
Table of Contents
ऑपरेशन सिंदूरची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : operation-sindur-2025
-
कारवाईची वेळ आणि कालावधी: ही महत्त्वपूर्ण कारवाई 7 मेच्या पहाटे 23 मिनिटांत पूर्ण झाली आहे.
-
लक्ष्यित ठिकाणे कोणती? : पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील 9 ठिकाणी 24 क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले. यामध्ये बहावलपूर, मुरिदके, शकरगढ, सियालकोट, मुजफ्फराबाद आणि कोटली या ठिकाणांचा समावेश होता.
-
लक्ष्यित संघटना कोणत्या ?: या कारवाईत लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांवर हल्ले करण्यात आले आहेत.
-
लष्करी साधने कोणती वापरली ? : भारतीय वायुदलाने राफेल लढाऊ विमानांचा वापर केला, ज्यामध्ये SCALP आणि AASM Hammer क्षेपणास्त्रे वापरण्यात आली आहेत.
पाकिस्तानने काय प्रतिक्रिया दिली ? :
-
हानीचा दावा: पाकिस्तानने या हल्ल्यांत २६ नागरिकांच्या मृत्यूचा दावा केला आहे . ज्यामध्ये महिला आणि मुलेही होती. त्यांनी आरोप केला की भारताने नागरी भागांवर, जसे की मशिदींवर, हल्ले केले आहेत.
-
प्रतिसाद: पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया कोणत्या आल्या आहेत?:
-
संयुक्त राष्ट्र संघ: संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
-
अमेरिका: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या लवकर समाप्तीची आशा व्यक्त केली.
भारतातील परिणाम:
-
उड्डाणांवर परिणाम: दिल्ली, श्रीनगर, जम्मू, लेह, धर्मशाळा आणि अमृतसर येथील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
-
सतर्कता: काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आणि आपत्कालीन उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.
निष्कर्ष:
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindur-2025) ही भारताची दहशतवादाविरोधातील निर्णायक कारवाई आहे. या कारवाईने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव अधिक वाढवला असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केलेले आहे.
संदर्भ: गुगल