Table of Contents
घारापुरीची लेणी मराठी माहिती |एलिफंटा लेणी|Elephanta Caves Information In Marathi 2024
जागतिक वारसा स्थानाचा दर्जा प्राप्त असलेल्या एलिफंटा केव्हज (Elephanta Caves Information In Marathi 2024) म्हणजेच घारापुरीची लेणी ही मुंबईपासून सुमारे 6 ते 7 मैल अंतरावरील एका लहानशा बेटावर आहे. 7 चौ. कि. असलेल्या या बेटावर ही लेणी पर्वतामध्ये कोरलेली आहे. या बेटावर दक्षिणेला एक अवाढव्य दगडी हत्ती होता. त्या दगडी हत्तीवरून या घारापुरीच्या लेण्यांना एलिफंटा लेणी (Elephanta Caves) असे नाव पडले. आता हा हत्ती मुंबईच्या जिजामाता उद्यानात ठेवला आहे.
घारापुरी लेणी इतिहास : Elephanta Caves Information In Marathi 2024
घारापुरी गावाचे प्राचीन काळात श्रीपुरी हे नाव होते. श्रीपुरी ही शिलाहार राजांची राजधानी होती. कालांतराने चालुक्य, यादव आणि मुस्लिम शासकांनी त्या ठिकाणी सत्ता गाजवली.
कालांतराने 16 व्या शतकात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. पोर्तुगीजांच्या काळात या लेण्यांचा मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. पोर्तुगीजांनी केलेल्या तोफांच्या हल्ल्यात या ठिकाणचा एक शिलालेख पूणपणे उद्ध्वस्त झाला. त्यामुळे या लेण्यां कोणी आणि केव्हा खोदल्या गेल्या याची माहिती मिळत नाही.
परंतु या लेण्यांमधील शिल्पे आणि इतर कलाकृती त्यांची घडण इत्यादींवरून ही लेणी सुमारे 8 -9 व्या शतकात राष्ट्रकूट राजवटीत खोदली गेली असा तर्क संशोधक काढतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे बेट मराठ्यांनी कब्जात घेतले होते.
इंग्रजांनी इ.स. 1774 मध्ये या बेटावर आपली सत्ता प्रस्थापित केली.
घारापुरी बेटावर शैव संप्रदायाच्या पाच लेण्यांचा समूह आहे.
हे ही वाचा : भीमबेटका गुफा मध्यप्रदेश 2021 | Full Bhimbetka Guha Information In Marathi
त्रिमूर्ती शिल्प आणि इतर शिल्पे : Elephanta Caves Information In Marathi 2024
जगप्रसिध्द त्रिमूर्ती शिल्प घानापुरी लेणीमध्ये आहे. या लेण्यांमध्ये एक मध्यवर्ती दालन असून त्यामागे एक गर्भगृह आहे. सुमारे 6 चौ. मी. असलेल्या गाभाऱ्यात पाऊण मीटर उंचीच्या आसनावर त्रिमुर्तीची मुख्य प्रतिमा कोरलेली आहे. हे शिल्प पूर्णाकृती नाही. केवळ छातीपासून वरचा भाग कोरलेला आहे. या त्रिमूर्ती शिल्पाची उंची सुमारे अठरा फूट आहे.
शैवपांथिय ग्रंथात भगवान शिवाची तीन रूपांचे वर्णन केलेले आहे. त्या तीन रूपांचे वर्णन या त्रिमूर्ती शिल्पात आहे.मधले मुख हे तत्पुरुष महादेवाचे आहे. डावीकडचे मुख आघोर भैरव तर उजवीकडच्या मुखाने वामदेवाचे दर्शन होते. सृष्टीचा निर्माणकर्ता वामदेव पालनकर्ता महेश तर संहारकर्ता भैरव वा रूद्र असे दर्शवते. थोडक्यात उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी भगवान शिवाची तीन कार्ये या शिल्पातून दर्शविलेली आहेत.
शिल्पकाराने आपल्या कौशल्याने भगवान शिवाची तीन कार्ये या त्रिमूर्ती शिल्पात दाखवले आहे. पालनकर्ता महेशच्या मुखावर शांत आणि संयमी भाव असून चेहरा निर्विकार आहे. भैरव वा रूद्र जे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे त्यानुसार कौर्य आणि संताप दुसऱ्या मुखावर दिसते. दाढी मिशी असलेला चेहरा , जटामध्ये वेटोळे घालून असलेला नाग आणि गळ्यामध्ये असलेल्या नररुंडमाळा यातून भगवान शिवाचे संहार कार्य सूचित होते.
त्रिमूर्ती शिल्पाखेरीज आणखी बरीचशी शिल्पे या लेण्यांमध्ये आहे. त्रिमूर्ती शिल्पाच्या पूर्व दिशेस अर्धनारिश्र्वर तर पश्चिम दिशेस गंगावतरणाचे शिल्प कोरलेले आहे.
शिवपार्वती विवाह, तांडवनृत्य, अंधकासुर वध, रावणानुग्रह कथा इ.ची शिल्पे तेथे कोरलेली आहेत.
घारापुरी लेणीमधील शिल्पं बनविणाऱ्या शिल्पकारांनी अद्भुत कौशल्याने ही रचना केलेली आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा असलेली हे लेणी 1987 ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे.
एलिफंटा केव्हजला कसे जायचे?
गेट वे ऑफ इंडिया वरून एलिफंटा केव्हजला जाण्यासाठी बोटी उपलब्ध असतात. सकाळी 9 ते 4 पर्यंत बोटी आहेत. परतीसाठी तेथून संध्याकाळी 5 ला शेवटची बोट आहे.
एलिफंटा केव्हजला भेट देण्याचा योग्य काळ : Elephant Caves best time to visit.
एलिफंटा केव्हजला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. थोडक्यात पावसाळा सोडून इतर वेळी तुम्ही भेट देऊ शकता.
तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांना शेअर करा.
संदर्भ : गुगल