Table of Contents
मुरार बाजी देशपांडे यांचा अतुलनीय पराक्रम | पुरंदरचे युद्ध | Murar Baji Deshpande
मुरार बाजी देशपांडे (Murar Baji Deshpande) हे १७व्या शतकातील हिंदवी स्वराज्याचे एक पराक्रमी आणि निष्ठावंत सेनानी होते. मुरार बाजी देशपांडे यांनी पुरंदर किल्ल्याच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानामुळे इतिहासात अजरामर झाले आहेत.

प्रारंभिक जीवन :
मुरार बाजी देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील महाड तालुक्यातील किंजळोली गावात झाला. त्यांचे मूळ गाव जावळी (सातारा जिल्हा) असून, प्रारंभी ते चंद्रराव मोरे यांच्या सेवेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश जिंकला तेव्हा मुरार बाजींनी त्यांची साथ स्वीकारली आणि १६५६ साली मराठा सैन्यात दाखल झाले. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार नेमण्यात आले.
हे ही वाचा : प्रतापगडचे युद्ध
स्वराज्यावर मिर्झाराजा जयसिंगचे आक्रमण :
छत्रपती शिवाजी महाराजांनी चेतवलेल्या महाराष्ट्रातील क्रांतीमुळे औरंगजेब चिडला होता. मराठ्यांचे स्वताचे राज्य ही कल्पनाच सहन होत नव्हती. त्यामुळेच त्याने आपला मामा शाहिस्तेखान यास स्वराज्यावर पाठविले. परंतु महाराजांनी लाल महालावर अचानक छापा टाकून त्याची तीन बोटे तोडली.
काही कालावधीनंतर महाराजांनी सुरतेवर हमला करून तेथून अगणित द्रव्य आणले. सुरत ही मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी होती. सुरतेवर हमला करून महाराजांनी जणू मुघल साम्राज्याचे नाकच कापले.
आता औरंगजेब पक्का चिडला . महाराजांना हरवणारा योद्धा त्याला पाहिजे होता. त्याच्या सुरुवातीच्या काळात सत्ता काबीज करतांना त्याला मदत करणाऱ्या पराक्रमी मिर्झा राजे जयसिंगची त्याला आठवण झाली.
मिर्झा राजा जयसिंगसोबत दिलेरखान , दाउदखान कुरेशी, कुबाद खान, किरतसिंग कछवाह, पुरनमल बुदेला अशी असंख्य पराक्रमी सरदार आणि अगणित दारुगोळाऔरंगजेबाने दिला. एकूण ८० हजारावर फौज घेऊन मिर्झाराजा जयसिंगाने स्वराज्यावर आक्रमण केले. १६६५ साली मुघल सम्राट औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेरखान यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्यावर मुघल फौज सोडली.
पुरंदरचा वेढा आणि युद्ध :
दिलेरखान याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. रोज तोफेचे गोळे पुरंदर आणि राद्रमाळ या किल्ल्यांवर पडत होते. मराठे मोठ्या पराक्रमाने मुघलांच्या हल्ल्याला तोंड देत होते. शेवटी रुद्रमाळ किल्ला मुघलांनी जिंकला.
आता दिलेरखान पूर्ण ताकदीनिशी पुरंदरावर हल्ला करू लागला. परंतु मुरार बाजी आणि त्यांचे मावळे मुघलांचे प्रत्येक हल्ले परतावून लावत होते. शेवटी दिलेरखान याने पुरंदरावर सुलतानढवा केला. त्याने निवडक असे ५ हजार पठाण पुरंदरावर सोडले. मुरार बाजी देशपांडे यांनी केवळ ७०० मावळ्यांसह मुघलांच्या हजारो सैन्याचा सामना केला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैनिकांनी प्रचंड धैर्याने लढा दिला.
दिलेरखान त्यांच्या शौर्याने प्रभावित होऊन त्यांना मुघल सैन्यात उच्च पदाची लालच दिली, पण मुरार बाजींनी स्वाभिमानाने दिलेर खानास उत्तर दिले कि , “आम्ही महाराजांची माणसं तुझा कौल घेतो कि काय ?” तेवढ्यातच दिलेरखानाने बाण मारला आणि त्यात मुरार बाजी देशपांडे यांना वीरमरण आले. दिलेरखान याला याच ठिकाणी स्वराज्यातील मावळे किती पराक्रमी आहेत याची जाणीव झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहाडी चुहा असा दिल्लीत बसून औरंगजेब उल्लेख करत होता. मात्र शिवरायांचा एकएक किल्ला जिंकणे किती अवघड आहे याची जाणीव दिलेरखानास झाली.
मुरार बाजी देशपांडे यांच्या प्रखर पराक्रमाने दिलेरखान सारखा योद्धाही प्रभावित झाला होता. मुरार बाजी देशपांडे यांच्या मृत्यूनंतर ही मराठे अधिक प्रखरपणे लढू लागले. पुरंदरच्या तह होईपर्यंत हे पुरंदरचे युद्ध सुरूच होते. शेवटपर्यंत मराठ्यांनी दिलेरखान यास पुरंदर किल्ला जिंकता आला नाही.
सांस्कृतिक प्रभाव :
मुरार बाजी यांच्या पराक्रमावर पोवाडे रचले गेले. मुरार बाजी देशपांडे यांच्या जीवनावर आधारित “वीर मुरार बाजी” हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या शौर्याची गाथा आजही महाराष्ट्रातील लोककथांमध्ये सांगितली जाते.
मुरारबाजी देशपांडे यांचे जीवन हे निष्ठा, शौर्य आणि स्वराज्याच्या आदर्शांचे प्रतीक आहे. त्यांचे बलिदान आजही प्रेरणादायक आहे.
मित्रांनो तुम्हाला आमचा Murar Baji Deshpande हा लेख आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा.
स्त्रोत : गुगल