Socrates Information In Marathi | महान तत्वज्ञ सॉक्रेटीसबद्दल माहिती

Socrates Information In Marathi | महान तत्वज्ञ सॉक्रेटीसबद्दल माहिती

सॉक्रेटीस (Socrates Information In Marathi) हा प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ होता. अथेन्स मधील हा सॉक्रेटीस पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखला जातो. स्वतः एकही ग्रंथ न लिहलेला या महान तत्वज्ञ सॉक्रेटीसच्या विचारांची भुरळ आजही जगाला पडलेली आहे. सॉक्रेटीसबद्दल आपल्याला जी काही माहिती मिळते ती त्याच्या शिष्य असलेल्या प्लेटो आणि झेनोफन यांच्या लिखाणातून. आजच्या या लेखात आपण या महान तत्वज्ञ सॉक्रेटीसबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.

सॉक्रेटीसचा अल्प परिचय :

Socrates Information In Marathi
Socrates Information In Marathi

सॉक्रेटीसचा जन्म इ.स. पूर्व 470 मध्ये अथेन्स या ग्रीक नगरराज्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव साक्रोनिस्कस तर आईचे नाव फिनारेती होते. सॉक्रेटीसचे वडील हे शिल्पकार होते तर आई सुईनीचे काम करीत होती. अथेन्स मधील पार्थेनान मंदिराच्या बांधकामात त्याच्या वडिलांचा सहभाग होता.

सॉक्रेटीस हा दिसायला कुरूप होता. तो उंच नव्हता मात्र सुदृढ होता. जाडे ओठ, बटबटीत डोळे,केसाळ भुवया होत्या.  दाढी ठेवणाऱ्या सॉक्रेटीसचे उतारवयात त्याचे टक्कल ही पडले होते. असे सॉक्रेटीसचे शारीरिक वर्णन करता येईल.

सॉक्रेटीसच्या बायकोचे नाव झांटीपी होते. ती फार भांडखोर बाई होती. छोट्या छोट्या गोष्टीवरून ती सॉक्रेटीससोबत भांडत असे. मात्र सॉक्रेटीस हा नेहमीच शांत राहत असे. ती सॉक्रेटीसला त्याच्या शिष्यांच्या समोरही बोलता असे. सवयीप्रमाणे सॉक्रेटीस काहीच बोलत नसे. हे पाहून त्याच्या शिष्यांपैकी कुणीतरी विचारले कि, तुम्ही हे असे कसे सहन करता ? त्यावर सॉक्रेटीस बोलला कि, तिचे हे वागणे माझ्यासाठी चांगलेच आहे. त्यामुळे मला कळते कि माझ्यामध्ये सहनशीलता आहे कि नाही. सॉक्रेटीसला लैम्प्रोल्स, सोफ्रोनिस्कस आणि मेनेक्सिनस अशी तीन मुले होती.

See also  Chanakya's Strategy On Intelligence Associations 2021| चाणक्य यांची गुप्तचर यंत्रणेबाबत कुटनीति

हे ही वाचा : अलेक्झांडरचे भारतावरील आक्रमण अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi

सॉक्रेटीसचा उपरोध / सॉक्रेटीस आयरनी / सॉक्रेटीसची प्रश्नोत्तर पद्धती :

सॉक्रेटीस हा सैनिकही होता. आपल्या नगर राज्यासाठी त्याने तीन युद्धात सहभाग घेतला होता. जेव्हा तो सैन्यातून निवृत्त झाला , तेव्हा त्याने ज्ञानदानाचे कार्य सुरू केले.

सॉक्रेटीस हा ज्ञानदान करीत होता. मात्र त्याचे कधीही आश्रम, गुरुकुल वा ज्ञानदानाचे एक स्थायी ठिकाण नव्हते. जेथे माणसे विशेषत: तरुणवर्ग  जमलेले असत अशा कोणत्याही  सार्वजनिक स्थळी सॉक्रेटीस जात असे. तेथे चालू असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होत असे. तो स्वतःला ज्ञान नाही. ते ज्ञान त्या मंडळींजवळ आहे आणि ते आपल्याला घायचे आहे, अशी भूमिका तो घेत असे.

सॉक्रेटीस त्या मंडळींना तऱ्हे – तऱ्हेचे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. नैतिक संकल्पनांबाबत तो त्यांना प्रश्न विचारी. एखाद्या नैतिक मूल्याची व्याख्या विचारी. नंतर मग स्वतःच काही उदाहरणे देऊन समोरच्या व्यक्तीला त्याने स्वतःच केलेल्या व्याख्येला संदिग्ध करीत असे. अखेर त्या नैतिक मूल्याची एक नवीनच व्याख्या होत तयार होत असे. या सर्व प्रकारात समोरच्या श्रोत्यांची त्रेधा उडालेली असे. समोरच्या श्रोत्यांची उलटतपासणी करून त्यांच्या संकल्पना तो दृढ करीत असे. यालाच सॉक्रेटीसचा उपरोध वा सॉक्रेटीसची आयरनी असे म्हणतात. प्रश्नोत्तर पद्धतीने तो ज्ञानदान करीत असे.

सॉक्रेटीस साधारणता जे प्रश्न विचारीत असे त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे  होते.

  1. हे तुम्ही काय म्हणत आहात ?
  2. … म्हणजे नक्की काय आहे ?
  3. तुम्ही हे जे आता म्हणत आहात ते आधीच्या मुद्द्याशी कसे लागू पडेल ?
  4. तुम्ही जो मुद्दा मांडत आहात त्याचे नेमके स्वरूप उलगडून सांगाल काय?
  5. याबाबत तुम्हाला अगोदरच काय माहित आहे?
  6. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी एखादे उदाहरण देऊ शकाल का ?
  7. तुम्ही नेमके काय म्हणत आहात ? हे… का ते… ?
  8. कृपया तुम्ही हे थोडे अजून सोप्या भाषेत सांगाल का ?
See also  Egypt mummy history in marathi 2021 | इजिप्त ममी आणि गिझाचे रहस्य

सॉक्रेटीस एक महान तत्वज्ञ :

‘ सॉक्रेटीसपेक्षा कोणीही शहाणा मनुष्य नाही ‘ असा दैवी संकेत (Delfic Oracal) चेरफोन या सॉक्रेटीसच्या मित्राला मिळाला होता. परंतु सॉक्रेटीस स्वतःला कधीच शहाणा वा ज्ञानी मानीत नसे. तो असे नेहमी म्हणे की, मला कशाचे ज्ञान नाही हे मला माहीत आहे. इतरांना मात्र स्वतःच्या अज्ञानाचे ज्ञान नाही.

स्वतःला ओळखा असे तो म्हणत असे. त्याच्या तत्वज्ञानात नैतिकता आणि चिकित्सक विचार यांना फार महत्त्व होते. त्यामुळेच तत्कालीन दांभिक वृत्तीवर त्याने कडाडून हल्ला केला.

सॉक्रेटीसचा मृत्यू :

Socrates Information In Marathi
सौजन्य : flickr.com

सॉक्रेटीसच्या विचारांमुळे त्याला अथेन्स मध्ये पुष्कळ शत्रू निर्माण झाले. तत्कालीन तथाकथित ज्ञानी लोकांचे पितळ सॉक्रेटीसने उघडे पाडले. त्यामुळे प्रस्थापित वर्ग त्याच्यावर नाराज होता. त्यांनी सॉक्रेटीसवर देवीदेवतांविषयी अश्रद्धा निर्माण करणे, तरुणांना पथभ्रष्ट करणे, नगरातील लोकशाही संस्थांना न जुमानणे, असे आरोप केले. अथेन्समधील पाचशे नागरिकांच्या मंडळासमोर न्याय निवाडा करण्यासाठी त्याला उभे केले गेले. त्यात 280 मते त्याच्या विरोधात होती तर 220 मते त्याच्या बाजूने होती.

सॉक्रेटीसला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. अथेन्समधील सन्माननीय व्यक्तींना जर मेजवानी दिली तर त्याला मृत्युदंडाऐवजी पर्यायी शिक्षा मिळाली असती. परंतु तत्वनिष्ठ सॉक्रेटीसने ते स्वीकारले नाही. तुरुंगातून पळून जाण्याची तजवीज त्याच्या शिष्यांनी केली होती. मात्र सॉक्रेटीसने त्यालाही नकार दिला. आपल्या अनुयायांना सॉक्रेटीस म्हणाला की, त्याने अथेन्सच्या कायद्याचे पालन नेहमीच केले आहे. पृथ्वीवरील त्याचा अल्पकालीन मुक्काम आनंदी व्हावा आणि दफनानंतरही आनंदी असावं यासाठी त्याने ईश्वराला प्रार्थना केली. असे म्हणत त्या महान तत्वज्ञ सॉक्रेटीसने विषाने भरलेला प्याला आपल्या ओठास लावला. तत्वज्ञानाचा महान संत इ.स.पूर्व 399 मध्ये मरण पावला.

आमचाा Socrates Information In Marathi | महान तत्वज्ञ सॉक्रेटीसबद्दल माहिती  हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास नक्की शेअर करा.

तुम्ही आमच्या http://www. marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

See also  महाप्रतापी दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त विषयी माहिती 2021 | Samudragupta History In Marathi

स्रोत : गुगल

 

 

 

 

 

Spread the love

1 thought on “Socrates Information In Marathi | महान तत्वज्ञ सॉक्रेटीसबद्दल माहिती”

Leave a Comment