ऐतिहासिक ऑपरेशन सिंदूर 2025 | Operation Sindur 2025
ऑपरेशन सिंदुर (Operation Sindur-2025 ही 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमध्ये केलेली एक महत्त्वपूर्ण लष्करी कारवाई तशीच प्रतिशोधात्मक कारवाई आहे.ही लष्करी कारवाई 22एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली आहे . या आतंकवादी हल्यात२५ भारतीय पर्यटक आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते.
Source wikipedia
ऑपरेशन सिंदूरची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : operation-sindur-2025
कारवाईची वेळ आणि कालावधी: ही महत्त्वपूर्ण कारवाई 7मेच्या पहाटे 23मिनिटांत पूर्ण झाली आहे.
लक्ष्यित ठिकाणे कोणती? : पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील 9ठिकाणी 24क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले.यामध्ये बहावलपूर, मुरिदके, शकरगढ, सियालकोट, मुजफ्फराबाद आणि कोटली या ठिकाणांचासमावेश होता.
लक्ष्यित संघटना कोणत्या ?: या कारवाईत लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांवर हल्ले करण्यात आले आहेत.
लष्करी साधने कोणती वापरली ? : भारतीय वायुदलाने राफेल लढाऊ विमानांचा वापर केला, ज्यामध्ये SCALP आणि AASM Hammer क्षेपणास्त्रे वापरण्यात आली आहेत.
हानीचा दावा: पाकिस्तानने या हल्ल्यांत २६ नागरिकांच्या मृत्यूचा दावा केला आहे . ज्यामध्ये महिला आणि मुलेही होती.त्यांनी आरोप केला की भारताने नागरी भागांवर, जसे की मशिदींवर, हल्ले केले आहेत.
प्रतिसाद: पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया कोणत्या आल्या आहेत?:
संयुक्त राष्ट्र संघ: संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिका: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या लवकर समाप्तीची आशा व्यक्त केली.
भारतातील परिणाम:
उड्डाणांवर परिणाम: दिल्ली, श्रीनगर, जम्मू, लेह, धर्मशाळा आणि अमृतसर येथील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
सतर्कता: काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आणि आपत्कालीन उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.
निष्कर्ष:
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindur-2025) ही भारताची दहशतवादाविरोधातील निर्णायक कारवाई आहे.या कारवाईने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव अधिक वाढवला असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केलेले आहे.