या सोप्या पद्धतीने तपासा आपला इन्कम टॅक्स रिटर्न रिफंड | How To check ITR Refund Status 2022

या सोप्या पद्धतीने तपासा आपला इन्कम टॅक्स रिटर्न रिफंड | How To check ITR Refund Status 2022

How To check ITR Refund Status 2022

31 जुलैला करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेलच. बऱ्याच जणांना रिफंड मिळत असतो. तर आपल्या रिफंडची अपडेट ऑनलाईन पद्धतीने (How To check ITR Refund Status 2022) कशी तपासायची याबाबत माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊ या.

ज्यांना रिफंड मिळणार असेल त्यांना NSDL च्या किंवा Income Tax च्या e-filing पोर्टल वर जाऊन आपल्या ITR Refund Status पाहता येईल.

Income Tax Return भरल्यानंतर सुमारे दहा दिवसांनी आपल्याला Refund Status चेक करता येते.

आयकर नियमानुसार ITR e-verification नंतर सुमारे 20 ते 60 दिवसांत refund मिळू शकतो.

हे ही वाचा : व्होटर कार्ड ला आधार कार्ड क्रमांक कसा लिंक करावा.व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

Income Tax च्या e-filing पोर्टलवर रिफंड कसा चेक करावा ?

Income Tax च्या e-filing पोर्टलवर खालील स्टेप फॉलो करून तुम्हाला तुमच्या रिफंडचे status चेक करता येईल.

  • सर्वप्रथम https://eportal.incometax.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल.
  • वरील वेबसाईटवर गेल्यावर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • नंतर स्क्रीन वर आलेल्या my account वर जावून Refund / Demand वर क्लिक करा.
  • नंतर ड्रॉप डाऊन मेनूमध्ये जाऊन इन्कम टॅक्स रिटर्न निवडून सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा acknowledgement no. वर क्लिक करा.
  • स्क्रीन वर तुम्ही तुमच्या ITR Refund चे status बघू शकाल.

NSDL च्या वेबसाईटवर जाऊन ITR Refund Status कसा चेक करावा ?

तुम्ही NSDL च्या वेबसाईटवर जाऊन तुमचा ITR Refund Status खालील स्टेप फॉलो करून बघू शकाल.

  • सर्वप्रथम तुम्ही https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html जावे.
  • पुढे पॅन क्रमांक, असेसमेंट इयर आणि capcha टाईप करा आणि proceed वर क्लिक करा.
  • रिफंड असलेले मूल्यांकन वर्ष निवडा.
  • Capcha कोड टाईप केल्यावर सबमिट वर क्लिक करा.
  • समोर आलेल्या स्क्रीनवर तुम्ही तुमचा रिफंड चेक करू शकता.
See also  सावधान ! सिम स्वॅप स्कॅम ठरतोय घातक !! अवघ्या काही मिनिटांत बँक खाते होते रिकामे

वरील दोन्ही पद्धतीने तुम्ही आपल्या ITR Refund Status बाबत माहिती जाणून घेऊ शकता.

आमचा How To check ITR Refund Status 2022 हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठी माहिती  http://www.marathimahiti.comया वेबसाईटवर जाऊन विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

संदर्भ : गुगल

 

Spread the love

2 thoughts on “या सोप्या पद्धतीने तपासा आपला इन्कम टॅक्स रिटर्न रिफंड | How To check ITR Refund Status 2022”

Leave a Comment