Table of Contents
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टल वरून सोप्या पद्धतीने काढा| How To Get Age, Nationality And Domicile certificate From Apale Sarakar 2022
तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल. सरकारी नोकरीकरिता अर्ज करायचा असेल , कोठे एडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला बरीच महत्त्वाची कागदपत्रे लागतात. अशा महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र आहे (डोमसाईल प्रमाणपत्र). वय,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (How To Get Age, Nationality And Domicile certificate From Apale Sarakar 2022) आपले सरकार पोर्टल वरून सोप्या पद्धतीने कसे काढावे याबाबतची माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेऊ या.
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र कोठून काढायचे ? How To Get Age, Nationality And Domicile certificate From Apale Sarakar 2022
तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातून तसेच महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार पोर्टल मधून तुम्हाला वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळते.
हे ही वाचा : गुगलवर या गोष्टी चुकूनही सर्च करू नकाWhat You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास
वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखीचा पुरावा :
ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राचा उपयोग होऊ शकतो.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पासपोर्ट
- रोजगार हमी योजना ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- सरकार कडून देण्यात आलेले इतर कोणतेही ओळखपत्र
पत्ता दर्शविणारा पुरावा :
आपल्या पत्त्याच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रांचा उपयोग करू शकता.
- पाणी बिल
- इलेक्ट्रिक बिल
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- सातबारा उतारा किंवा 8 अ उतारा
रहिवासी दाखला :
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी रहिवासी दाखला आवश्यक असतो. रहिवासी दाखला तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून मिळतो.
स्वयंघोषणा प्रमाणपत्र :
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदाराला स्वयंघोषणापत्र भरून देणे आवश्यक असते.
आपले सरकार पोर्टल वरून सोप्या पद्धतीने वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र कसे काढाल? How To Get Age, Nationality And Domicile certificate From Apale Sarakar 2022
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथे तुम्हाला स्वतःचा लॉग इन आयडी तयार करावा लागेल.
- लॉग इन केल्यावर डॅशबोर्डडवर विविध विभाग दिसतील. त्यातील महसूल विभाग निवडावा.
- महसूल विभाग निवडल्यानंतर वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास यावर क्लिक करावी.
- त्यानंतर ओपन झालेल्या विंडो मध्ये जी कागदपत्रे सांगितली आहेत, ती अपलोड करावी. या कागदपत्रांची साइज 75 kb ते 500 kb असावी.
- आपला पत्ता आणि इतर विचारलेली माहिती भरावी. फोटो आणि सही अपलोड करून आवश्यक ते शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा. मिळणारी पावती सांभाळून ठेवावी.
फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसांनी तुम्हाला वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळते.
संदर्भ : गुगल
तुम्ही आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा.
विविध माहितीसाठी आमच्या मराठीमहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट द्या.