Nalanda University History In Marathi 2021 | नालंदा विद्यापीठाचा इतिहास

Nalanda University History In Marathi 2021 | नालंदा विद्यापीठाचा इतिहास

Nalanda University History In Marathi 2021

भारताच्या बिहारमधील नालंदा (Nalanda University History In Marathi 2021) येथे हे जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ (Nalanda Vishwavidyalaya) होते. नालंदा विद्यापीठ,  तक्षशिला विद्यापीठ आणि विक्रमशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील प्रमुख शिक्षणाचे केंद्र होते. हे नालंदा विद्यापीठ केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठे शिक्षण केंद्रही होते. नालंदा हे प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे शिक्षण केंद्र होते. नालंदा विद्यापीठाला जागतिक वारसा स्थानांच्या यादीत स्थान मिळालेले आहे.

प्राचीन नालंदा विद्यापीठ : Nalanda Vishwavidyalaya

नालंदा हे जगप्रसिद्ध शहर बिहारमधील आजच्या पाटणा या शहरापासून सुमारे 40 की.मी. लांब तर राजगीर तत्कालीन राजगृह पासून उत्तरेस 27 की.मी. लांब होते. त्याच ठिकाणी या जगप्रसिद्ध  विद्यापीठाची वास्तू होती. या ठिकाणी उत्खनन केले असता नालंदा विद्यापीठ (Nalanda Vishwavidyalaya) हे प्राचीन भारतातील प्रमुख शिक्षणाचे केंद्र किती वैभाशाली होते याचा प्रत्यय येतो.

प्राचीन साहित्यात नल, नालक, नालकग्राम आणि नालंद, नलविहार अशी नावे नालंदासाठी प्रचलित होती.

भारतात आलेले परकीय प्रवासी फाहियान, ह्यूएनत्संग आणि इत्सिंग यांनी या जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाबद्दल भरपूर प्रमाणात माहिती आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवलेली आहे .

प्राचीन साहित्यांच्या आधारे नालंदा विद्यापीठाचा इतिहास महान मौर्य सम्राट अशोकाच्या काळापर्यंत जातो . गुप्त सम्राटांच्या काळात नालंदा हे एक विश्र्वविद्यालय म्हणून समोर आले. गुप्त सम्राट समुद्रगुप्त आणि पहिला कुमारगुप्त यांनी या नालंदा विद्यापीठाला मदत केली. पण खऱ्या अर्थाने हे जगप्रसिद्ध विद्यापीठ भरभराटीला आले ते सम्राट हर्षवर्धन याच्या काळात. सम्राट हर्षवर्धन याने विद्यापीठाच्या खर्चासाठी शंभर खेडी दान केली होती. या खेड्यातील लोक विद्यापीठाच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करीत होते.

See also  सिंधू संस्कृती व हडप्पा संस्कृती माहिती 2021 | Full Haddapa Sanskruti In Marathi | Sindhu Sanskruti History In Marathi

विद्यापीठाचा परिसर :

या जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचा परिसर हा खूप विस्तीर्ण होता. विद्यापीठाच्या परिसरात भव्य इमारती होत्या. तेथे जवळपास तीनशे  खोल्यांचे वसतिगृह तसेच ऐंशी सभागृह होते. अध्यापनाकरिता जवळपास शंभर कक्ष होते. खगोलशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात होता. त्याकरिता उंच मनोरे ही त्या ठिकाणी होते. परिसरातच बागा, उपवने,तलाव पण होते.

नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय :

जगातील प्राचीन नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय हे बहुमजली होते . ग्रंथालयास धर्ममायायोग हे नाव होते . ग्रंथालयात उपविभाग देखील होते. रत्नोदधी, रत्नसागर आणि रत्नरंजक अशी नावे दिली होती. या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते .

अध्ययन,अध्यापनाचे विषय :

नालंदा विद्यापीठात त्याकाळी जवळपास दहा हजार विद्यार्थी अध्यापन करीत होते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास तीन हजार होती.

बाहेर देशातील विद्यार्थीही या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असत .  प्रामुख्याने यामध्ये चीन,तिबेट आणि कोरिया या देशातील विद्यार्थी असत. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी त्यांची अगोदर पात्रता परीक्षा घेतली जात असे.

नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने हीनयान आणि महायान पंथाच्या तत्वज्ञानाचे अध्यापन होत असे . त्यासोबतच वेद,अध्यात्म,आयुर्वेद, सांख्यदर्शन,धर्मशास्त्र,ज्योतिष, पणीनिसुत्रे आणि खगोलशास्त्र अशा अनेक प्रकारच्या विषयांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात होता.

नालंदा विद्यापीठाचे तत्कालीन मुख्य आचार्य म्हणजे कुलगुरू शीलभद्र हे होते. तेथे अनेक तज्ञ मंडळी होती.

धर्मपाल,जिनमित्र,प्रभामित्र,चंद्रपाल, शांतरक्षित, आतिश, आर्यदेव, ज्ञानचंद्र आणि वसुबंधू हे प्रमुख अध्यापक या मध्ये होते. या विद्यापीठात जवळपास 1570 अध्यापक होते. विद्यापीठात अध्यापनेंतर्गत वादविवाद, परिसंवाद,चर्चासत्रे आणि प्रश्नोत्तरे होत असत .

नालंदा विद्यापीठाचा अस्त :

असे म्हटले जाते की नालंदा विद्यापीठाला बखतियार खिलजी याने इ.स. 1193 मध्ये नालंदा विद्यापीठाला आग लावून हे विद्यापीठ बेचिराख करून टाकले.

आपला भारत किती वैभवशाली आणि सुसंस्कृत होता याचा प्रत्यय येतो.

तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर भारताचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण पुढील लिंकवरून माहिती घेऊ शकता.

See also  Egypt mummy history in marathi 2021 | इजिप्त ममी आणि गिझाचे रहस्य

पहिला चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य विषयी माहिती 2021 | Chandragupta Maurya Story In Marathi

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

 

 

 

 

 

Spread the love