Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ?
भारताच्या प्राचीन इतिहासात आचार्य चाणक्य हे एक महान कुटनीतीज्ञ म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांनी महान चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या द्वारे प्रथमच अखंड भारत जोडला. साम, दाम, दंड आणि भेद या नीतीने आचार्य चाणक्य याने मौर्य साम्राज्य बळकट केले. शत्रूचा अंत करण्यासाठी वा काही गुप्त बाबी बाहेर काढण्यासाठी आचार्य चाणक्यने (Chankyachya Gupther vishakanya) प्रसंगी सुंदर विषकन्यांचा उपयोग केला. याबाबतची माहिती आपण आजच्या या लेखात बघू या.
विषकन्या कशा तयार केल्या जात असत ? Chankyachya Gupther vishakanya
फार प्राचीन काळापासून भारतातही शत्रूचा नायनाट करण्यासाठी विषकन्यांचा उपयोग पद्धतशीरपणे केला जात होता. अतिशय रूपवान असलेल्या मुलींना लहानपणापासूनच योग्य प्रमाणात विषाची मात्रा दिली जात असे.
हे ही वाचा : आचार्य चाणक्य यांची कुटनीती
जसे जसे त्यांचे वय वाढत असे त्याप्रमाणात विषाची मात्राही वाढविली जात असे. अशा या विषकन्यांना विषाची एवढी सवय होऊन जात असे कि, त्यांना विषारी सापाचा दंशानेही काहीच होत नसे. त्यांनी केसात लावलेले फुलही लवकरच कोमेजून जात असे. जी आभूषणे ती घालत असत ती विषाच्या प्रभावाने काळवंडून जात असत.
अशाप्रकारे विषाची सवय झाल्याने त्या विषकन्यांच्या चाव्याने वा अन्य प्रकारच्या संपर्काने त्या कोणालाही ठार मारू शकत असत.
आचार्य चाणक्य विषकन्यांचा उपयोग कसे करीत असत ? Chankyachya Gupther vishakanya
आचार्य चाणक्य निपुण कुटनीतीज्ञ होते. राज्याच्या विकासाच्या वाटेत येणारे शत्रू वा स्वकीय यांचा काटा विषकन्यांचा उपयोग करून काढल्या जात असे. या विषकन्यांना योग्यप्रकारचे शिक्षण दिले जात असे. त्यामघ्ये शृंगारकलेसोबतच गायन,संगीत आणि नृत्य यांचे प्रशिक्षण त्यांना दिले जात असे.
हे ही वाचा : आचार्य चाणक्य यांची गुप्तहेर संघटनेबाबत कुटनीती
निपुण अशा या विषकन्या ज्याचा काटा काढायचा असेल त्या व्यक्तीला मोहित करण्याकरिता आचार्य चाणक्य सोडीत असत. या रूपवान विषकन्या त्या व्यक्तीसोबत रात्र घालवीत असत. पाहिजे ती माहिती त्या काढल्यानंतर त्या व्यक्तीला त्या ठार मारीत असत.
मुद्राराक्षस या प्रसिद्ध संकृत भाषेतील नाटकात असे वर्णन आहे कि, नंद सम्राट धनानंद याचा अमात्य याने चंद्रगुप्त मौर्य याला मारण्यासाठी विषकन्या पाठविली होती.
आचार्य चाणक्य याला या कटाची माहिती मिळाली. आचार्य चाणक्य याने ही विषकन्या चंद्रगुप्ताला मदत करणाऱ्या एका राजाला भेट दिली. त्या रात्री हा राजा मरण पावला. आचार्य चाणक्य यांच्या या हुशारीने अनेक उद्देश सफल झाले. एक तर चंद्रगुप्त मौर्य यांचा जीव वाचला आणि पुढे मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत अडसर ठरणाऱ्या त्या राजाचा काटा काढल्या गेला. त्यानंतर अमात्य आणि धनानंदाचे इतर अधिकारी चंद्रगुप्त मौर्य यांना मिळाले.
आचार्य चाणक्य यांनी मौर्य साम्राज्याच्या गुप्तहेर संघटनेत विषकन्यांचा सहभाग वाढविला. त्यातून गुप्तहेर संघटना मजबूत करून महान मौर्य साम्राज्याचा पाया मजबूत केला. राजा वा राज्य यांना धोकादायक ठरणाऱ्या शत्रू तसेच स्वकीय यांना आचार्य चाणक्य यांनी विषकन्यांचा उपयोग करून त्यांचा काटा काढला आणि मौर्य साम्राज्य सुरक्षित ठेवले.
आमचा Chankyachya Gupther vishakanya हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेयर करा.
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला पण भेट देऊ शकता.
स्त्रोत : गुगल
Nice