कोसळणाऱ्या विजांपासून अशी घ्या खबरदारी | हे ॲप देईल तुम्हाला वीज पडण्याची पूर्वसूचना

कोसळणाऱ्या विजांपासून अशी घ्या खबरदारी |हे ॲप देईल तुम्हाला वीज पडण्याची पूर्वसूचना

lighting-strike 2022

पावसाळ्यात दरवर्षी विजांमुळे (lighting-strike 2022 | Damini App) अनेकजण मृत्युमुखी पडतात तसेच घरातील विद्युत उपकरणे बिघडतात. त्यामुळे या विजांपासून स्वतःच्या जिविताचे आणि विद्युत उपकरणांचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

वीज पडणे आणि त्यामुळे नुकसान होणे यामागे वैज्ञानिक कारण आहे. वीज पडणे हे आपण रोखू शकत नाही. परंतु योग्य काळजी घेतली तर आपला जीव वाचवू शकतो आणि विद्युत उपकरणांचा होणार बिघाड रोखू शकतो.

वीज कोठे पडते आणि का पडते ? ते जाणून घेणे गरजेचे आहे. वीज शक्यतो कमीत कमी रोध असणाऱ्या वस्तू, ठिकाण वा व्यक्तीवर पडत असते. त्यामुळे जर आपण वैज्ञानिक माहिती घेतली तर संभाव्य नुकसान टाळू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या की वीज चमकत असतांना काय करावे ? आणि काय करू नये ? याबाबत माहिती घेऊ या.

हे ही वाचा : रामेश्वरम मंदिराबाबत माहिती

झाडा खाली थांबू नये : lighting-strike 2022| Damini App

झाडे ही पावसाच्या पाण्याने ओली होतात. त्याचप्रमाणे झाडाखालील जमीनही ओली झालेली असते. जर झाडावर वीज पडली तर विजेच्या शलाका झाडा खाली असलेल्या व्यक्तीच्या शरीरात जातात. त्यामुळे विजेचा शॉक बसून त्या  व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून वीज चमकत असातांना झाडा खाली कधीच उभे राहू नये. घोळक्याने राहू नये. एकमेकांपासून दूर उभे राहावे.

धातूच्या वस्तू आणि ओल्या भिंतीपासून दूर राहावे :

पावसाळ्यात घरातील भिंती ओल्या होणे साहजिक आहे. जर त्या ओल्या भिंतीच्या संपर्कात घरातील धातूच्या वस्तू असतील तर ते ही धोकादायक ठरू शकते. जसे अलमारी, लोखंडी बेड, धातूचे नळ अशा वस्तू असतील आणि तेवढ्यातच बाहेर वीज पडली तर ओल्या भिंतीच्या मार्गाने त्या धातूच्या वस्तुतही विद्युत प्रवाह येऊ शकतो. घरातील या धातूच्या वस्तूंना नेमका त्याच वेळी जर स्पर्श झाला तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

See also  ITI Admission Process In Marathi 2022 | ITI मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु

कपडे वाळू घालण्यासाठी बरेच जण तार बांधतात. हे तर बऱ्याचदा झाडाला बांधलेले असतात. जर वीज झाडावर पडली तर ती त्या तार मधूनही येऊ शकते. बऱ्याचदा कपडे ओले होऊ नये म्हणून महिला मंडळी घाईने कपडे काढण्यासाठी जातात. नेमक्या तेवढ्या वेळातच कोसळू शकते. त्यामुळे कपडे वाळू घालण्यासाठी दोरीचाच वापर करावा.

छत्री, चाकू, भांडे अशा धातूच्या वस्तू हातात घेऊ नये. नदी, नाला, धरण वा तलाव वाहते पाणी यापासून दूर राहावे. विजा चमकत असतांना किंवा वातावरण ढगाळ असतांना उघड्यावर आंघोळ करू नये.  इलेक्ट्रिक पोल, मोबाइल वा इतर कोणताही टावर पासून दूर राहावे.

विद्युत उपकरणे : lighting-strike 2022 | Damini App

जेव्हा बाहेर वीज चमकते तेव्हा घरातील विजेची उपकरणे नुसती बंद करायची नाहीत तर बोर्ड मधून पिन सुद्धा बाहेर काढावी. फ्रीज, टीव्ही, डिशचा केबल हे सर्व अनप्लग कराव्या म्हणजे यांच्या पिन बाहेर काढाव्या. शक्यतो मोबाईलवर बोलू नये.

शेती, मैदाने अशी सपाट ठिकाणे :

lighting-strike 2022

पावसाळ्यात जेव्हा वीज चमकते तेव्हा शेती, मैदाने , टेकड्या, नदीच्या काठी वा समुद्र किनारी थांबू नये. कारण सपाट ठिकाणी आपली उंची जास्त असल्याने वीज पर्यायाने उंच असलेल्या ठिकाणीच पडते. या करिता सर्वात उत्तम उपाय म्हणजे सरळ जमिनीवर झोपणेगुडघ्यावर बसावे. वीज चमकणे थांबल्यावर त्वरित नजीकच्या इमारतीचा आश्रय घ्यावा.

दामिनी ॲप | Damini App :

केंद्र सरकारने अलीकडेच Damini App हे वीज पडण्याची सूचना देणारे ॲप लॉचं केले आहे. हे ॲप एखाद्या ठिकाणी वीज पडणार असेल तर 15 ते 30 मिनिटे आधी त्याची सूचना देईल. या दामिनी ॲप मुळे आपल्याला वीज पडण्याबाबतची पूर्वसूचना मिळेल आणि आवश्यक ती सावधानी बाळगता येईल.

मोबाइलमध्ये नेटवर्क असल्यास विजेचा अचूक अंदाज या ॲपमुळे येतो. जवळपास 40 किमीच्या परिसरातील वीज पडण्याच्या संभाव्य ठिकाणांची माहिती हे ॲप देईल.

See also  दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

या ॲपमध्ये वीज पडल्यावर काय करावे तसे विजेच्या धक्क्याने जखमी झाल्यास करावयाचे प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शनही केलेले आहे.

हे ॲप भारत सरकारच्या पृथ्वी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या भारतीय उष्णकटबंधीय हवामानशात्र संस्था पुणे यांच्याद्वारे विकसित केले गेले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप download करता येते. हे सर्वांनी download करणे गरजेचे आहे.

थोडक्यात वीज कोसळणे हे आपल्या हातात नाही. मात्र आपण काही सावधानी बाळगा म्हणजे जीव वाचेल.

तुम्हाला आमचा lighting-strike 2022 | Damini App हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

विविध लेख वाचण्यासाठी तुम्ही मराठीमाहिती ला भेट देऊ शकता.

सौजन्य : गुगल.

 

 

 

 

Spread the love

3 thoughts on “कोसळणाऱ्या विजांपासून अशी घ्या खबरदारी | हे ॲप देईल तुम्हाला वीज पडण्याची पूर्वसूचना”

Leave a Comment