Mahatma Gandhi Information In Marathi | महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी जीवन
अल्बर्ट आइनस्टाइन यांनी एके ठिकाणी असे म्हटले होते की भावी पिढीला कदाचित विश्वास बसणार नाही की महात्मा गांधी म्हणजेच Mahatma Gandhi Information In Marathi नावाचा कोणी हाडामासाचा मनुष्य या पृथ्वीवर अस्तित्वात होता. महात्मा गांधीजी मध्ये असे काय होते की भावी पिढी त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणार नाही ? आजच्या या लेखात आपण गांधीजींचे विचार, त्यांची शिकवण , त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबाबतची माहीती या लेखात घेऊ या.
महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर, 1869 या दिवशी गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. तर त्यांचे वडील करमचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. गांधीजींच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असे देखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूति दरम्यान मृत पावल्या होत्या.
घरातील अत्यंत धार्मिक वातावरणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या बालपणावर पडत गेला आणि त्यांच्यामध्ये अहिंसा, सहिष्णुता, शाकाहार, इतरांबद्दल करुणा या तत्वाचे बीजारोपण त्या काळात झाले. आईमुळे गांधीजींवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रचंड प्रभाव होता.
गांधीजींनी केवळ राजकारणावरच भर दिला नाही, तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाजसुधारक, अर्थतज्ञ तर होतेच, त्याच बरोबर जनसंपर्कातही होते. त्यामुळे आपल्या विचारांची लाट त्यांनी गावोगावी आणि शहराशहरात मध्ये पोहोचविली. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी, 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले असे म्हटले जाते.
गांधीजी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. गांधीजींचा म्हणजेच Mahatma Gandhi Information In Marathi जन्मदिवस 2, ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. महात्मा गांधींना श्रावण कुमारची कहाणी आणि हरिश्चंद्र यांच्या नाट्य कर्मांनी प्रभावित केले. गांधीजींची मातृभाषा गुजराती होती. गांधीजींनी राजपूत राज्य ऑल्फ्रेड हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. 1930 मध्ये टाइम मासिकाने गांधीजींना ‘द मॅन ऑफ द इयर’ म्हणून संबोधित केले. 1937 मध्ये, नागपूर विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ही पदवी दिली. असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग, गांधीजींनी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
1915 मध्ये भारतात परत आल्यावर गांधीजींनी चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांना जुलमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. लोकमान्य टीळक यांच्या मृत्युनंतर गांधीयुग सुरु झाले. 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्वधर्म, समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्यासाठी देशभरात चळवळ चालू केली. संप्रदायावर राजकारण करणे हे गांधीजींना मान्य नव्हते. सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले आणि ढासाडलेल्या संप्रदायाला त्यांनी आधार दिला आणि मुस्लिमांचे नेते बनले. 1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराच्या विरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे चारशे किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले.
एप्रिल 1918 च्या पहिल्या महायुद्धाच्या नंतर व्हाईसराय यांनी गांधींजीना दिल्ली येथे युद्ध परिषदेसाठी बोलावले. यामागे गांधीजींनी त्यांचा इंग्रज साम्राज्य असलेल्या पाठिंबा दर्शवला आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा उद्देश होता. गांधीनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरवण्याची तयारी दर्शवली. 1906 मधील झुलू युद्ध आणि 1914 मधील प्रथम जागतिक युद्धामधील भरतीच्या विरुद्ध जेंव्हा त्यांनी रुग्णवाहिका दलासाठी स्वयंसेवक भरती केले, तेंव्हा योद्धे भरती करण्याचा प्रयत्न केला. जून 1998 ला प्रसिद्ध केलेल्या एका ‘ फौजेत भारती होण्याचे आवाहनामध्ये गांधी म्हणतात, “ही गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता आपल्याला जर शस्त्र सर्वाधिक कौशल्याने वापरण्याची कला अवगत करायची असेल तर फौजेत भरती होणे हे आपले कर्तव्य आहे.
“व्हाईसरॉयच्या खासगी सचिवास लिहिलेल्या पत्रात गांधीजींनी “वैयक्तिकरीत्या कोणालाही, मित्र व शत्रूस, मारणार नाही अथवा जखमी करणार नाही. “गांधीजींच्या युद्ध भरती नेत्यांच्या अहिंसे बद्दलच्या एकजिनसीपणा वर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांचा मित्र चार्ली आंद्रीउस नमूद करतो, “वैयक्तिकरीत्या मला कधीही गांधीजींच्या वर्तणुकीचा त्यांच्या स्वतःच्या इतर वर्तनांशी मेळ घालता आला नाही. ज्यावर मी वेदनादायकरीत्या असहमत झालो हा त्या मुद्यांपैकी एक आहे.”
1942 मध्ये गांधींजीनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले आणि इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःही याच तत्वावर जगले आणि इतरांनाही याच तत्त्वाचा संदेश दिला. आणि त्यांनी खेड्यामध्ये भारताचे मूळ पाहून स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला.
1930 साली ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी महात्मा गांधींची अर्धनग्न फकीर म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. गांधीजींनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.
गांधीजीं त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झाले. त्यांनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्याच्या निश्चित तारखेच्या दोन आठवड्यांपूर्वी गांधीजींनी दिल्ली सोडली. त्यांनी काश्मीरमध्ये चार दिवस घालवले आणि त्यानंतर ते रेल्वेने कोलकाताला रवाना झाले, तिथे वर्षभरापासून सुरू असलेला दंगल संपलेल्या नव्हत्या. गांधीजींनी 15 ऑगस्ट, 1947 रोजी 24 तास उपवास ठेवून हा दिवस साजरा केला. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. परंतु याबरोबरच अखंड भारताचे विभाजन पण झाले होते आणि देशामध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यात वारंवार दंगल सुरू होती. अशांत वातावरण पाहून गांधीजींना खूप वाईट वाटत होते.
30 जानेवारी 1948 ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना, गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली.गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. 15 नोव्हेंबर 1949 ला त्यांना फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राज घाट येथील समाधीवर ‘हे राम’ असे लिहिले आहे. कारण हे राम हे गांधीजींचे शेवटचे शब्द होते. अनेक जण मानत होते. पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले आणि गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. ह्या सर्वच अस्थींचे विसर्जन 12 फेब्रुवारी 1948 ला अल्लाहाबाद येथे करण्यात आल्या होते. परंतु गांधीजींच्या काही असती नको देण्यात आले होत्या. 1997 मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले.
हे रक्षापात्र एका बॅंकेमधील लॉकरमध्ये सापडले होते. आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. 30 जानेवारीला त्यांच्या परिवारांनी अजून एका रक्षा पात्राचे विसर्जन मुंबईतील गिरगाव चौपाटीवर केले. हे पात्र एका दुबई-स्थित व्यापाऱ्याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. गांधीजींचे आणखी एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे. जिथे गांधीजी 1942 आणि 1944 च्या दरम्यान बंदिवासात होते आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पण ते पात्र तिथून काढून घेतल्यास तो मठ बंद पडेल या भीतीने गांधीजींचे वंशज ते रक्षापात्र तिथून काढून घेऊ इच्छित नाही.
गांधीजींच्या आयुष्यावर ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर रिचर्ड ॲटनबरोयांनी निर्मिती केली. या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका बेन किंग्जले या ब्रिटिश अभिनेत्याने केली. हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आठ ऑस्कर पुरस्कार जिंकून त्यावेळेस विक्रम स्थापला होता. या चित्रपटाचे हिंदीसह जगातील सर्वच मुख्य भाषेत भाषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला चांगले यश आले.
अहिंसेचा हा महान पुजारी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आपल्या सोबत आहेत. जगात जर शांती हवी असेल तर गांधीजींच्या तत्वांचे पालन प्रत्येकाने करायला हवे.
“तुम्हाला आमची माहिती महात्मा गांधी विषयी म्हणजेच Mahatma Gandhi Information In Marathi कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.”
आपण ह्या पोस्ट मध्ये महात्मा गांधीजीं बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Maharashtra Rajyachi Nirmiti Information In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
(संदर्भ : गूगल )
तुम्हाला Blogging In Marathi बद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर मराठी जीवन वेबसाईट ला भेट दया .
1 thought on “महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी जीवन 2021 | Full Mahatma Gandhi Information In Marathi”