रामेश्वरम मंदिर(ancient temple) हे हिंदू धर्मातील एक धार्मिक आणि पवित्र स्थळ आहे. बद्रीनाथ,जगन्नाथपुरी, द्वारका आणि रामेश्वरम अशा चार धाम मधील एक असलेले हे अत्यंत मंगलमय स्थळ आहे. त्याचप्रमाणे रामेश्वरम मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आजच्या या लेखात आपण रामेश्वरम मंदिराचा इतिहास म्हणजेच Rameshwaram Temple History In Marathi बद्दल माहिती घेऊ या.
Table of Contents
Rameshwaram Temple History In Marathi | रामेश्वरम मंदिराचा इतिहास
रामेश्वरम मंदिराची माहिती : Rameshwaram Temple History In Marathi
रामेश्वरम मंदिर हे तमिलनाडु राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे. मान्यतेनुसार रामेश्वरम मंदिराचा संबंध रामायणाशी आहे. प्रभु श्रीराम यांनी याठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली असे म्हटले जाते.
जगातील सर्वात मोठा गलियारा या मंदिरात आहे. गलियारा म्हणजे छोटा रस्ता वा गली. हा गलियारा पूर्व – पश्चिम १३३ मी. तर उत्तर – दक्षिण १९७ मी. आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे गोपुरम ३८.४ मी. उंच आहे. हे मंदिर जवळपास सहा हेक्टर मध्ये बनलेले आहे.
रामेश्वरम मंदिरात एक ताम्रपट आहे. या ताम्रपटावरून कळते की, ११७३ साली श्रीलंकेचा राजा पराक्रम बाहू याने मूळ शिवलिंग असलेल्या गर्भगृहाचे निर्माण केले आहे. या मंदिरात फक्त शिवलिंगाची स्थापना केली होती. त्याठिकाणी देवीची मूर्ति नव्हती. म्हणून या मंदिराला नि:संगेश्वरचे मंदिर देखील म्हटले जाते.
पंधराव्या शतकात राजा उडैयान सेतुपती आणि नागुर निवासी वैश्य यांनी १४५० मध्ये ७८ फुट उंच गोपुरम बांधले असे म्हणतात. यानंतर सोळाव्या शतकात मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीचे निर्माण कार्य तिरुमलय सेतुपती यांनी केले. तिरुमलय सेतुपती आणि त्यांचा पुत्र यांच्या मुर्त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहेत. यानंतर अनेक राजांनी मंदिराच्या विविध भागांचे बांधकाम केले अशी माहिती मिळते.
रामेश्वरम मंदिर ( Rameshwar Temple) हे एक भव्य मंदिर आहे. रामेश्वरम मंदिराचे बांधकाम हे ग्रॅनाइट आणि वालुकाश्मात बांधलेले आहे. या मंदिराच्या चारही बाजूंनी उंच गोपुरे आहेत.
याठिकाणी एकुण २२ कुंडे आहेत. मान्यता अशी आहे की या पाण्याने आंघोळ केल्याने पापातून मुक्ती मिळते.
रामेश्वरम येथील प्रेक्षणीय ठिकाणे :Rameshwaram Temple History In Marathi
रामेश्वरम येथे बघण्यासारखी बरीच ठिकाणेआहेत.
१) रामेश्वरम म्हणजेच रामनाथस्वामी मंदिर : Rameshwaram Temple In Marathi
रामेश्वरम म्हणजेच रामनाथस्वामी मंदिर सर्व भाविकांचे आकर्षण केंद्र आहे. हे मंदिर बेटाच्या पूर्व बाजूला स्थित आहे. या मंदिराच्या परिसरात खुप लहान – मोठी मंदिरे आहेत. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंदिरांचे बांधकाम हे द्रविडी स्थापत्यशैलीत केलेले आहे.
धनुष्यकोडी : (Dhanushyakodi)
धनुष्यकोडी हे ठिकाण रामेश्वरम पासुन जवळपास ९ ते १० कि.मी. दक्षिण दिशेला आहे. श्रीलंकेला भारतातील सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे धनुष्यकोडी होय. धनुष्यकोडी (dhanushyakodi) हे ठिकाण श्रीलंकेपासुन मात्र २४ कि.मी. लांब आहे.
२३ डिसेंबर १९६४ ला आलेल्या त्सूनामीने धनुष्यकोडी उध्वस्त केले होते. अनेक लोक या नैसर्गिक आपत्तित मृत्युमुखी पडले होते. सर्व गाव उध्वस्त झाले होते. आता तेथे केवळ विविध वास्तुंचे अवशेष बघायला मिळतात.
तामिलनाडु सरकारने धनुष्यकोडीला भुताटकीचे गाव म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून धनुष्यकोडी मनुष्य वस्तीसाठी अयोग्य ठरविले गेले.
धनुष्यकोडीच्या पुढे ४ ते ५ कि.मी. अंतरावर अशोक स्तंभ आहे. पर्यटक या ठिकाणाला आवर्जुन भेट देतात.
१९६४ सालापर्यंत श्रीलंकेला जाण्यासाठी चेन्नई वरून धनुष्यकोडीपर्यंत रेल्वे असायची. नंतर धनुष्यकोडीवरून कोलंबोला बोटने प्रवास करता येत होता.
ए.पी.जे.अब्दूल कलाम ( A.P.J. Abdul Kalam)यांचे निवासस्थान / कलाम मेमोरियल ( kalam memorial):
आपल्या भारताचे मिसाइल मॅन, महान वैज्ञानिक भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांचे रामेश्वरम मंदिराच्या जवळच आहे. डॉ. कलाम यांचे नातेवाईक खालच्या मजल्यावर राहतात. तर वरील दोन मजल्यावर संग्रहालय आहे. डॉ. कलाम यांनी आपले सर्वस्व देशाला अर्पण केलेआहे. भारत सरकारने या ठिकाणी डॉ. कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संग्रहालय (kalam memorial) उभारले आहे.
या संग्रहलायत (kalam memorial) डॉ. कलाम A.P.J. Abdul Kalam यांनी वापरलेल्या अनेक वस्तु त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आपल्याला येथे बघायला मिळतात.
रामेश्वरमला कोठे राहावे :
भारतातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असल्याने रामेश्वरम येथे निवासाची व्यवस्था छान आहे. कमी खर्चात राहण्यासाठी येथे धर्मशाळा, आणि भक्तनिवास मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे खाजगी होटल्सदेखील या ठिकाणी आहेत. आपण आपल्या बजेट प्रमाणे होटल निवडू शकतो.
रामेश्वरमला भेट देण्याची योग्य वेळ :
रामेश्वरामला भेट वर्षभरात केव्हाही देता येते. परंतु उन्हाळा आणि पावसाळा टाळला तर योग्य होईल. साधारणता ऑक्टोबर ते मार्च याकाळात भेट दिली तर छान होईल.
तुम्ही रामेश्वरमला भेट देवून दक्षिणेकडील स्थापत्यकला जवळून बघू शकता.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर कोणार्क मंदिरविषयी माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करुन तुम्ही माहिती घेवु शकता.
Konark Surya Mandir information in marathi 2021 | कोणार्क सूर्य मंदिर मराठी माहिती
तुम्ही आमच्या http://www.marathimahiticom या वेबसाइटला पण भेट देवू शकता.
5 thoughts on “Rameshwaram Temple History In Marathi २०२१ | रामेश्वरम मंदिराचा इतिहास”