भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स उपलब्ध ; असे करा डाऊनलोड | How To Download IAF Agniveer Model Papers And Syllabus 2022 | IAF Agniveer Vayu Recruitment – 2022

भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स उपलब्ध ; असे करा डाऊनलोड | How To Download IAF Agniveer Model Papers And Syllabus 2022 | IAF Agniveer Vayu Recruitment – 2022

( how to download IAf Agniveer Mode

भारत सरकारने अलीकडेच भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी अग्निपथ ही योजना आखली आहे. त्या अंतर्गत भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायू भरती – 2022 ( How To Download IAF Agniveer Model Papers And Syllabus 2022 IAF Agniveer Vayu Recruitment – 2022) साठी अर्ज मागितले आहेत.

जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी भारतीय वायुसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहे. त्या अधिकृत वेबसाईट खालीलप्रमाणे आहेत.

www.careerindianairforce.cdac.in आणि www.agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत

भारतीय वायू दलाने सदर भरती प्रक्रियेसाठीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स आपल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत.

  • ( how to download IAf Agniveer Mode

वरील वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स डाऊनलोड ( how to download IAf Agniveer Model Papers and syllabus) करून घेऊ शकता.

http://www.agnipathvayu.cdac.in या वायू सेनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही उमेदवार विभागात जाऊन तुम्ही ड्रॉप डाऊन मेनुमध्ये जा. तेथे उपलब्ध असलेल्या syllabus आणि model papers च्या PDF  तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.

भारतीय वायू दलाच्या अग्निवीर भरती प्रक्रियाा-  2022 साठी उमेदवार हा 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 या दरम्यान जन्मलेला असावा.

सदर परीक्षेत यशस्वी झालेल्या जवानांना पहिल्या वर्षी एकूण 30 हजार रुपये दरमहा वेतन राहील. यातील 21 हजार रुपये हातात मिळतील तर 9 हजार रुपये भारत सरकारच्या कॉर्पस फंड (Corpus Fund) मध्ये जमा होतील.

दुसऱ्या वर्षी एकूण पगार दरमहा 33 हजार रुपये होईल. यातील 23100 रुपये हातात मिळतील तर 9900 रुपये कॉर्पस फंड मध्ये जमा होतील.

हे ही वाचा – 10 वी आणि 12 वी नंतर पुढे काय करावे ?दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

See also  हे ॲप देईल पाच दिवसांआधी हवामानाचा अंदाज | Meghadut App 2022

तिसऱ्या वर्षी दरमहा 36500 रुपये पगार राहील. त्यातील 25550 रुपये हातात मिळतील तर 10950 रुपये कॉर्पस फंड मध्ये जमा होतील.

चौथ्या आणि शेवटच्या वर्षी दरमहा 40000 रुपये वेतन राहील. यातील 28000 रुपये हातात मिळतील तर 12000 रुपये कॉर्पस फंड मध्ये जमा केल्या जातील.

अग्निपथ योजना ही भारत सरकारची अभिनव योजना आहे. अग्निवीर म्हणून चार वर्षे सेवा दिल्यावर तुम्हाला भारतीय सैन्य दलात तसेच पोलिस दल, सीआरपीएफ दलात आरक्षण राहील.

मित्रांनो तुम्हाला जर भारतीय वायू दलात भरती व्हायचे असेल तर तुमच्या साठी ही सुवर्ण संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जुलै 2022 आहे.

तुम्हाला आमचा IAF Agniveer Vayu Recruitment – 2022 हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर कळवा.

तुम्ही आमच्या मराठीमाहीतीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईट वर जाऊन विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

सौजन्य : News 18 लोकमत

 

 

Spread the love

1 thought on “भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स उपलब्ध ; असे करा डाऊनलोड | How To Download IAF Agniveer Model Papers And Syllabus 2022 | IAF Agniveer Vayu Recruitment – 2022”

Leave a Comment