व्हिटॅमिन बी 12 लक्षणे आणि उपाय | Vitamin B 12
Vitamin B 12 : उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची शरीराला आवश्यक असते. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे आरोग्यविषयक विविध समस्या उद्भवू शकतात.
आजच्या या धकाधकीच्या आणि तणावयुक्त जीवनात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्येसोबत योग्य आहार घेणेही आवश्यक आहे. आपल्या आहारातून शरीराला आवश्यक असणारी व्हिटॅमिन्स मिळणे गरजेचे आहे.
व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. हे व्हिटॅमिन लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. शरीराच्या रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लाल रक्तपेशी आवश्यक असतात.
मेंदू आणि मज्जातंतूच्या पेशी मजबूत करण्यास व्हिटॅमिन बी 12 मदत करते. शरीरातील डीएनए साठी हे व्हिटॅमिन गरजेचे आहे. यामध्ये कोबाल्ट आढळते.
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आरोग्यविषयक विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. ॲनिमियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. भारतात 60 ते 70 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे.
व्हिटॅमिन बी 12 कमतरतेची लक्षणे काय आहे ? : Symptoms of vitamin B 12 Deficiency
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात.
- हात पाय सुन्न होणे, म्हणजेच हाता पायात मुंग्या येणे.
- थोडे देखील काम केल्यावर थकवा जाणवणे.
- अशक्तपणा जाणवणे.
- चिडचिड होणे. मानसिक समस्या उद्भवू शकतात.
- तोंड येणे. जिभेला फोड येणे.
- झपाट्याने वजन कमी होणे.
- बध्दकोष्ठता.
- पचन विषयक तक्रारी. गॅसेस होणे.
- भूक न लागणे.
- जुलाब होणे. पोट दुखणे.
- त्वचा पिवळी पडणे
- डोकेदुखी
- हिरड्या कमजोर होणे.
- नजर कमजोर होणे.
जरूर वाचा : ATM चा पासवर्ड बँकेत न जाता कसा रिसेट करावा?एटीएमचा पासवर्ड विसरला ? बँकेत न जाता असा करा रिसेट | ATM Card Pin Reset 2022
व्हिटॅमिन बी 12 कशातून मिळते ? Vitamin B 12 sources
व्हिटॅमिन बी 12 चे शाकाहारी स्त्रोत खालील प्रमाणे आहेत.
व्हिटॅमिन बी 12 हे बहुतांश मांसाहारी पदार्थातून मिळते. परंतु शाकाहारी लोकांसाठी पूरक आहारातून हे व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते.
दूध,दही,चीज,पनीर,ओट्स,मशरूम,ब्रोकोली,सोयाबीन, आंबवलेले पदार्थ त्याचप्रमाणे लिंबूवर्गीय फळे जसे संत्री, मोसंबी आणि अननस हे फळ यातून व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते. मोड आलेली कडधान्य यांचा आहारात समावेश करावा.
व्हिटॅमिन बी 12 चे मांसाहारी स्त्रोत पुढीलप्रमाणे आहेत.
अंडी, सार्डीन हा समुद्री मासा, शेलफिश, टूना या प्रकारचा मासा, रेड मीट यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 12. मिळते.
मित्रांनो तुम्हाला आमचा Vitamin B 12 हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.
तुम्ही आमच्या या फेसबुक पेज इतिहासाची सोनेरी पाने आणि अंतरंग यांना जरूर फॉलो करा.
विविध माहितीसाठी मराठी माहिती http://www.marathimahiti.comया वेबसाईटला भेट द्या.
स्त्रोत : गुगल
1 thought on “व्हिटॅमिन बी 12 लक्षणे आणि उपाय | Vitamin B 12”