Iran che Bharatavaril Akraman | इराणचे भारतावरील आक्रमण आणि त्याचा भारतीय संस्कृती वरील परिणाम

Iran che Bharatavaril Akraman | इराणचे भारतावरील आक्रमण आणि त्याचा भारतीय संस्कृती वरील परिणाम

 

(Iran che Bharatavaril Akraman) सायरस पहिला याने इराण मध्ये अॅकेमेनियन साम्राज्याची स्थापना केली. त्याने इ. स.पू. 558 ते इ. स.पू. 530 या अठ्ठावीस वर्षांच्या काळात बॅक्ट्रिया , आशिया , मायनर , मेडिया , बॅबिलोनिया , अॅसीरिया , लिडीया , सीरिया ही बलाढ्य राज्ये आपल्या वर्चस्वाखाली आणली. तत्कालीन गांधारचा राजा फुक्कुसाती याने सायरसचा यशस्वीपणे सामना केला आणि त्याला गांधारवर विजय मिळू दिला नाही. आजच्या या लेखात आपण इराणचे भारतावरील आक्रमण ( Iran che Bharatavaril Akraman ) आणि त्याचा भारतीय संस्कृती वरील परिणाम याबाबत माहिती घेऊ या.

दरियस पहिला याचे भारतावरील आक्रमण –

दारीयस पहिला हा अॅकेमेनियन साम्राज्यातील तिसरा बलशाली सम्राट होय. इ. स.पू. 522 ते इ. स.पू. 486 दारीयस याने राज्य केले. त्याने भारताच्या पंजाब , सिंध आणि राजस्थान वर हल्ला करून ते प्रदेश जिंकले. त्याठिकाणी त्याने आपले प्रशासकीय अधिकारी नेमले. प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार हिरोडोटोस याने लिहून ठेवले आहे की,राजस्थानचा वाळवंटी प्रदेश आणि सिंधू नदीचे खोरे हे प्रांत इराणी साम्राज्याचा भाग होते.या प्रांतातून सुमारे दहा लाख पौंडा च्या किंमती चा महसूल सोनाच्या स्वरूपात इराणला जात होता. इराणच्या सैन्यात सिंधी , पंजाबी सैनिकांचे दल होते.

इराणच्या आक्रमणाचे भारतीय संस्कृतीवरील परिणाम :

दारीयस याच्या भारतावरील आक्रमणामुळे भारतीय संस्कृतीवर काही परिणाम झाले. ते पुढील प्रमाणे आहेत.

See also  अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi

1) व्यापार वाढ –

इराणच्या आक्रमणामुळे भारताचे पश्चिम आशिया , आफ्रिका व युरोप या देशांशी प्रत्यक्षात संबंध प्रस्थापित झाले. इराण मार्गे युरोपला जोडल्या गेलेल्या मार्गांचीही माहिती भारतीयांना झाली. त्यातून व्यापाराची भरभराट झाली.

2) खरोष्ट्री लिपीचा स्वीकार करण्यात आला –

इराणशी संबंध आल्यानंतर भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात खरोष्ट्री लिपीचा वापर केला जात होता. खरोष्ट्री लिपी ही इराणच्या अरेमिक लिपीतून विकसित झाली.

3) नाणी तंत्रात विकास झाला –

भारताचा इराणशी संबंध येण्यापूर्वी भारतीय नाणी विकसित नव्हती. केवळ धातूच्या तुकड्यावर श्रेण्यांचे शिक्के असत. त्या नाण्यांचे आकारमान , वजन यात अचूकता नव्हती. परंतु इराणशी संबंध आल्यानंतर भारतात सोन्या चांदीची नाणी टांकसाळी तून पडण्यास्त सुरुवात झाली.

4) युद्ध कलेवरील परिणाम –

दारीयस पहिला याने इराणच्या सैन्यात सिंधी आणि पंजाबी लोकांची एक दल वेगळेच निर्माण केले होते. या सैन्यदलात असलेल्या भारतीयांना प्रथमच ग्रीकांच्या विरोधात लढण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना इराणी तसेच ग्रीकांची युद्ध कलेची ओळख झाली. याचा फायदा पुढे चंद्रगुप्त मौर्य याला झाला.

5) प्रशासन व्यवस्था –

इराणच्या प्रशासन व्यवस्थेचा परिणाम भारतीय प्रशासन व्यवस्थेवर झाला. विविध प्रशासकीय अधिकारांची नेमणूक करण्यात आली. मौर्य साम्राज्याच्या प्रशासन व्यवस्थेवर इराणचा प्रभाव पडल्याचे दिसून येते.

6) सांस्कृतिक परिणाम –

इराणी संस्कृतीचा प्रभाव भारतीय रीतिरिवाजावर पडल्याचे दिसून येते. राजदरबारात असलेल्या रीतिरिवाज , विशिष्ट समारंभाच्या वेळेच्या प्रथा परंपरा जसे दरबारात विशिष्ट प्रसंगी अग्नी ठेवणे, स्त्री अंगरक्षकाची नेमणूक करणे. अशा प्रकारच्या प्रथांचा अवलंब चंद्रगुप्त मौर्य याने केला.
भारतीय आणि इराणी विद्वानांच्या विचारांची आदानप्रदान झाली. तत्वज्ञानाच्या बाबतीत विचारविनिमय सुरू झाला.

Iran che Bharatavaril Akraman
Source – www. Wikipedia.org.com

आलेख लेखनाची कला इराण पासून भारतीयांनी घेतली. त्याचसोबत

शिल्पकला,मूर्तिकला, वास्तुकला यावरही इराणी कलेचा प्रभाव पडला. सम्राट अशोकाच्या स्तंभावर सिंह,बैल आणि इतर प्राण्यांचे शिल्प याचा पुरावा आहे.

Iran che Bharatavaril Akraman
Source – www. Wikipedia.org

अशाप्रकारे इराणी संस्कृतीचा भारतावर प्रभाव पडल्याचे दिसून येते.

See also  Chanakya niti quotes information in marathi 2021 | चाणक्य नीति मराठी माहिती

आमचा Iran che Bharatavaril Akraman हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्थेविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता.

मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था 2021 | Full History Of Maurya Empire In Marathi

तुम्ही आमच्या http://www. newiinfo.com या वेबसाईट ला पण भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment