गीझाचा भव्य पिरॅमिड | Pyramid Of Giza In Marathi
संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक,वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था म्हणजेच युनेस्को(UNECCO). ही संयुक्त राष्ट्र संघाची (UNO) एक विशेष व महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था शिक्षण, विज्ञान व संस्कृती यांमध्ये विशेष कार्य करते. या अशा अनेक क्षेत्रांमधील युनोस्कोचे एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे जागतिक वारसा स्थळांची यादी तयार करणे. सांस्कृतिक व भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे स्थान (वास्तू,ठिकाण,उद्यान,जंगल,सरोवर इ.) की ज्याला युनोस्कोने मान्यता दिलेली असते त्याला जागतिक वारसा स्थान असे म्हणतात. जागतिक वारसा स्थान समिती जगातील जागतिक वारसा स्थळांची यादी तयार करीत असते. जागतिक वारसा स्थानांची देखभाल व संरक्षण या करिता युनोस्को अनुदान देत असते.आजच्या या लेखात आपण असेच एका सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वारसा स्थानाची माहिती घेणार आहोत. ते स्थान आहे गीझाचा भव्य पिरॅमिड.
पुरातन काळातील जे सात आश्चर्य मानले जातात त्यापैकी एकमेव अस्तिवात असलेले हे गीझाचे भव्य पिरॅमिड इजिप्तची राजधानी कैरोजवळ आहे. गीझाचे हे भव्य पिरॅमिड म्हणजेच Pyramid Of Giza In Marathi आजही प्राचीन इजिप्शियन संस्कृतीची साक्ष देत उभा आहे. इजिप्तचे पिरॅमिडस् सर्व जगात प्रसिद्ध आहेत. या पिरॅमिडस् अणि त्यामधील ममी (ममी – कुजू नये म्हणून विशिष्ट रसायने भरून ठेवलेले प्रेत) यांबद्दल सर्व जगालाच कुतूहल वाटते. पिरॅमिडची रहस्यमय गूढता अजूनही कमी झालेली नाही. जगातील संशोधक आजही पिरॅमिड, इजिप्तची संस्कृती याबाबत संशोधन करत आहेत. या संशोधनातून इजिप्तची संस्कृती, राजे त्यांनी बांधलेले पिरॅमिडस् याबद्दल नवनवी माहिती समोर येत आहे.
इजिप्तमध्ये राजाला फेरोह म्हणत. याचा अर्थ देवाने पाठविलेला दूत. हे राजे ऐशोरामात जीवन जगत. मृत्यूनंतरही त्याचप्रकारे राजाने राहावे म्हणून राजाच्या पार्थिव देहाची (ममी.) नेहमीप्रमाणेच सर्व प्रकारची काळजी घेतली जाई. वेगवेगळे खाद्यपदार्थ, मद्य, दागदागिने याशिवाय सेवेसाठी नोकरवर्ग, सैन्याची तुकडी हा सर्व लवाजमा राजासह कबरीमध्ये रवाना होई. हे राजे स्वतःच्या हयातीतच आपली कबर बांधायला घेत. इजिप्तचे लोक सूर्यपूजक होते. सूर्य उगवतो पूर्वेस अणि अस्त होतो पश्चिमेस. त्याचप्रकारे राजाच्या मृत्युनंतर त्याचाही अस्त होतो. म्हणून नाइल नदीच्या पश्चिम किनारी पिरॅमिडस् आहेत.
कैरो मधील गीझाच्या भागात अजुनही भव्य पिरॅमिडस् म्हणजेच Pyramid Of Giza In Marathi आहेत. पण त्यातील सर्वात मोठा पिरॅमिड आहे फेरोह खुफूचा. हा पिरॅमिड इ. स. पूर्व 2560 साली बांधला गेला. येथे इजिप्तच्या चौथ्या राजघराण्यातील राजा कुफू याची कबर आहे. जगातील सात आश्चर्यापैकी एक ही एवढीच ओळख वा महत्त्व या पिरॅमिडचे नाही. तर या पिरॅमिडचे बांधकाम व त्यातील अचूकता हे वाखाणण्याजोगे आहे.
एवढे मोठे आकाराचे व वजनाचे दगड दूर लांबून कसे आणले असतील ? ते दगड एवढ्या उंचावर कसे चढविले असतील ? हे प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाहीत. या पिरॅमिडचे बांधकाम कसे केले असेल यासाठी संशोधकांनी खूप संशोधन केले. प्राचीन काळी आधुनिक काळात आहेत तशी यंत्रे नव्हती. तरी देखील बांधकामातील अचूकता आपल्याला थक्क करणारी आहे. खुफूच्या या पिरॅमिडच्या आतमध्ये वेगवेगळ्या उंचीवर तीन खोल्या आहेत. जमिनीखाली एक खोली, मधली राणीची खोली आणि सगळ्यात वरची राजाची खोली अशा तीन खोल्या आहेत. या खोल्या एकमेकांना अरुंद रस्त्याने जोडलेल्या आहेत. आत काही भुयारं असून 47 बाय 8 मीटर असलेली गॅलरी आहे. या गॅलरीच्या वर पिरॅमिडच्या उत्तरेला पोकळी आहे. ही पोकळी साधारणता 3० मीटर लांब आहे. हे पिरॅमिड भक्कमपणे उभे राहावे म्हणून दगडांचा भार विभागल्या गेला आहे.
एचआयपी इंस्टिट्युड संशोधक मेहदी तयुबी म्हणतात की, ” अजुन या पोकळीबाबत बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहित नाही. ही पोकळी आडवी आहे की झुकलेली किंवा ही रचना एकचं आहे की सलग रचनांची मिळून बनलेली आहे याचा अभ्यास अजुन झाला नाही.
पिरॅमिडच्या आवारात स्पिंक्स दिसतो. स्पिंस्क ही पुराणातील काल्पनिक देवता मानली जाते. तिला रक्षक देवतेच्या स्वरूपात मानल्या जाते. ती सर्वांचे रक्षण करते असा सर्व साधारण समज तेंव्हा होता. या देवतेचा चेहरा मानवाचा तर शरीर सिंहाचे असते. खुफूच्या पिरॅमिड जवळील स्पिंकस् चा पुतळा 70 मी. लांब व 20 मी. उंच आहे. इजिप्शियन लोक सूर्य देवतेला मानणारे असल्याने स्पिंकसचे तोंड पूर्व मुखी आहे. या स्पिंकचा चेहरा हा मऊ दगडाचा असल्याने हवामान आणि इजिप्तच्या वाळवंटातील रेतीची वादळ या कारणाने ख़राब झालेला आहे. परंतु पंजापासुन बैठकीपर्यंतचा पायरयांचा भाग फरशीचा असल्याने सुस्थितीत आहे.
कुफूचा हा पिरॅमिड अंदाजे 450 फुट उंच आहे. याचे क्षेत्रफळ जवळपास 250 मीटर आहे. खुफूचा हा पिरॅमिड पूर्ण होण्यास जवळ जवळ 20 वर्षे लागली. या पिरॅमिडसाठी अंदाजे 23 लाख घडवलेले दगड लागले. यातील प्रत्येक दगड सुमारे अडीच ते पंधरा टन वजनाचा होता. पिरॅमिडचा गाभा चुनखडकांच्या चिरांचा आहे. भुमितीतील पाय (π=3.14) याचा वापर पिरॅमिडच्या बांधकामात केलेला आहे. त्यावेळी ग्रीकांना पायची किंमत माहितही नव्हती. कोणत्याही कोनमापकाशिवाय पिरॅमिडचे चारही कोन जवळपास 51 डिग्री इतके तंतोतंत साधले आहेत. प्रत्येक दगडातील सांधे 1/5 इंच इतके सारखे व अचूक आहे. आधुनिक साधने, तंत्रज्ञान वापरून ही इतकी अचूकता साधणे कठीणच आहे.
साहजिकच हा प्रश्न मनात येतो की हे अवाढव्य पिरॅमिडस् कसे बांधले असतील ? | Pyramid Of Giza In Marathi
साडेचार हजार वर्षांपूर्वी मानव व तंत्रज्ञान एवढा मोठा पिरॅमिड बांधण्याइतके विकसित झाले नसतील. त्यामुळे पिरॅमिडस् परग्रहावरील लोकांनी बांधले असावे. असा तर्कही काहींनी केला. पण त्यात तथ्य नाही. मिळालेली साधने व पुरावे यावरून पिरॅमिडस हे मानवनिर्मितच आहेत हे सिध्द होते. पिरॅमिडच्या बांधकामाबाबतच्या अगोदरच्या सिंद्धांतानुसार प्रचंड दगडी शिळा अतिशय लांबलचक घसरगुंड्यासारख्या उतार वापरून एकमेकांवर ठेऊन हे पिरॅमिडस् बांधण्यात आले आहे.
मात्र पिटर जेम्स यांच्या दाव्यानुसार अशा प्रकारे बांधकाम करणे अशक्य होते. अशाप्रकारच्या पद्धतीनुसार बांधकाम करण्यासाठी ह्या प्रचंड दगडी शिळा इतक्या उंचीवर घेऊन जाण्याकरिता योग्य कोन करने आवश्यक होते. त्यासाठी जवळपास पाव मैल लांबीचा उतार तयार करावा लागला असता. एकावर एक रचण्यासाठी दर तीन मिनिटांनी एक याप्रमाणे या उतारावर ठेवावे लागले असते असे पिटर जेम्स यांचे म्हणणे आहे. जर यानुसार शिळा ठेवल्या असत्या तर त्या उतारावरच्या घर्षणाच्या खुणा त्या दगडी शिळांवर दिसून पडल्या असत्या. परंतु तशा कोणत्याही खुणा त्यावर दिसून येत नाहीत.
पिटर जेम्स मागील कित्येक वर्षांपासून इजिप्तच्या पिरॅमिडस् यांच्यावर संशोधन करत आहेत. त्यांनी 4600 वर्षे जुन्या स्टेप पिरॅमिड व रेड पिरॅमिड मधील दफन कक्षांचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्टेप पिरॅमिडच्या आत जेम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक टन वजनाचे लहान लहान दगड हजारो वर्षे जुन्या पाम वृक्षाच्या केवळ एका फांदीला लटकत असल्याचे आढळले. त्यावरून हे पिरॅमिड आतल्या बाजूने लहान, सुटसुटीत ठोकळयांनी बांधून त्यावर मोठे ठोकळे बसविले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
तात्पर्य हे बांधकाम बाहेरून आत असे न करता आतून बाहेर असे झाले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. आजवरचे जेवढेही संशोधन पिरॅमिडस् च्या बाबतीत झाले त्यापेक्षा पिटर जेम्स यांचे संशोधन तर्कशुध्द वाटते.
गीझाजवळच्या बंदरात संशोधन केल्यानंतर असे आढळून येते की पिरॅमिडच्या बांधकामासाठी लागणारे दगड,अन्य घटक, खाद्यपदार्थ आणि मजूर यांची वाहतूक व्यवस्था जहाजाद्वारे होत होती. नजीकच्या गावामध्ये सर्व वस्तूंची साठवणूक होत होती. गीझाच्या दक्षिण दिशेला थोड्या अंतरावर दगडांची खाण आढळली. तेथून मोठमोठे दगड कापून, पिरॅमिडच्या जागेपर्यंत नेत असत. जमिनीवरून दगड नेतांना लाकडी ढकलगाड्यांचा वापर केला जात असे. पॅलेस्टाईन पासून कामगार आणले जात होते. वसाहती जवळ त्यांचीही थडगी आढळली.
अर्थात पिरॅमिडच्या बांधकामासंबंधी अनेक मतमतांतरे आहेत. नवनवीन संशोधनानुसार त्यात बदल होत जातो. इजिप्त मधील पिरॅमिडस् ची जेवढी भव्यता आहे तेवढीच गूढताही आहे. खरोखरच गीझाचा हा पिरॅमिड जगातील आश्चर्य आहे.
आपण ह्या पोस्ट मध्ये गिझाचा भव्य पिरॅमिड बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Bhimbetka Guha Information In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.
नवनवीन गोष्टी मराठीत जाणून घेण्यासाठी मराठीमाहिती वेबसाईट ला भेट दया .
अत्यंत रोचक माहिती.
thank you sir
छान सर
thank you sir