Table of Contents
Rajarshi Shahu Maharaj Kolhapur information in marathi | राजर्षी शाहू महाराज यांची माहिती
(Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi ) महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे नेहमी म्हटल्या जाते. त्याचे कारण असे की महाराष्ट्रात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी समाजाच्या विकासासाठी आपले जीवन अर्पण केले. राजर्षी शाहू महाराज हे त्यांच्यापैकीच एक महानसमाज सुधारक होते. आजच्या या लेखात आपण राजर्षी शाहू महाराज यांची माहिती म्हणजेच Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi घेऊ या.
राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन परिचय : Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ ला कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे तर आईचे नाव राधाबाई घाटगे होते. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेबांनी १८८४ मध्ये यशवंतराव यांना दत्तक घेतले. यशवंतराव यांचे नामकरण शाहू असे केले.
राजर्षी शाहू महाराज यांनी १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थान च्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. पुढे १९२२ पर्यंत म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी राज्यकारभार पहिला.
राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य | Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi
महाराष्ट्रातील एक प्रमुख सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेतल्या जाते. शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा पुढीलप्रमाणे सांगता येतील.
ब्राम्हणेतर चळवळ :
शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर संस्थानात ब्राम्हणेतर चळवळ सुरू झाली. याचे निमित्त असे घडले की, कोल्हापुरातील ब्राम्हण वर्गाने शाहू महाराजांना वेदोक्त विधी पार पाडण्याचा अधिकार नाकारला. ब्राम्हण वर्गानुसार वैदिक विधी पार पाडण्याचा अधिकार केवळ ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्गांनाच आहे, तर शूद्रांना पुराणोक्त विधीचा अधिकार आहे. त्यामुळे कोल्हापुरात वेदोक्त प्रकरण निर्माण झाले. ब्राम्हण वर्गाच्या विरोधात ब्राम्हणेतर लोक एकत्र आले आणि त्यांचे नेतृत्व शाहू महाराजांनी केले.
जेव्हा शाहू महाराजांची खात्री झाली की मराठा हे क्षत्रिय आहेत तेव्हा त्यांनी आपल्या राजवाड्यात वैदिक विधी करण्याचा आदेश १९०१ मध्ये काढला. तसेच मंदिरामध्ये ब्राम्हणेतर पुरोहित नेमले. मराठा समाजातील तरुणांना वैदिक विधी पार पाडण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष पुरोहित शाळा स्थापन केली. अशाप्रकारे कोल्हापुरात ब्राम्हणेतर चळवळ सुरू झाली.
कुलकर्णी वतनाचे निर्मूलन :
गावकारभार पाहण्याची जबाबदारी ही कुलकर्णी या वतन दारावर असे. कुलकर्णी हे पद आनुवंशिक तत्वानुसार भरले जात असे. बऱ्याचदा वारसाहक्काने अयोग्य व्यक्ती कुलकर्णी बनत असे. तसेच कुलकर्णी हे वतनदारी ग्रामीण समाजाच्या विकासातील अडथळा आहे शाहू महाराजांच्या लक्षात आले. त्यामुळे वंशपरंपरेने भरले जाणारे कुलकर्णी पद रद्द करून त्याच्या ऐवजी तलाठी पद्धती सुरू करण्याचा आदेश त्यांनी १९१८ ला काढला.
अशा प्रकारे कुलकर्णी वतनदारी पद्धत रद्द करून त्यांनी कनिष्ठ जातीतील लोकांना तलाठी पदावर नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा केला.
कनिष्ठ जातींच्या उन्नतीसाठी प्रयत्न :
शाहू महाराज खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला पुढे आणणारे समाजसेवक होते. त्यांनी कनिष्ठ जातीतील लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले.
अस्पृश्यता निवारण :
भारतामध्ये जातीप्रस्थ फार प्राचीन काळापासून आहे. उच्च जातींना अनेक फायदे तर कनिष्ठ जातींना बऱ्याच गोष्टींपासून वंचित राहावे लागत असे. शाहू महाराजांनी कनिष्ठ जातींवरील हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी काही ठोस उपक्रम सुरू केले. त्यांनी १९०८ मध्ये कनिष्ठ जातींना शिक्षण देण्यासाठी एक संस्था स्थापन केली. कनिष्ठ जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि त्यांना शिष्यवृत्ती देणे सुरू केले. त्यांनी कोल्हापूर संस्थानात जातीच्या आधारे विद्यार्थ्यांचे विभाजन करण्यास बंदी घातली. त्याचप्रमाणे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या असलेल्या शाळाही बंद केल्या.
वरील प्रकारचे कार्य केल्यानंतर त्यांनी कनिष्ठ जातींना बंधनकारक असलेली बलुतेदारी पद्धत १९१८ मध्ये बंद केली. पुढच्याच वर्षी त्यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यता पालनास बंदी घातली. त्यांनी सार्वजनिक ठिकाणे जसे नळ, विहिरी, धर्मशाळा आणि दवाखाने अस्पृश्यांसाठी खुले केलेत. ते स्वतः अस्पृश्यांच्या हाताचा चहा पीत असत. आंतरजातीय विवाहास कायदेशीर बनविण्यासाठी त्यांनी एक कायदाही संमत केला. स्वतच्या आचरणातून त्यांनी जातीभेद न पाळण्याचा आदर्श घालून दिला.
कनिष्ठ जातींना आरक्षण दिले :
अगोदरच्या काळात केवळ उच्च जातीतील लोकांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींच्या लोकांना शिक्षण नसल्यामुळे नोकरीचा प्रश्नच नव्हता. शाहू महाराजांनी ही परिस्थिती जाणली. त्यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ ला एक आदेश समंत करून शासकीय सेवेत ब्राम्हणेतर लोकांसाठी ५०% जागा आरक्षित केल्या.कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना नागरी आणि लष्करी सेवेत घेतले.
सत्यशोधक समाज आणि आर्य समाज यांचा वारसा चालविला :
म. फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य मंदावले होते. शाहू महाराजांनी १९११ मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन केले. तसेच सत्यशोधक समाजाची धुरा पण सांभाळली.सत्यशोधक समाजाच्या विविध कार्यांना प्रोत्साहन तर दिलेच शिवाय आर्थिक मदत ही केली. १९१३ मध्ये त्यांनी सत्यशोधक विद्यालय स्थापन करून एका ब्राम्हणेतर व्यक्तीस शिक्षक म्हणून नेमले.
सत्यशोधक समाजासोबतच त्यांनी आर्य समाजालाही नैतिक पाठबळ दिले. १९१८ साली त्यांनी कोल्हापूर संस्थानात आर्य समाजाची स्थापना केली. त्याचसोबत त्यांनी राजाराम महाविद्यालय,राजाराम विद्यालय,ट्रेनिंग कॉलेज यासारख्या शिक्षणसंस्थांची जबाबदारी आर्य समाजावर सोपविली.
लोकशाहीचे समर्थक :
शाहू महाराज लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. १९१९ मध्ये त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेचे प्रशासन हे जनतेमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे सोपविले. त्यामध्ये काही मागासवर्गीय उमेदवारही निवडून आले होते.
शाहू महाराजांना सर्व जातीतील सुशिक्षित लोकांच्या हाती सत्ता असावी असे वाटत होते.
कृषीविषयक सुधारणा :
शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक होते. त्यासाठी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञान मिळण्यासाठी त्यांनी १९१२ मध्ये किंग एडवर्ड कृषी संस्था स्थापन केली.त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेड्यापाड्यात कृषीविषयक यात्रा आणि प्रदर्शने भरवली.
थोडक्यात शाहू महाराज हे एक द्रष्टा महापुरुष होते.
शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य : Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi
केवळ शिक्षणामुळे कनिष्ठ जातींच्या लोकांचा विकास झाला नाही याची खात्री शाहू महाराजांना झाली होती. म्हणून त्यांनी कनिष्ठ जातीतील लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले.
मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण :
शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १९१३ मध्ये कोल्हापूर संस्थानात प्रत्येक खेड्यात शाळा असावी असा आदेश काढला. पुढे १९१८ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा आदेश काढला.शैक्षणिक कार्यास मदत म्हणून सधन नागरिकांकडून कर गोळा केला. बहुसंख्याक असलेल्या जातीतील व्यक्तींना शिक्षक म्हणून नेमले. गावातील मंदिरे, चावड्या ह्या शाळेचे वर्ग म्हणून वापरण्यास परवानगी दिली.
शिष्यवृत्ती आणि वसतिगृहे सुरू केली :
शाहू महाराजांनी १८९१ – ९२ मध्ये राजाराम महाविद्यालयामध्ये एक वसतिगृह सुरू केले. तसेच १९०१ साली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले.उच्च शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती देणे सुरू केली.अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षण शुल्क माफ केले. १९०८ मध्ये अस्पृश्य जातीच्या उन्नतीचे पुरस्कर्ते असलेल्या व्हाईलेट क्लार्क यांच्या नावाने अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर,नाशिक पुणे आणि अहमदनगर इत्यादी ठिकाणी सुमारे २६ वसतिगृहे सुरू केली.
इतर शाळा :
शाहू महाराजांनी शालेय शिक्षण देणाऱ्या शाळांच्या व्यतिरिक्त समजोपयोगी कार्यांचे शिक्षण देणाऱ्या विविध शाळा सुरू केल्या.
त्या शाळा पुढीलप्रमाणे होत्या.
- श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक शाळा
- कुलकर्णी व पाटील शाळा
- औद्योगिक शाळा
- सैनिक शाळा
- संस्कृत शाळा
- सत्यशोधक शाळा
- युवराज शाळा
या शाळांमध्ये तांत्रिक, व्यावसायिक आणि धार्मिक शिक्षण भेटत असे.
राजर्षी शाहू महाराज यांनी आपले जीवन बहुजन समाजातील लोकांच्या विकासाकरिता व्यतीत केले. हाती असलेल्या अधिकारांचा उपयोग करून शाहू महाराजांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. त्यातूनच कल्याणकारी राज्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. भारताचे संविधान लिहिताना त्यांच्या सुधारणा आणि कार्ये विचारात घेतली गेली. जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि आरक्षण.
महाराष्ट्र सरकार राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. त्याद्वारे उच्च शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
खरोखरच राजर्षी शाहू महाराजांसारखा समाजसुधारक होणे नाही.
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा शेअर करायला विसरू नका.
आपण ह्या पोस्ट मध्ये राजर्षी शाहू महाराज बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Dr Babasaheb Ambedkar Social Work In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.comवेबसाईट ला भेट दया .
Thank you.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या एकूण कार्याची माहिती संक्षिप्तरुपाने आली असली, तरी ती अत्यंत उपयुक्त आहे.
Thank you sir