Table of Contents
Marathi Writers Information In Marathi 2021 | मराठी साहित्यिक विषयी माहिती
‘माझीया मराठीचिये बोलु कवतिके, अमृता तेही पैजा जिंके’ अशी ही आपली मराठी भाषा. या भाषेचे कौतुक संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जवळपास साडेसातशे वर्षांपूर्वी केले आहे. मराठी भाषेत हा गोडवा निर्माण केला तो मराठी भाषेतील साहित्यिकांनी. आजच्या या लेखात आपण मराठी भाषेतील काही साहित्यिकांची माहिती म्हणजेच Marathi Writers Information In Marathi 2021 बद्दल माहिती घेवु या.
राम गणेश गडकरी ( जन्म २६ मे१८८५ -मृत्यु २३ जानेवारी १९१९ ) –
मराठी साहित्यिक विषयी माहिती
उर्फ गोविंदाग्रज उर्फ बाळकराम हे मराठी साहित्य क्षेत्रातील कवी,नाटककार, आणि विनोदी लेखक होते. राम गणेश गडकरी (ram ganesh gadakari) यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर म्हटले जाते. राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपणनावाने जवळपास १५० कविता लिहिल्या बाळकराम या नावाने त्यांनी विनोदी लेखन केले.
‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’ ,’पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही त्यांची अपूर्ण राहलेली नाटके आहेत.
विष्णु सखाराम खांडेकर ( जन्म ११ जानेवारी १८९८ _ मृत्यु 2 सप्टेंबर १९७६ ) –
विष्णु सखाराम खांडेकर ( vishnu sakharam khandekar)हे मराठी साहित्य क्षेत्रातील कथा-कादंबरीकार, लघु निबंधकार आणि समीक्षक होते. शिक्षकी पेशेत असलेल्या खांडेकर यांनी कुमार या टोपण नावाने काव्य लेखन केले तर आदर्श या टोपण नावाने विनोदी लेखन केले.
नवमल्लिका, पाकळ्या, समाधीवरली फुले, नवा प्रांत:काल ही त्यांचे कथासंग्रह आहेत.
ययाती,उल्का, दोन मने, क्रौंचवध, अश्रु, आणि अमृतवेल ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
प्रल्हाद केशव अत्रे -( जन्म १३ ऑगस्ट १८९८ – १३ जून १९६९ )
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे ( pralhad keshav atre)हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक नामवंत लेखक, कवी, नाटककार होते. आचार्य अत्रे हे चित्रपट निर्माते, पत्रकार , राजकारणी आणि उत्कृष्ट वक्तेही होते. केशवकुमार या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखनही केले आहे.
आचार्य अत्रे यांची नाटके आजही मराठी प्रेक्षक आवडीने बघतात. त्यांनी लिहलेली नाटके पुढीलप्रमाणे आहेत. मोरुची मावशी, तो मी नव्हेच, घराबाहेर, उद्याचा संसार, बुवा तेथे बाया, भ्रमाचा भोपळा, साष्टांग नमस्कार ही प्रमुख नावाजलेली नाटके आहेत.
आचार्य अत्रे यांच्या कविताही फार सुंदर आहेत. त्यांचे काव्यसंग्रह झेंडूची फुले, गितगंगा ही आहेत. कशी आहे गम्मत, अशा गोष्टी अशा गंमती फुले आणि मुले ही काही त्यांची कथासंग्रह आहेत. कर्हेचे पाणी हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (जन्म 8 नोव्हेंबर १९१९ – मृत्यु १२जून२०००) –
पु.ल.देशपांडे ( P.L.Deshpande)यांना निकटवर्ती भाई या नावाने संबोधित करीत असत. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. अख्ख्या महाराष्ट्रात ते पु.ल. म्हणून ओळखले जातात. पु.ल. देशपांडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते शिक्षक, लेखक, नाटककार,कवी,नट, नकलाकार,गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते – दिग्दर्शक होते. त्यांनी आकाशवाणी मध्येही नोकरी केली आहे. पु.ल. हे आपल्या हजरजबाबीसाठी प्रसिद्ध होते.
पु.ल. देशपांडे यांनी लिहलेली पुस्तके वाचक आजही उत्साहाने वाचतात. यामध्ये बटाट्याची चाळ, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, गोळा बेरीज, गणगोत,खोगीरभरती, गुण गाईन आवडी, नस्ती उठाठेव, आपुलकी, एक शून्य मी इत्यादी.
पु.ल. देशपांडे यांची काही प्रवासवर्णनपर पुस्तकेही आहेत. त्यामध्ये अपुर्वाही , पूर्वरंग आणि जावे त्यांच्या देशा ही प्रवासवर्णनपर पुस्तके आहेत.
पु.ल. ची नाटकेही प्रसिद्ध आहेत. अंमलदार, ती फुलराणी, तुका म्हणे आता, पुढारी पाहिजे,सुंदर मी होणार ही प्रमुख नाटके आहेत.
बिगरी ते मॅट्रिक, एका रविवारची कहानी, मी आणि माझा शत्रुपक्ष , पाळीव प्राणी, काही नवे ग्रहयोग, माझे पौष्टिक जीवन या त्यांच्या विनोदी कथा तूफान गाजल्या.
विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ( जन्म २७ फेब्रुवारी १९१२ – मृत्यु १० मार्च १९९९) –
मराठी साहित्यातील एक प्रतिभासंपन्न कवी, लेखक,नाटककार, समीक्षक आणि कथाकार होते. कुसुमाग्रज (kusumagraj) या टोपणनावाने त्यांनी कविता लेखन केले. कुसुमाग्रज यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे केले जाते.मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे वि.स. खांडेकर यांच्यानंतरचे दुसरे साहित्यिक होत.
कणा ही कविता कुसुमाग्रज यांची आजही आपल्याला स्फुर्ती देते. विशाखा, वादळवेल, जीवन लहरी, किनारा,मराठी माती ही त्यांचे काही गाजलेले काव्यसंग्रह आहेत. नटसम्राट हे नाटक तर आजही आपल्याला अंतर्मुख करते. दूसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, राजमुकुट, ही त्यांची इतर गाजलेली नाटके आहेत.
वैष्णव, कल्पनेच्या तीरावर, जान्हवी ह्या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
अण्णा भाऊ साठे( जन्म १ ऑगष्ट १९२० – मृत्यु १८ जुलै १९६९ ) –
अण्णा भाऊ साठे ( anna bhau sathe) यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक समाजसुधारक, लोक कवी,लेखक,शाहिर म्हणून परिचित आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्यावर मार्क्सचा प्रभाव होता. त्यांचे साहित्य सामाजिक आणि राजकीयदृष्टया खुप महत्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ व्यापक बनविण्यात अण्णा भाऊ साठे यांचा मोठा वाटा होता.
फकीरा (Fakira) ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. या कादंबरीला १९६१ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या प्रसिध्द असलेल्या काही कादंबऱ्यामध्ये वारणेचा वाघ,वैजयंता, वैर,रानगंगा, माकडीचा माळ,पाझर,गुलाम,चंदन,आवडी इत्यादीचा समावेश होतो.
आबी, कृष्णाकाठच्या कथा,गजाआड,निखारा असे काही त्यांचे कथासंग्रह आहेत.
कविता आणि माझा रशियाचा प्रवास त्यांचे प्रवासवर्णनपर लेखन आहे.
याशिवाय अण्णा भाऊ साठे यांनी पोवाडे,लावण्या , पटकथा, लोकनाट्य, मुकनाट्यही लिहलेले आहेत.
या शिवाय मराठी साहित्यात अनेक लेखकांनी आपला ठसा उमटविला आहे. आमचा हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास तुम्ही खालील लिंकद्वारे वाचू शकता.
http://www.marathimahiti.comवेबसाईट ला नक्की भेट दया .
Very nice
Thank You Sir.