Monalisa Painting | मोनालीसा पेंटिंग का एवढी प्रसिद्ध आहे ?

Monalisa Painting | मोनालीसा पेंटिंग का एवढी प्रसिद्ध आहे ?

Mona Lisa Painting

मोनालीसा ( Monalisa Painting) हे जगप्रसिद्ध चित्र लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने काढले. इ.स. सोळाव्या शतकात काढलेल्या या चित्राचे अजूनही आकर्षण कमी झालेले नाही. मोनालीसा ही पेंटिंग एवढी प्रसिद्ध का आहे ? आजच्या या लेखात आपण मोना लीसाच्या या पेंटिंग बद्दल माहिती जाणून घेऊ या.

 

मोनालीसा ही पेंटिंग कोठे आणि केव्हा काढली ?

मोनालीसा हे एक तैलचित्र आहे. लिओनार्दो दा विंची यांनी हे चित्र 1503 ते 1505 या दरम्यान फ्लॉरेन्स या ठिकाणी काढले.

मोनालीसा कोण होती ?

असे म्हटले जाते की, लिओनार्दो दा विंची यांनी  फ्लॉरेन्स मधील एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे चित्र काढले होते. हीच ती जगप्रसिद्ध मोनालीसाची पेंटिंग होय. या व्यापाऱ्याचे नाव होते फ्रांचेस्को देल जोकोंदो. तत्कालीन कला समीक्षक व्हाझारी यांच्यामते त्या व्यापाऱ्यानेच लिओनार्दो द विंची यांना आपल्या पत्नीचे चित्र काढण्यास सांगितले होते.

मोनालीसाची पेंटिंग एवढी प्रसिद्ध का आहे ?

लिओनार्दो दा विंची यांनी काढलेली मोना लीसाची पेंटिंग कलेच्या इतिहासातील एक अतुल्य आणि आदर्श व्यक्तीचित्र मानल्या जाते. मोनालीसाच्या पेंटिंगनंतरच व्यक्तिचित्रण क्षेत्रात क्रांती घडून आली.

Mona Lisa Painting

मोनालीसाची पेंटिंग बघणऱ्याला संभ्रमात टाकते. या चित्रात असलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील खोल,गुढ आणि अथांग भाव अनाकलनीय आहेत. मोनालीसाच्या नजरेत असलेले किंचित खिन्न,चेहऱ्यावरील गूढ आणि मंद स्मित आपल्याला नक्कीच मोहात आणि संभ्रमात टाकते. पाठीमागे असलेल्या काल्पनिक निसर्गाच्या चित्राने या गुढतेत आणखीच भर पडली आहे.

मोनालीसाचा अर्थ :

मोनालीसाचे spelling Mona Lisa असे बरेच जण लिहतात. पण वास्तविक Monna Lisa असे spelling आहे. इटालियन भाषेत याचा अर्थ My Lady Lisa असा होतो.

See also  History of Shivaji Maharaj 2021 | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षरतेवर शंका घेणारे ग्रँट डफ आणि सर जदुनाथ सरकार यांचा चुकीचा दावा

मोनालीसाबाबत काही विशेष बाबी : why  monalisa painting is so famous

मोनालीसाच्या पेंटिंगचा आकार 30 – 21 इंच आहे. ह्या पेंटिंगचे वजन सुमारे 8 kg. पर्यंत आहे. ही पेंटिंग सध्या लूव्र मुझियम पॅरिस येथे ठेवली आहे. जगातील सर्वात जास्त महाग असलेली ही पेंटिग आहे. या पेंटिंगचेे मूल्य जवळपास 2.5 बिलियन डॉलर्स आहे असे म्हणतात. ही पेंटिंग 1911 मध्ये चोरीला गेली होती. मात्र दोन वर्षानी ती सापडली. 1951 मध्ये एका प्रेक्षकाने दगड फेकल्याने या पेंटिंगला क्षति पोचली होती. त्यामुळे या पेंटिंगची सुरक्षा वाढविल्या गेली. मोना लीसाच्याा पेंटिंगचे निरीक्षण केल्यास असे आढळेल की मोनालीसाच्या भुवया काढलेल्या नाहीत. याबाबतचे गूढ समजलेले नाही.

लिओनार्दो दा विंची यांची मोनालीसा ही पेंटिंग इतके वर्षे झाली तरीही त्या पेंटिंगबद्दल आकर्षण जराही कमी झालेली नाही.

आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास शेअर करा.

तुम्हाला जर लूव्र वस्तुसंग्रहालय बद्दल माहिती घ्यायची असेल तर पुढील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.

Louvre Museum Paris Information In Marathi 2021 | भव्य लूव्र म्युझियम पेरिस मराठी माहिती

तुम्हीआमच्याhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

स्रोत : गूगल

 

Spread the love

1 thought on “Monalisa Painting | मोनालीसा पेंटिंग का एवढी प्रसिद्ध आहे ?”

Leave a Comment