आपल्या घरूनच उघडा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते
या महागाईच्या काळात रुपये कमाई करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच बचतही महत्त्वाची आहे. बचत साठी अनेक मार्ग आहेत. कोणी शेती, जमीन, सोने – दागिने , बँक आणि शेअर मार्केट अशा विविध ठिकाणी रुपये गुंतवितात. आज आपण अशाच प्रकारच्या गुंतवणुकीबाबत how-to-open-post-office-saving-account माहिती जाणून घेऊ या.पोस्ट ऑफिस हे गुंतवणुकीचे सर्वसामान्य माणसाच्या पसंतीचे क्षेत्र आहे. सर्वात सुरक्षित आणि चांगले व्याज म्हणून बरेचजण आपली पंजी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून गुंतवणूक करतात.
हे ही वाचा : व्होटर कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक कसे करायचे ?व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022
पोस्ट ऑफिस मध्ये न जाता घरूनच डिजिटल बचत खाते कसे उघडायचे ? how-to-open-post-office-saving-account
तुम्हाला जर घरूनच पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल बचत खाते सुरू करायचे असेल तर तुम्हाला खालील स्टेप फॉलो करायच्या आहेत.
- सर्वप्रथम तुम्हाला पोस्टाचा IPPB हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
- IPPB हा ॲप डाऊनलोड ॲप उघडून ओपन अकाऊंट या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तेथे तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. हा मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकल्यावर मोबाईल क्रमांकवर एक ओटीपी (OTP) येईल.
- OTP भरल्यानंतर तेथे विचारलेली माहिती भरा सबमिट करा.
- तुमचे डिजिटल बचत खाते तयार होईल. मात्र एक वर्षाच्या आत KYC ची प्रक्रिया करून घ्यावी. नंतरच तुमचे डिजिटल बचत खाते हे नियमित बचत खाते होईल.
मित्रांनो या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपणही बदलावे. तंत्रज्ञानाची कास धरली तर काळाच्या मागे पडत नाही.
तुम्हीही घरूनच पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल बचत खाते सुरू करा. ही पोस्ट आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.
आमच्या फेसबुक पेज अंतरंग ला जरूर फॉलो करा.
विविध माहितीसाठी आमच्या मराठीमाहितीhttp://www. marathimahiti.com या वेबसाईट ला भेट द्या.