण्याची ऑर्डर मिळाली. त्यावेळेपासून सुझलॉन कंपनीने प्रगती करत मोठी वाटचाल केली. सध्या सुझलॉन कंपनीचे भाग भांडवल 8511 कोटी आहे. सध्या ही कंपनी 19.4 गिगावॅट विजेची निर्मिती करते.

तुम्हाला आमचा indian-wind-man-tulasi-tanti हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या या फेसबुक पेज इतिहासाची सोनेरी पाने आणि अंतरंग ला फॉलो करून विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

मराठी माहिती http://www.marathimahiti.comया वेबसाईटला जरूर भेट द्या.

संदर्भ : दैनिक लोकमत.

Spread the love

Leave a Comment