Table of Contents
Vatican City Mahiti 2021| व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश
(Vatican City Mahiti 2021) जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या ख्रिश्चन धर्मियांचे प्रमुख धर्मकेंद्र असलेला व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश आहे.जगभरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांचे व्हॅटिकन सिटी हे एक प्रमुख सत्ताकेंद्रही आहे. प्रामुख्याने व्हॅटिकन सिटी हे रोमन कॅथोलिक पंथाचे केंद्र आहे. असा हा व्हॅटिकन सिटी देश क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात लहान देश आहे. आजच्या या लेखात आपण व्हॅटिकन सिटीबद्दल माहिती घेऊ या.
व्हॅटिकन सिटी देश कोठे आहे ?/ व्हॅटिकन सिटीचे क्षेत्रफळ किती आहे ? Vatican City Mahiti 2021
व्हॅटिकन सिटी हा देश इटली मधील रोमजवळ टायबर नदीच्या तिरी व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. व्हॅटिकन सिटीची लांबी 1.05 किमी आहे तर रुंदी 0 .85 आहे. अशा या देशाचे क्षेत्रफळ मात्र 44 हेक्टर (109 एकर) आहे.
व्हॅटिकन सिटीची भाषा आणि लिपी कोणती आहे ?
या देशाची अधिकृत भाषा इटालियन असून लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन ही आहे.
व्हॅटिकन सिटी देश केव्हा बनला ? Vatican City Mahiti 2021
इसवी सनाच्या आठव्या शतकापासून रोमच्या आजूबाजूच्या प्रदेशांनी चर्चचे अधिपत्य स्वीकारले. तेव्हापासून त्याला ‘पेपल स्टेट ‘ म्हटले जात असे. मात्र 1870 ला इटलीने हे शासन आपल्या हातात घेतले. ख्रिश्चन धर्मातील कॅथोलिक पंथ हा आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रीस्ताचा प्रतिनिधी मानते. त्यामुळे कोणत्याच्या देशाच्या अथवा राजाच्या अधिपत्याखाली राहणे रोमन कॅथोलिक चर्चला मान्य झाले नाही. त्याची परिणीती इटली आणि रोमन कॅथोलिक चर्च यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
शेवटी इटली आणि रोमन कॅथोलिक चर्च यांच्यात 11 फेब्रुवारी 1929 मध्ये समझोता झाला. हा सामंजस्य करारावर पोप पायस 11 चा प्रतिनिधी कार्डीनल सेक्रेटरी पिएत्रे गस्पारी आणि इटलीच्या वतीने भावी हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. इटलीने रोमन कॅथोलिक चर्चचे स्वातंत्र्य मान्य करून चर्च लगतची 109 एकर जागा दिली. अशाप्रकारे व्हॅटिकन सिटी हा देश निर्माण झाला.
हे ही वाचा लूव्र मुझीयम
व्हॅटिकन सिटी देशातील प्रशासन व्यवस्था कशी आहे ?
व्हॅटिकन सिटीमध्ये पोप हा सर्वोच्च स्थानी आहे. व्हॅटिकन सिटीचा प्रमुख या नात्याने व्हॅटिकन सिटीमधील सर्व कारभार पोपच्या अधिपत्याखाली चालतो. सचिवालयातील पाच कार्डीनलचे मंत्रिमंडळ आणि गव्हर्नर हे देशाचा कारभार बघतात. हे मंत्रिमंडळ आणि गव्हर्नर पोपला जबाबदार असतात. हा देश संयक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य नाही.
या देशाला स्वतःचे सैन्यदल नाही. मात्र इटलीतर्फे या देशाची संरक्षण व्यवस्था केली जाते. पोपच्या सुरक्षेसाठी खास राखीव दल आहे.
व्हॅटिकन सिटीत इतर देशांच्या वकिलाती नाहीत. तसेच या देशांशी राजनैतिक संबंध ठेवण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था नाही. आवशक्यतेनुसार पोप स्वतः ते काम बघतात.
व्हॅटिकन सिटीमध्ये टेलिफोन व्यवस्था, पोस्ट ऑफिस,बँक,रेडीओ,पार्क्सची व्यवस्था आहे. मात्र अन्नधान्य, वीज, इत्यादी गोष्टी आयात कराव्या लागतात. या देशाचा खर्च जगभरातून आलेल्या देणगीतून चालतो.
व्हॅटिकन सिटीचे चलन कोणते आहे ? Vatican City Currency :
व्हॅटिकन सिटीचे चलन युरो आहे. तेथील सर्व आर्थिक व्यवहार युरो या चलनाद्वारे होतात.
व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या किती आहे ? Vatican City Population :
व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या सुमारे आठशे ते नऊशे आहे. पोपच्या सेवकांना या देशाचे नागरिकत्व मिळू शकते. मात्र सेवा संपल्यावर नागरिकत्वदेखील रद्द होते.
व्हॅटिकन सिटीतील प्रसिद्ध स्थळे कोणती आहेत ?
इ.स. 326 मध्ये सम्राट कॉन्स्टटाइन याने सेंट पीटरच्या समाधीवर एक भव्य वास्तू उभारली. त्या वास्तूलाच सेंट पीटर बाझीलिका असे म्हणतात.या वास्तूचा दिवाणखाण्यात दुतर्फा उंच खांब आहेत. त्यावर अर्धवर्तुळाकार घुमट आहे. त्यानंतर सोळाव्या शतकात या वास्तूची पुनर्बांधणी केल्या गेली.
व्हॅटिकन सिटीत असलेले ग्रंथालय हे खूप महत्वपूर्ण आहे. त्याठिकाणी
सुमारे 16 लाख दुर्मिळ पुस्तके आहेत. तसेच सुमारे दीड लाख दुर्मिळ हस्तलिखिते आहेत.
असा हा जगातील सर्वात छोटा देश आहे. युनेस्कोने या देशाला जागतिक वारसा स्थळ म्हणून 1984 मध्ये मान्यता दिली.
सध्या व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस आहेत.
तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला भेट देऊ शकता.
स्त्रोत : गुगल