Salherchi Ladhai Information In Marathi 1672 | साल्हेरची लढाई – मराठ्यांचा मुघलांवर जबरदस्त विजय

Salherchi Ladhai Information In Marathi 1672 | साल्हेरची लढाई – मराठ्यांचा मुघलांवर जबरदस्त विजय

Salherchi Ladhai Information In Marathi 1672

 

छत्रपती शिवाजी महाराज ( shivaji maharaj information )यांचा इतिहास खुप रोमांचक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अनेक विजय मिळविले. पुरंदरचा तह ( purandarcha tah ) मोडल्यानंतर महाराज आणि मुघल यांच्यात पुन्हा घनघोर लढाया झाल्या. त्यापैकीच एक घनघोर लढाई झाली ती साल्हेर येथे. आजच्या या लेखात आपण साल्हेरच्या घनघोर लढाईबाबत (Salherchi Ladhai Information In Marathi 1672) माहिती घेऊ या.

दिलेरखान आणि बहादुरखान यांची युती : Salherchi Ladhai Information In Marathi 1672

औरंगजेबाने ( aurangjeb) 1671 मध्ये  दख्खनच्या मोहिमेसाठी बहादुरखानास हुकुम दिला. दिलेरखान हा सुद्धा दख्खनमध्येच होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुर्वीच साल्हेरचा किल्ला घेतला होता. ऑक्टोबर 1671 मध्ये बहादुरखान आणि दिलेरखान यांनी बागलाणमध्ये आले. त्या दोघांनी मिळून बागलाण , नाशिक, पुणे आणि उत्तर कोकण तसेच भिमथडी यावर हल्ले करण्याची योजना आखली. त्यांच्याजवळ अफाट फौज आणि युद्धसाहित्य होते. औरंगजेबाने शिवाय अनेक मातब्बर सरदार त्यांच्या दिमतीला दिले होते. यांमध्ये इख्लासखान मियाना , मुहकमसिंह चंदावत ,राव अमरसिंह चंदावत असे मातब्बर सरदार त्या फौजेत होते.

Salherchi Ladhai Information In Marathi 1672

बहादुरखान आणि दिलेरखान यांचा साल्हेरच्या किल्ल्याला वेढा :

1671 च्या अखेरीस बहादुरखान आणि दिलेरखान यांनी साल्हेरच्या किल्ल्याला वेढा दिला. साल्हेरच्या किल्ल्या अफाट मुघलांनी वेढला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना साल्हेरवरील मुघलांच्या मोहिमेची खबर मिळाली. त्यांनी त्वरित सरनौबत प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पेशवे यांना साल्हेरकडे कूच करण्याचे आदेश दिले. त्यावेळी मोरोपंत पेशवे हे कोकणात होते. महाराजांनी आदेश दिल्यावर मोरोपंत पेशवे कोकणातुन घाट चढून साल्हेरकडे आले. प्रतापराव गुजरही जलद गतीने साल्हेरकडे धाव घेतली. त्यावेळी मराठी फौज जवळपास 40 हजार होती. तर मुघलांची फौज ही सुमारे 60 हजार होती.

See also  छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर | chhatrapati Sambhaji maharaj and Akbar 2021

साल्हेरची घनघोर लढाई : Salherchi Ladhai Information In Marathi 1672

साल्हेरची लढाई (Salherchi Ladhai Information In Marathi 1672)  फेब्रुवारी 1672 मध्ये झाली. सरनौबत प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पेशवे आपल्या सैन्यनिशी मुघल फौजेवर तुटून पडले. मराठे त्वेषाने मुघलांना भिडले. एका बाजूने पायदळ तर दुसरीकडून बाजूने घोडदळ असा हल्ला प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पेशवे यांनी केला. भयंकर रणसंग्राम साल्हेरच्या पायथ्याशी होत होता.

साल्हेरच्या घनघोर लढाईचे वर्णन सभासदाच्या लेखनीतुन उठावदार दिसते. त्यानुसार , ” मोंगल , पठाण , रजपूत, रोहिले , तोफा ,हत्ती ,ऊंट , आराबा घालून मोंगलांनी युद्ध मांडले. पृथ्वीचा धुराळा असा उडाला की तीन कोश औरस चौरस कोणास आपले व परकें माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहाला. घोडे , ऊंट, हत्ती, यांस गणना नाही. रक्ताचे पुर वाहिले , रक्ताचे चिखल जाहाले , त्यामध्ये ( पाय ) रुतों लागले , असा कर्दम जाहाला. मारतां मारतां घोडे जिवंत उरले नाहीत. जे जिवंत सापडले ते साहा हजार घोडे राजियाकडे गिणतीस लागले. सवाशे हत्ती सापडले , साहा हजार उंटें सापडली. मालमत्ता , खजाना , जडजवाहीर , कापड, अगणित बिछाईत हातास लागली. बेवीस वजीर नामांकित धरले. खासा इख्लासखान पाडाव जाला ! ऐसा कुल सुभा बुडविला. हजार दोन हजार सडेसडे पळाले. ऐसे युद्ध जाले.

युद्धात प्रतापराव सरनौबत व आनंदराव व व्यंकोजी दत्तो व रुपाजी भोसले व सूर्यराव काकडे व विसाजी बल्लाळ , मोरो नागनाथ व मुकुंद बल्लाळ , वरकड बाजे वजीर , उमराव ऐसे यांणी शिकस्त केली. तसेच मावळे लोक  यांणी  व सरदारांनी कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनौबत या उभयतानी आंगीजणी केली आणि युद्ध करितां सूर्यराव काकडे पंचहजारी , मोठा लष्करी धरकारी , याणे युद्ध थोर केले. ते समयी जंबुरियाचा गोळा लागून पडिला ! सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे ! भारती जैसा कर्ण योद्धा. त्याच प्रतिभेचा असा शूर पडला ! वरकडही  नामांकित शूर पडले. असे युद्ध होउन फत्ते जाहाली ! ”

See also  Shivaji Maharajana kiti patni hotya ? छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ?

मराठे आणि मुघल  यांच्यात झालेली ही खुप मोठी लढाई होती. यात महाराजांना प्रचंड विजय मिळाला. समोरासमोरील लढाईतही आपण मुघल  हरवू शकतो हा आत्मविश्वास मराठ्यांमध्ये निर्माण झाला.

आमचा हा लेख( Salherchi Ladhai Information In Marathi 1672) तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर प्रतापगडच्या लढाईबाबत माहिती घ्यायची असेल तर तुम्ही खालील लिंकवरून घेऊ शकता.

प्रतापगडाच्या पायथ्याशी 2021 | Pratapgad Makes History In Marathi

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला पण भेट देऊ शकता.

संदर्भ : राजा शिवछत्रपती ( लेखक : श्री. ब.मो. पुरंदरे )

Spread the love

2 thoughts on “Salherchi Ladhai Information In Marathi 1672 | साल्हेरची लढाई – मराठ्यांचा मुघलांवर जबरदस्त विजय”

Leave a Comment