संत सावता माळी | sant savata mali information in marathi 2021
sant savata mali information in marathi 2021 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते. या थोर संतांच्या कामगिरीनेच आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा बनला आहे. महाराष्ट्रातील अशा अनेक संतांपैकी सावता माळी हे एक थोर संत महाराष्ट्रात होवून गेले.आजच्या या लेखात आपण संत सावता माळी यांच्याबद्दल माहिती घेऊ या.
संत सावता माळी यांचा अल्प परिचय :
संत सावता माळी यांचा जन्म इ. स. 1250 ला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुरसोबा माळी तर त्यांच्या आईचे नाव नंगिताबाई माळी हे होते. सावता माळी यांचा मृत्यू इ.स. 1295 अरण येथे झाला
सावता माळी यांचे घराणे मूळचे सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थान मधील औसे येथील होते. सावता माळी यांचे आजोबा देवू माळी हे अरण येथे स्थायिक झाले.
नंगिताबाई आणि पुरसोबा हे दोघेही विठ्ठल भक्त होते. ते शेतकरी होते. शेती करीतच त्यांनी विठ्ठल भक्ती केली. त्यांचेच संस्कार सावता माळी यांच्या वर झाले. ते लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीत रममाण झाले. त्यांचे घराणे भगवादभक्ताचे घराणे म्हणून प्रसिद्ध होते.
सावता माळी यांचे लग्न भेंड गावच्या भानवसे रुपमाळी या घराण्यातील जनाबाई यांच्याशी झाले. त्या सुद्धा विठ्ठल भक्त होत्या. विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये सावता माळी आणि जनाबाई या दाम्पत्याला झाली.
सावता माळी भक्ती आणि संसार यांची योग्य सांगड घातली होती. आपले दैनंदिन कामकाज करीत त्यांनी विठ्ठल भक्ती जोपासली.
ईश्वर भक्तीसाठी संसाराचा त्याग करणे, जप, योग आणि तीर्थयात्रा अशी कशाचीही आवश्यकता नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
सावता माळी यांचे अभंग साधे आणि सोपे होते.
संत सावता माळी यांचे काही अभंग :
त्यांचे काही अभंग बघू या
कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी |
लसूण मिरची कोथिंबीरी | अवघा झाला माझा हरि |
स्वकर्मात व्हावे रत,मोक्ष मिळे हातोहात |
सावत्याने केला मळा | विठ्ठल देखियेला डोळा |
प्रपंच असुनी परमार्थ साधावा |
वाचे आळवावा पांडुरंग |
मोट, नाडा,विहीर,दोरी |
अवघी व्यापिली पंढरी ||
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा|
जेणे मुक्ती द्वारा ओळंगती||
विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ |
हृदयकमळ मंत्रसिद्ध |
दिगंबर मूर्ती गोजरी सावळी |
तोडे पायीं वाली मनगटी |
कटीवरी हात पद्म शंख |
पुष्पकळी मोख अंगुलीत |
सावता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें | नाम विठ्ठलाचे कलियुगी |
आमचा संत सावता माळी | sant savata mali information in marathi 2021 हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर संत नामदेव यांच्या विषयी माहिती घ्यायची असेल तर खालील लिंकवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता.
Sant Namdev information in marathi 2021| संत नामदेव विषयी माहिती
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला भेट देऊ शकता.
Good story of sant savta mali.