India’s First Nuclear Test 1974 Information In Marathi | भारताची अणुचाचणीकडे  यशस्वी वाटचाल

India’s First Nuclear Test 1974 Information In Marathi | भारताची अणुचाचणीकडे  यशस्वी वाटचाल

India's First Nuclear Test 1974 Information In Marathi

18 मे 1974 ला भारत अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या पंक्तीत बसला. भारत अण्वस्त्रधारी बनणे ही खूप मोठी बाब होती. अमेरिकेसोबत इतर राष्ट्रेही भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या ( atomic programme of India) विरोधात होती. पाकिस्तान ( pakistan) आणि चीन (china) सोबत भारताची नुकतीच तीन युद्धे झाली होती. त्यात चीन नुकताच अण्वस्त्रधारी झाला होता. पाकिस्तानही अण्वस्त्रे बनविण्याच्या कार्यात व्यस्त झालेला होता. अशात भारताने जगातील विविध गुप्तचर यंत्रणांना  गुंगारा देत 18 मे 1974 रोजी पोखरण (pokharan) येथे पहिली अणुचाचणी केली. Smiling Buddha असे नाव या अणुस्फोटला दिले होते. आजच्या या लेखात आपण भारताच्या पहिल्या अणुस्फोटबाबत  (India’s First Nuclear Test 1974 Information In Marathi) माहिती घेऊ या.

India’s First Nuclear Test 1974 Information In Marathi | भारताची अणुचाचणीकडे  यशस्वी वाटचाल :

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1948 मध्ये दिल्लीमध्ये घटना समितीचे कामकाज चालू असताना समितीसमोर अणुऊर्जा कायदा हे विधेयक सादर केले होते.या कायद्याने अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात येणार होता. त्यानंतर सात वर्षानी भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे म्हणजे सायरसचे काम सुरू झाले.भारताच्या अणु उर्जा कार्यक्रमाचे जनक असलेले डॉ. होमी भाभा यांनी मुंबईजवळ ट्रॉम्बे येथे अणु इंधनातून प्लुटोनियम मिळविण्याची भट्टी सुरू करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या भट्टीचे नाव होते फिनिक्स. 1964 पासून या अणुभट्टीतून प्लुटोनियम मिळणे सुरू झाले. आता भारत कधीही अणुबॉम्ब बनवू शकत होता.

See also  World Red Cross Day Information In Marathi 2021 | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल माहिती

सबटेरेनियन नुक्लियर एक्सप्लोरेशन प्रोजेक्टची स्थापना :

चीनने 16 ऑक्टोबर 1964 मध्ये पहिली अणुचाचणी केली. त्यामुळे भारताच्या अणु कार्यक्रमाला गती मिळाली. के. सुब्रह्मण्यम हे सुरक्षा विश्लेषक त्यावेळी संरक्षण मंत्रालयात उपसचिव होते. त्यांनी संरक्षण सचिवांना पत्र पाठवून डॉ.होमी भाभा ( Dr. Homi Bhabha) यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन करण्याची मागणी केली. माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन हे त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयातील चीन विभागाचे प्रमुख होते. त्यांनीही अणु पर्याय हाताळण्याचा सल्ला दिला. तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी सबटेरेनियन नुक्लियर एक्सप्लोरेशन प्रोजेक्टची स्थापना केली. भारताने अणुबॉम्ब निर्मितीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

भारताच्या अण्विक कार्यक्रमावर अमेरिकेची पाळत :

भारताच्या अण्विक कार्यक्रमावर अमेरिकेचे किमान 1958 पासून तरी लक्ष होते. भारतातील अमेरिकेचे दुतावासही याबाबत लक्ष ठेवून होते. त्यांना शंका होती की भारत जमिनीखाली किंवा पाण्याखाली अणुचाचणी करेल. ‘ India To Go Nuclear’ असे शीर्षक असलेला अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या ब्यूरो ऑफ इंटेलिजन्स अँड रिसर्चने सादर केला होता. त्याचबरोबर अमेरिकेची नॅशनल सिक्युरटी एजन्सी ( एन एस ए ) ही संस्थाही भारताच्या अणऊर्जा कार्यक्रमावर पाळत ठेऊन होती.

डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यू भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या इतिहासातील सर्वात दुःखद दिवस आहे. 24 जानेवारी 1966 रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचे ( Air India) कांचनगंगा हे बोईंग 707 हे विमान इटली आणि फ्रान्स या दोन देशातील पर्वत रांगावरून जात असताना युरोपातील सर्वात उंच शिखर माँ ब्ला याला धडकले. त्यात डॉ. होमी भाभा सकट एकूण 106 प्रवाशी मृत्युमुखी पडले. डॉ. होमी भाभा यांचा मृत्यू हा निव्वळ अपघात नव्हता तर सी आय ए च्या गुप्त मोहीम विभागाच्या प्रमुख असलेल्या क्रोवलीच्या मते घातपात होता. आणि या मागे होती अर्थातच अमेरिकेची सी आय ए. अमेरिकेला जगात इतर कोणत्याही देशाने अणुबॉम्ब बनवू द्यायचे नव्हते. परंतु भारताने आपला अणु कार्यक्रम चालूच ठेवला.

See also  RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi | रॉ चा गनिमी कावा

भारताची पहिली अणुचाचणी 18 मे 1974 : India’s First Nuclear Test 1974 Information In Marathi

India's First Nuclear Test 1974 Information In Marathi

जेव्हा इंदिरा गांधी ( Indira Gandhi ) भारताच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा भारताचा आण्विक कार्यक्रमाचा वेग वाढला. तत्कालीन अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष विक्रम साराभाई यांनी अणुबॉम्बचे बेसिक डिझाईन तयार करण्याचे काम सुरू केले होते. विक्रम साराभाई ( Vikram Sarabhai ) यांचा 30 डिसेंबर 1971 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. होमी सेठना ( Dr.Homi Sethana) हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनले. त्यांनी 1972 मध्ये अणुबॉम्बचे बेसिक डिझाईन पूर्ण केले.

पंतप्रधान इंदिरा गांधींनी सप्टेंबर 1972 ला जेव्हा मुंबईला आय आय टी च्या दहाव्या पदवीदान समारंभाला भेट दिली तेव्हा त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रास भेट दिली. केंद्राचे प्रमुख डॉ. राजा रामण्णा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अणुबॉम्बचे लाकडी मॉडेल दाखविले. त्याचवेळी त्यांनी अणुचाचणी च्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजळला. भारताने जगाला गुंगारा देत पहिली अणुचाचणी यशस्वी केली. भारत अण्वस्त्रसज्ज झाला. 18 मे 1974. अत्यंत गोपनीय पणे भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. 1967 ते 1974 या आठ वर्षांच्या काळात 72 शास्त्रज्ञ आणि त्यांचे सहकारी यांनी अत्यंत सावधपणे जगाला माहित न पडू देता ही चाचणी केली. यामध्ये राजा रामण्णा , डॉ. पी. के.अय्यंगार , डॉ. राजगोपाल चिदंबरम , डॉ. नागपट्टीनम , डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, डॉ. वामन पटवर्धन आणि डॉ. होमी सेठना हे प्रमुख शास्त्रज्ञ होते.

भारताने अण्वस्त्रधारी बनणे हे काही सोपी बाब नव्हती. केजिबी आणि सी आय ए या गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधानांच्या सचिवालय ते लष्करापर्यंत आपले एजन्ट तयार केले होते. त्यांचे तंत्रज्ञानही अद्यावत होते. त्यांचे अवकाशातील उपग्रह नजर ठेवूनच होते. तरीही शेवटी भारताने अणुचाचणी(India’s First Nuclear Test 1974 Information In Marathi) केलीच. या मोहिमेसाठी रॉ ची मोलाची मदत झाली.

See also  लाल बहादुर शास्त्री विषयी माहिती 2021 | Full Lal Bahadur Shastri Information In Marathi

आमचा हा लेख (India’s First Nuclear Test 1974 Information In Marathi)तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बाबत माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता.

आयरन लेडी इंदिरा गांधींचे इतिहास माहिती 2021 | Indira Gandhi Information In Marathi

तुम्ही आमच्या या वेबसाईट ला पण भेट देऊ शकता.

http://www.newiinfo.com

संदर्भ : रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा. लेखक. रवी आमले.

Spread the love

Leave a Comment